पवारांचा पोबारा कि पवारांचा आसरा :
उत्तर महाराष्ट्रातल्या एका यशवंतराव नामक नेत्याने घराशी पत्नीशी मुलांशी कधीही फारकत घेतली नाही, दुस्वास केला नाही पण एका मराठी नटीला देखील पत्नीचा दर्जा देऊन संकोच न करता चारचौघात कायम मिरवून आणले, अजित पवार काकांपासून विभक्त झाले किंवा नाही हेच कळत नाही पण वेगळा गट घेऊन त्यांनी भाजपशी महायुती केली आणि सत्तेत आले, काका पुतणे आणि त्यांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आजही म्हणजे घेतला आहे घटस्फोट पण एकमेकांना भेटतात, विनोद तोच जुना कि घटस्फोट घेतल्यानंतर देखील एका बाईला दोन तीन वेळा दिवस जाऊन तिला मुले होतात कारण नवरा अधून मधून रात्रीचा तिच्याकडे जेव्हा मुक्कामाला असायचा तेव्हाच शेजारचे म्हणायचे, यावेळी बाईची पाळी नेहमीसारखी नक्की टळणार आहे. मोदी शाह यांच्या मनासारखे आपल्या या महाराष्ट्रात घडवून आणले ते फक्त आणि फक्त या काका पुतण्याने. तिकडे उद्धव ठाकरे यांचा ग्राफ वेगाने खाली आणला नंतर काँग्रेसला कायम व्हील चेअर वर बसून ठेवले आणि आतून मोदी आणि शाह यांच्याशी मोठे मधुर संबंध जपले. माझे सांगणे तुम्हाला खोटे वाटत असेल तर जेव्हा केव्हा मोदी किंवा शाह महाराष्ट्रात येतात तेव्हा ते ज्या प्रेमाने अजित पवारांना मुका देऊन मोका देतात, त्यावरून जे ठरलेले आहे किंवा जो खतरनाक डाव काका आणि पुतण्याने शिजवलेला आहे नेमके तेच घडणार आहे, लोकसभेला काका आघाडीला उल्लू बनवीत वरून त्यांची मदत घेत त्यांचे खासदार निवडून आणतील आणि पुतण्या अजित पवार देखील महायुतीच्या सहकार्याने खासदारकीला मोठा पल्ला गाठेल आणि 2024 च्या सत्ता स्थापनेत शरद पवार आणि अजित पवार फक्त आणि फक्त भाजपाशी युती करून मोकळे होतील, आणि पुढल्या लोकसभेला पहिल्यांदा जे मंत्री शपथ घेतील त्यात सुप्रिया सुळे यांचे नाव नक्की असेल. खटकते एकच कि शरद पवार त्या देवेंद्र फडणवीसांचा मनापासून राग करतात दुस्वास करतात त्यांची नफरत करतात. वास्तविक फडणवीस हे उद्याचे मोदी पद्धतीने पुढे आणण्यात आपल्या या राज्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घ्यायला हवा तशी भूमिका घेऊन विशेषतः राज्यातल्या मराठ्यांमध्ये फडणवीस नेमके आपल्या हिताचे व फायद्याचे कसे हे पटवून देऊन फडणवीस विरोधात त्यांनी स्वतः निर्माण केलेले वातावरण किंवा पेरलेले विष कसे निवळेल त्यावर वास्तविक शरद पवार यांनी पावले उचलायला हवीत पण ते जरी अजित पवार यांच्याकडून घडतांना दिसत असले तरी शरदरावांच्या मनातला राग कायम टिकून आहे ज्याचा सतत मोठा त्रास आणि ताण त्या फडणवीसांना सहन करावा लागतो, फडणवीसांची शरद पवारांच्या बाबतीत भूमिका म्हणजे सहन होत नाही आणि सांगता देखील येत नाही किंवा एखाद्या सासूसारखी त्यांची अवस्था होते म्हणजे नको त्या जागी मोठ्ठा फोड आला पण गावातला डॉक्टरच जावई झाला, असे त्या देवेंद्र यांचे शरदरावांच्या बाबतीत झाले आहे म्हणजे इकडे पवारांचे वागणे त्रासदायक ठरते पण तिकडे मोदी यांच्याकडे तक्रार करायला जागा नाही, नसते. उद्धव ठाकरे यांची अवस्था म्हणजे लग्नाआधी दिवस गेलेल्या तरुणीसारखी झालेली आहे, इश्य ! ज्याच्यापासून पटकन दिवस गेले तो लग्न करेल किंवा नाही अशी जी तिला धास्ती असते ते तसे सतत कायम दररोज उद्धव यांचे शरद पवारांच्या बाबतीत घडते आहे म्हणजे पवारांनी जे गाजर दाखवून ठेवलेले आहे त्या भरवशावर उद्धव कसेबसे अस्तित्व टिकवून ठेवताहेत पण एक काका जसे राज यांचे कधीही झाले नाहीत तसे हे शरद काका कधीही उद्धव ठाकरेंना यापुढे मोठे होऊ देणार नाहीत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी