कारल्याहून कडू, नाही भूषणावह : पत्रकार हेमंत जोशी
कॉमेडी एक्स्प्रेस या विनोदी मालिकेतून खऱ्या अर्थाने दोन मित्र म्हणजे आशिष पवार आणि भूषण कडू हे तसे दोन उत्तम अभिनेते पुढे आले पण दोघांनाही आपले खाजगी आणि सार्वजनिक स्थान टिकवता आले नाही म्हणजे आशिष पवारांचा घटस्फोट झाला अलीकडे त्याला वास्तविक गाजणार्या गाजलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून अपघातानंतर चांगली संधी चालून आलेली होती पण तेथेही त्याला सचिन मोटे यांनी लगेच तडकाफडकी काढून टाकले आहे आणि त्याचा एकेकाळचा गाजलेला पार्टनर भूषण देखील कारल्यासारखा कडू निघाला म्हणजे कादंबरी, कॉमेडी एक्स्प्रेस जोरात सुरु असतांना भूषणच्या प्रेमात पडली आणि कादंबरीपेक्षा अधिक देखण्या असलेल्या भूषणच्या बायकोने म्हणे आत्महत्या केली त्यानंतर लगेच भूषणने कादंबरीशी लग्न केले त्यांना पुढे प्रकीर्त्त नावाचा मुलगा झाला पण अलीकडे कादंबरीचे देखील कोरोनामुळे निधन झाले, कादंबरी कोरोना दरम्यान ऍडमिट असतांना आर्थिक दृष्ट्या फारसे कोणी भूषणच्या मदतीला यासाठी धावले नाही कारण व्यसनाधीनतेमुळे त्याने केव्हाच स्वतःचा लांडगा आला रे आला कथेप्रमाणे कथेतल्या गुराख्याचा पोर करवून घेतलेला आहे म्हणजे वाट्टेल ती कारणे सांगून इतरांकडून सहकारी अभिनेत्यांकडून मित्रांकडून पैसे उधार उसनवार आणायचे अशा पैशांची परतफेड करायची नाही, उधार उसनवार आणलेले पैसे कुठेतरी उधळायचे त्यामुळे क्रेडिट गमावून बसलेला बदनाम बदमाश अभिनेता अशी अलिकडल्या काळात भूषण कडू याची इमेज बनलेली आहे यात कादंबरी जीवानिशी गेली, भूषण पिण्यात मन रमवून मोकळा होईल आणि नुकसान कोणाचे तर लहानग्या प्रकीर्त्त याचे, वाईट या आईविना मुलाचे वाटते आणि देव करो निदान एखादी तिसरी भूषण याच्या प्रेमात पडून आपले आयुष्य तिने उध्वस्त करू नये एवढेच. अगदीच जेमतेम शरीयष्टी असलेला हा नट वास्तविक अभिनयाच्या दर्जावर सिने नाट्य मालिका क्षेत्रात बऱ्यापैकी जम बसवून होता पण वाईट सवयी कि वाईट संगतीतून अलीकडे त्याला शिस्तीच्या सचिन मोटे यांनी म्हणे त्याला सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून काढून टाकले आहे उद्या अशी वेळ विविध व्यसनातून इतरांवर देखील येऊ शकते त्यामुळे विशाखा सुभेदार स्वतः आणि इतर काहींना सावध राहायला सांगत जा. अत्यंत महत्वाचे जे मी अनेकदा अनुभवातून सांगितले आहे ते असे कि प्रत्येकानेच आयुष्यत जीवनात सारे काही अविचाराने केले तरी चालते पण स्वतःचा जोडीदार मात्र अतिशय विचारपूर्वक निवडावा जे अत्यावश्यक आहे असते. नेमके तसे बहुतेकांच्या बाबतीत घडत नाही विचार न करता कितीतरी जोडपी भावनेच्या आहारी जाऊन लग्न करतात आणि आपल्याकडे घटस्फोट घेणे आजही वाईट मानल्या जात असल्याने कित्येकांच्या मनाचा कोंडमारा होतो असे स्त्री किंवा पुरुष आपल्या हाताने आपले आयुष्य दुख्खी कष्टी करवून घेतात कारण पुढे एकदा आपापसात न जमणाऱ्या जोडप्याला मूल झाले कि त्यांची आपोआप त्या अपत्याशी बांधिलकी निर्माण होते त्यातून वेगळे न होण्याची त्यांची मानसिकता बनते पण एकमेकांच्या दुराव्यातून अशी जोडपी हमखास मनस्वास्थ्य गमावून बसतात. प्रकीर्त्त सारखी फरफट मात्र अपत्यांची होते आणि नवरा बायको मध्ये जो मनाने दुबळा असेल तो स्वतःचे फार मोठे नुकसान करवून घेतो. या कठीण दिवसात मनोरंजनाचे मोठे माध्यम आणि साधन हे मराठी कार्यक्रम असल्याने भूषण कडू किंवा सिनेमावाल्यांच्या भानगडी येथेच संपवतो पण या दिवसातही माझा होशील ना सारख्या भरकटलेल्या अर्थहीन तद्दन फाल्तुक मालिका दर्शकांच्या वाट्याला येतात अशावेळी या मालिकेचा लेखकाला शंभर माराव्या आणि एक मोजावी असे अनेकांच्या मनात येते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी


