कुछ तो गडबड है : पत्रकार हेमंत जोशी 

कुछ तो गडबड है : पत्रकार हेमंत जोशी 
आई हीच ती वेळ आतल्या खोलीत पटकन जा आणि बाबांना आपल्या गंगुबाईचे पटापट मुके घेतांना रेडहॅण्ड पकड, अनेक घरातून हे असे हमखास घडते किंवा हीच ती वेळ जेव्हा चतुर बायको नवरा गाढ झोपला असतांना पैसे काढण्यासाठी हळूच त्याच्या नाईट पायजम्यात हात घालते पण तिच्या हाताला पैशांऐवजी भलतेच लागते म्हणजे प्रेमपत्रांचे पुडके वगैरे. हे असे हुबेहूब त्या देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अलीकडे केवळ आठवड्याच्या अंतराने घडले आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी म्हणे स्वतः देवेंद्र यांना सांगितले होते कि हीच ती वेळ, जा आणि तुमच्यावर नाराज असलेल्या त्या शरद पवार यांना आधी तब्बेतीच्या निमित्ताने भेटा त्यानंतर त्या एकनाथ खडसे यांच्याही घरी जाऊन या, थोडक्यात यशवंतराव चव्हाण पद्धतीने बेरजेचे राजकारण करा लोकांच्या मनातली तुमच्याविषयी असलेली नाराजी आणि असलेले मतभेद मनभेद दूर करा त्यातून तुम्हाला मोठे राजकीय फायदे तर नक्की होतीलच पण दीर्घकाळ राजकारणात किंवा सत्तेत टाकून राहणे सोपे जाईल आणि फडणवीस यांनी तेच केले नेहमीप्रमाणे दिवंगत गंगाधरराव यांच्या जागी स्थान असलेल्या नरेंद्र मोदी यांचेच त्यांनी ऐकले, सर्वात आधी ते अगदी वेगळ्या पद्धतीने थेट नितीन गडकरी यांना भेटले त्यांच्या मनात असलेली नाराजी आणि दुरी काढून टाकण्याचे फार मोठे काम अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यानंतर ते अनुक्रमे शरद पवार यांना भेटले आणि एकनाथ खडसे यांच्या ते थेट घरी जाऊन गप्पा मारत बसले विशेष म्हणजे या दुश्मनीच्या दिवसात तेही गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्या घरी घेऊन जाणे म्हणजे उदयनराजे भोसले यांनी जुन्या प्रेम प्रकरणाच्या जखमा बाजूला ठेवून अजित पवारांना थेट कडेवर घेऊन त्यांचे पटापट मुके घेण्यासारखे किंवा खड्यासारखे बाजूला फेकलेल्या राज ठाकरे यांनी साऱ्या जखमा विसरून थेट उद्धव ठाकरे यांना गणपतीच्या मूर्तीसारखे थेट पाटावर बसवून गावभर डोक्यावर मिरवून आणण्यासारखे किंवा भास्कर जाधव यांनी ओठांचा चंबू करून उदय सामंत यांचे भर बाजारात जाहीर चुंबन घेण्यासारखे पण तेही फडणवीस यांनी मोठ्या खुबीने त्या मुक्ताईनगर मध्ये घडवून आणले अगदी खडसे यांच्या जणू छातीवर पाय ठेवून ते गिरीश महाजन सारख्या लुकड्या पण नारदासारख्या चतुर नेत्याला म्हणजे महाजन यांना पाठीवर घेऊन खडसे यांच्या घरातून फिरवून आणले आणि फडणवीस यांचे हे असे अचानक स्वभावातले बदल तुम्हाला यापुढेही झालेले दिसतील म्हणजे हेच फडणवीस उद्या डावलले गेलेल्या विनोद तावडे यांना कुशीत घेऊन गावभर खुशीत मिरवून आणतील किंवा ओवाळितो ताईराया पद्धतीने हाती आरतीचे ताट घेऊन त्या पंकजा मुंडे यांचे भर सभेत गुणगान गातील किंवा राज्यातल्या अनेक बड्या तगड्या नाराज नेत्यांना स्वतःच्या पाठीवर बसवून वर्हाडी भाषेतला डावला डावला करून आणतील कारण राजकारणात झपाट्याने पुढे जाण्यासाठी त्यांना आधी दोन पावले मागे येणे आवश्यक असते, ते मागे आले आहेत कदाचित आणखी थोडे मागे घेऊन मग मोठी उडी घेतील. अगदी अलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनापासून प्रेम करणारे पण अलीकडे काहीसे नाराज असलेले कोकणातले एक भाजापाचे मोठे नेते मला म्हणाले कि काय हे आम्हाला किंवा प्रसंगी अगदी राणे यांनाही देवेंद्र कोपऱ्यात बसवून ठेवतात आणि नको त्या उथळ नेत्याचे म्हणजे प्रसाद लाड यांच्यासारख्या काही मंडळींचे महत्व वाढवून ठेवतात, देवेंद्र यांच्या ते लक्षात कसे येत नाही कि लाड दरेकर यांच्यासारखे काही चतुर किंवा संधीसाधू मंडळी त्यांना वापरून घेताहेत त्यावर मी त्यांना एवढेच म्हणालो कि देवेंद्र यांना वापरून घेणे एवढे सोपे नाही याउलट देवेंद्र हेच ज्या नेत्यांचा किंवा काही दलालांचा तुम्हा भाजपा नेत्यांना देखील उबग आला आहे त्यांना केव्हा वापरून कोपऱ्यात फेकतील, त्या बदमाश मंडळींच्या ते लक्षातही येणार नाही, बघा माझे वाक्य एक दिवस खरे ठरते किंवा नाही. त्यावर तो नेता म्हणाला तुमच्या तोंडात साखर. ज्याप्रमाणे शरद पवार जसे त्यांच्या बायकोला पण आजपर्यंत ते नेमके कसे कळले नाही त्यांच्या देवेंद्र हे दोन पावले पुढे आहेत हे कायम ध्यानात ठेवा आणि हा माणूस हा नेता एक दिवस या देशातले महत्वाचे मोठे पद भूषवून स्वतःचे व देशाचे नाव जगावर कोरून मोकळा होईल. माझे सांगणे हे लिहिणे खरे ठरले नाही तर मी पत्रकारिता सोडून देईन….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top