गगनभेदी थापा अनिल थत्तेंच्या : पत्रकार हेमंत जोशी 

गगनभेदी थापा अनिल थत्तेंच्या : पत्रकार हेमंत जोशी 
मी पूर्वी व पु काळे ते हयात असतांना त्यांना आणि आजही जगप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांना किंवा कॉमेडी किंग पत्रकार अनिल थत्ते यांना किंवा जगदीश खेबुडकर यांना देखील ते हयात असतांना हमखास भेटलो कि म्हणतो किंवा म्हणत असे सांगत असे कि तुम्ही सारेच लिखाणातले किमयागार म्हणजे दिलीपकुमार तुमच्या लिखाणाला जगात तोड नाही तुम्हाला कोणी स्पर्धक असू होऊ शकत नाही तूम्हीच तुमचे स्पर्धक त्यामुळे तुम्हाला इतर कोणीही संपवू शकत नाही फारतर तुम्ही स्वतःलाच स्वतःकडून संपवून मोकळे व्हाल आणि अनिल थत्ते यांच्याबाबतीत माझे सांगणे खरे ठरले, अनिल यास इतर कोणीही संपवले नाही ते स्वतःच्या हाताने स्वतः केलेल्या असंख्य चुकांनी स्वतःच संपले, अधून मधून डोके वर काढण्याचा नाही म्हणायला आजही केविलवाणा प्रयत्न थत्ते करतातही पण त्यात फारसा अर्थ किंवा तथ्य नसते, गेल्या २०-२५ वर्षात पडद्याआड गेलेले अनिल थत्ते पूर्वीच्या जोशाने जोमाने पुन्हा कधीही तोंड वर काढू शकले नाही अधून मधुन त्यांचा तसा प्रयत्न असतोही पण त्यात त्यांना अजिबात यश मिळाले नाही मिळत नाही त्यामुळे थापा मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अनिल थत्ते मग लोकांची कदाचित सिम्पथी मिळविण्यासाठी आत्महत्या करणार असल्याचे अवतार संपविणार असल्याचे जाहीर करतात, जे त्यांना माझ्यासारखे अगदी जवळून ओळखून आहेत ते त्यांच्या या अशा थापांवर अगदी त्यांचे कुटुंब सदस्य सुद्धा हसून मोकळे होतात किंवा काही तर त्यांची तोंडावर टर खेचून मोकळे होतात. अवतार संपविण्याची तारीख केव्हाच संपून गेली आहे आणि अनिल थत्ते यांचे गावात खेड्यात येऊन लहान मुलांना हसविणार्या बहुरुप्यासारखे नेहमीप्रमाणे झाले आहे. येथे निदान आज तरी अनिल थत्ते हा विषय येथेच थांबवतो कारण मी त्यांचा नव्हे त्यांच्या बेरकी स्वभावाचा तर अजिबात नाही पण थत्ते यांच्या लिखाणाचा लेखन शैलीचा मोठा फॅन आहे. आमच्या मालकीचे बातम्या देणारे चॅनेल असतांना किंवा माझा मुलगा विक्रांत इंग्रजी पत्रकारितेत उतरल्यानंतर मी किंवा विक्रांतने त्यांचे सल्ले आणि उपदेश नक्की विचारात घेतले ध्यानात ठेवले असल्याने मला त्यांच्या बाबतीत एका कोपऱ्यात मोठा आदर आहे पण पुन्हा तेच रिपीट करतो कि भाऊ तोरसेकर आचार्य अत्रे व पु काळे जगदीश खेबुडकर सुरेश भट आणि अनिल थत्ते हे त्यांच्या लिखाण क्षेत्रातले साक्षात सम्राट आहेत थेट दिलीपकुमार आहेत पण मी मात्र या साऱ्यांची मोठ्या खुबीने केवळ नक्कल केली आणि हे दिलीपकुमार पण मी आमच्या पत्रकारिता आणि लिखाणातला त्यातून त्यामुळे राजेंद्रकुमार ठरलो माझे लिखाण मी सिल्व्हर ज्युबिली करवून घेतले आणि पैसेही राजेंद्रकुमार सारखे आधी कमावले आणि त्यानंतर मी व माझ्या मुलांनी त्या पैशांचे नियोजन केले त्यामुळे मला शॉपिंग करायला नक्की दरवर्षी अमेरिकेत जाता आले अनिल थत्ते यांच्या सारख्या थापा माराव्या लागल्या नाहीत कि मी मराठीतला पहिला असा पत्रकार कि सकाळी अमेरिकेत जाऊन संध्याकाळी परत आलो आहे तसेही अमेरिकेत केवळ पोहोचण्यासाठी किमान २४ तास लागत असतांना एक दिवसात तेही अमेरिकेतून अनिल थत्ते कसे परत येतील आणि त्यांच्या या थापांनी त्यांचा अनेकदा आर्थिक फायदा नक्की झाला जो फारसा पुढे टिकला नाही पण त्यांचे अशा थापांनी मोठे नुकसान झाले. मला अमेरिकेत जायचे आहे सांगून इतरांकडून स्पॉन्सरशिप मिळविणाऱ्या अनिल थत्ते यांचा पासपोर्ट तपासल्यास असे लक्षात येईल कि ते कधी फारसे अमेरिकेत गेलेलेच नाहीत. थापा विरहित अनिल थत्ते जर पत्रकारितेत दिसले असते तर ते त्यात कायम टिकले असते त्यांना केविलवाणी धडपड करावी लागली नसती. मी मात्र आजही त्यांना लिखाणातला गुरूंपैकी एक मानतो जेव्हा कि अनिल थत्ते माझ्याविषयी त्यांच्या फॅमिली डॉक्टर असलेल्या बाईंच्या नवर्याकडे पातळी सोडून बोलले होते पण हत्ती चले बाजार पद्धतीने मी अशा बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करतो आणि अनिल थत्ते आजही समोर आले कि त्यांना आदराने वाकून मी किंवा माझा मुलगा नमस्कार करतो. गावातला बहुरुप्या ते उगाच झाले अजिबात गरज नसतांना कारण बहुरुप्या गावात आला कि फक्त तेथल्या लहान मुलांचे किंवा टवाळ मंडळींचे तेवढे मनोरंजन करतो ज्याचे त्याला थोडेफार पैसेही मिळतात पण तो गावातून निघून गेला कि ना त्याची आठवण येते ना त्याचे अस्तित्व उरते. साप्ताहिक विवेक किरण शेलार दिलीप करंबळेकर दैनिक तरुण भारत इत्यादींच्या सात्विक प्रयत्नातून त्यांनी जे वेब चॅनेल सुरु केले त्याचा टीआरपी वाढण्यासाठी या सात्विक मंडळींनी अनिल थत्ते यांना सध्या पाचारण केले आहे आणि अनिल थत्ते यांचा तर तो इतिहास आहे कि जे त्यांना किंवा ते ज्यांना बिलगतात त्यांची लवकरच अवस्था स्वर्ग दाखवणार्या मालकासारखी होते. बघूया हि वेब चॅनेल वाली मंडळी विधवा होते कि अनिल थत्ते यांना पाचारण करणे थांबते कारण कालपासून तर जुगलबंदी रंगलेली सुरु झालेली आहे म्हणजे अनिल थत्ते यांच्या नेहमीच्या थापेबाजीत त्यांना वठणीवर आणण्यासाठी पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी उडी घेतलेली आहे, आपण फक्त गम्मत बघायची असते कारण मी राजेंद्रकुमार म्हणून ठीक आहे मला कधीच दिलीपकुमार व्हायचे नाही…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top