राज्यातली काँग्रेस प्रेग्नन्ट इतरांना वांझोटेपण : पत्रकार हेमंत जोशी 

राज्यातली काँग्रेस प्रेग्नन्ट इतरांना वांझोटेपण : पत्रकार हेमंत जोशी 
आपल्या या राज्यात शिवसेनेत एकवाक्यता नाही भाजपा मध्ये एकी नाही राष्ट्रवादी मध्ये धुसफूस आहे बौद्ध धर्मीय नेते एकमेकांकडे पाहायला तयार नाहीत शेतकरी संघटनेतले नेते कायम एकमेकांवर कुरघोडी करतात शेकाप मध्ये असंतोष आहे थोडक्यात घटस्फोट घेऊन देखील एकत्र नांदणाऱ्या जोडप्यासारखी यांची साऱ्यांची अवस्था आहे आणि घटस्फोट घेऊनही मुले का होतात तर बायको म्हणते यांना किंवा मला मूड आला कि हे एका रात्री पुरते झोपायला मी राहते तिकडे येऊन जातात तसे या साऱ्यांचेच आहे म्हणजे घटस्फोट जवळपास झाला आहे पण या साऱ्यांना सत्ता नावाचे बाळ हवेहवेसे वाटते म्हणून हे आपापसात एकत्र आहेत एकत्र येतात एकमेकांना मुठीत ठेवण्याचा किंवा मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात पण संधी मिळताच वर नमूद केलेल्या नेत्यांचे मतभेद होऊन ते कोणत्याही क्षणी एकमेकांपासून दुरावतात किंवा दूर जातात अर्थात हे असे राज्यातल्या काँग्रेस मध्ये देखील याआधी फार मोठ्या प्रमाणावर घडले म्हणून तर राष्ट्रवादी जन्माला आली किंवा भाजपा बघता बघता राज्यात फोफावली. मूळ राष्ट्र्वादीतले असे जेमतेम, बहुतेक सारे तेथे बाहेरचेच अगदी भाजपा शिवसेनेतले देखील पण मोठे प्रमाण तेथे काँग्रेस मधून आलेल्या नेत्यांचेच मात्र अलिकडल्या काही वर्षात या राज्यात या देशात बाहेर पडणाऱ्यांचा जो मोठा फटका दगा काँग्रेसला बसला त्यातून आपल्या राज्यात काँग्रेस मध्ये जे नेते आणि कार्यकर्ते उरले त्यांना नेमक्या संकटाची चाहूल लागल्याने जाणीव झाल्याने उरलेले नेते आपापसातले मतभेद व मनभेद विसरले आणि एकमेकांना घट्ट चिटकून चिपकून बिलगून बसलेले आहेत आता त्यांच्यात बऱ्यापैकी एकी आहे थोडेफार मतभेद असले तरी त्याची ते जाहीर वाच्यता करीत नाहीत थेट चौकात उभे राहून एकमेकांशी भांडत नाहीत एकमेकांच्या अंगावर दात खाऊन चवताळून जात नाहीत म्हणजे दारू मध्ये फायदाच फायदा करून घेणारा खासदार बाळू धानोरकर आता विजय वडेट्टीवार यांना प्रेमाचा डोळा मारून मोकळा होतो वरून फ्लायिंग किस देऊन वडेट्टीवार यांनाच पुढे करून किंवा त्यांचा फायदा करवून देऊन चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम दारू विक्रीस परवानगी तेही अजित पवार यांच्या सहकार्याने मिळवून मोकळा होतो….
बाळासाहेब थोरात स्वखुशीने नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवून मोकळे होतात आणि प्रदेशाध्यक्ष देखील के सी पाडवी यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना पैसे खाण्याची खुलेआम मुभा देतात थोडक्यात राज्यातल्या एकमेव काँग्रेस मध्ये निदान आज तरी सारे काही आलबेल आहे म्हणजे विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या मनासारखे वीज खाते न मिळूनही ते दात ओठ खात नितीन राऊत यांच्या अंगावर धावून गेले किंवा दिल्लीत जाऊन राऊत कसे वीज खात्यात पैसे जमा करतात अशी कोणतीही चुगली केली नाही किंवा उपलब्ध पुरावे त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे त्यांनी सुपूर्द केलेले नाहीत, आहेत त्यावर वडेट्टीवार समाधान मानतात जे काय हाती येईल त्यावर डान्स करून भांगडा खेळून मोकळे होतात. वास्तविक राज्यातल्या काँग्रेस वर कोणाचाही वचक नाही त्यांना कडक हेड मास्तर नाही तरीही ते शिस्त पाळतात किंवा एकमेकांच्या हातात हात घेऊन झिम्मा फुगडी खेळून मिळाले आहे त्यावर आनंद व्यक्त करून मोकळे होतात त्यातून प्रदेशाध्यक्ष नात्याने पटोले यांची हवा निर्माण होते तेच मोठे नेते असे चित्र आपोआप निर्माण होते. आधी भाजपा अगदीच दुबळी होती आजच्या राज्यातल्या किंवा देशातल्या काँग्रेससारखी पण चिकट कायम ठेवत हळूहळू भाजपा बलाढ्य झाली आणि काँग्रेस ची अवस्था बघता बघता मुडदूस झालेल्या बाळासारखी झाली. जशी भाजपा कधी हिम्मत हरली नाही तेच आज राज्यातल्या काँग्रेसचे आहे म्हणजे काँग्रेस हे आज खंगलेले बाळ आहे किंवा क्षय रोग्यासारखे ते दुबळे रोगी आहेत पण तरीही नाना पटोले हिम्मत हरलेले नाहीत त्यांनी अगदी अलीकडे सांगून टाकले आहे कि येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकून दाखवू आणि त्यांच्या या वक्तव्याशी मी सहमत आहे कारण हीच ती अतिशय योग्य वेळ व संधी आहे कि जेव्हा इतर आपापसात भांडताहेत या काँग्रेसवाल्यांनी तेही थेट सत्तेतून बाहेर पडावे आणि एकदिलाने काम करून राज्यातली काँग्रेस बळकट करून येणाऱ्या निवडणुकांना यशस्वी एकदिलाने एकजूट सामोरे जावे त्यांना यश मिळू शकते. आणि हाच अंदाज घेऊन नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे कारण वाट्टेल ते बोलायला नाना म्हणजे वेड्यांच्या इस्पितळातून बाहेर आलेले पेशंट नाहीत. एक मात्र राज्यातल्या काँग्रेसला आणि त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना हात जोडून विनंती कि त्या पृथ्वीराज चव्हाण यांची आज विटाळ आल्याने बाजूला बसलेल्या बाई सारखी जी अवस्था करून ठेवली आहे त्यांना मोकळे सोडावे आणि राज्यातून फिरवून व मिरवून आणावे कारण आजही त्यांच्या कडक नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास आहे त्यामुळे दिवस भरत आलेत म्हणून पाठवून दिली तिच्या माहेरी अशी कृपया पृथ्वीराज यांची अवस्था करू नये त्यांना राज्यात धावायला पळायला सांगावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top