सोमय्या जोमात पण लोकशाही संकटात :
किरीट सोमय्या यांना लोकशाही या बातम्या देणार्या वाहिनीने किंवा तत्सम वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी त्या बातमीने संपविले कि सोमय्या यांनी लोकशाही वाहिनीचा आणि पत्रकार अनिल थत्ते यांचा नेमका गेम केलेला आहे हे नेमके येथे तुम्हाला समजावून घ्यावे लागणार आहे पण एका दगडात जसे अनेक पक्षी हाकलणारे पळवून लावणारे काही नेमबाज असतात तेच नेमके किरीट सोमय्या यांच्या त्या अश्लील व्हिडीओ किंवा चित्रफितीमुळे कसे नेमके घडलेले आहे, ते देखील तुम्हाला येथे विस्ताराने संवायचे आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारी वरून माहिती प्रसारण मंत्रालयाने चौकशी सुरु केली होती परिणामी 22 सप्टेंबर पासून पुढे तीन दिवस लोकशाही वाहिनी ऑन एअर न दाखविण्याचा फतवा माहिती प्रसारण मंत्रालयाने काढून विशेषतः महाराष्ट्रात आणि मीडिया क्षेत्रात अचानक खळबळ माजवून टाकली. जेव्हा लोकशाही वाहिनीने किरीट सोमय्या यांच्या त्या अश्लील व्हिडीओ चा भांडोफोड केला त्या दिवसात राज्यातल्या इतरही अनेक वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी सोमय्या यांच्यावर कदाचित असलेल्या रागातून त्याव्हिडीओवर बातम्या छापल्या किंवा बातम्या केल्या देखील मात्र हा व्हिडीओ दाखवण्याची सुरुवात लोकशाही वाहिनीने केल्यामुळे कदाचित सोमय्या यांनी लोकशाही वाहिनीला अडचणीत आणण्याचा चंग बांधला असावा पण त्याचवेळी त्यांनी इतर वाहिन्यांना किंवा वृत्तपत्रांना त्यातून का वगळले याचे नेमके उत्तर जर सोमय्या यांनी स्वतःच दिले तरच आपल्याला त्यांच्या या दुजाभावाचे नेमके उत्तर मिळेल. लोकशाही वाहिनीचा एखाद्या पडद्यामागच्या बेरकी व्यक्तीने मोठ्या हुशारीने उपयोग करून घेतला कि लोकशाही वाहिनीत काही उतावीळ मंडळींना हा फटका बसला कारण या अशा खळबळजनक सोमय्या व्हिडीओ मुळे वाहिनीची त्यानंतर लोकप्रियता वाढल्याचे दिसले नाही तरीही माझा आजही पाठिंबा विशेषतः कमलेश सुतार यांना आहेच…
www.vikrantjoshi.com
खरी गम्मत त्या अनिल थत्ते यांच्या बाबतीत घडलेली आहे. थत्ते यांनी त्या व्हिडीओ प्रकरणाच्या दिवसात किरीट सोमय्या यांना कमी लेखले असावे म्हणजे अंडर एस्टीमेट केले आणि अनिल थत्ते त्यांच्या व्हिडीओ मधून किंवा लिखाणातून ज्या अनेक सतत कायम कारण नसतांना म्हणजे विनाकारण थापा मारून तात्पुरती खळबळ माजवून मोकळे होतात नेमके तेच त्यांनी किरीट सोमय्या बाबतीत घडवून आणले त्यातून लोकशाही वाहिनी संगे फक्त आणि फक्त अनिल थत्ते देखील आता मोठ्या अडचणीत आले आहेत सापडलेले आहेत. जेव्हा लोकशाही वाहिनीने तो किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडीओ प्रसारित केला तेव्हा अनिल थत्ते यांच्याकडे वास्तविक त्या व्हिडीओ संबंधी कोणताही कुठलाही पुरावा नसतांना आधी त्या सोमय्या विषयावर आपल्या व्हिडीओ मधून थत्ते वाट्टेल ते त्या सोमय्या यांच्यावर आरडाओरड करून मोकळे झाले विशेष म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सोमय्या यांचे माझ्याकडे असे 37-38 अश्लील व्हिडीओ आहेत अशी नेहमीप्रमाणे थत्ते लोणकढी थाप मारून जसे मोकळे झाले तसे थत्ते आपल्या जाळ्यात अलगद अडकले आहेत हे बेरकी बुद्धिमान सोमय्या यांच्या ते लगेच लक्षात आले आणि ज्या ज्या ठिकाणी सोमय्या यांनी लोकशाही वाहिनीची लेखी व कायदेशीर तक्रार केली तक्रारी केल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी या थापाड्या पत्रकाराला म्हणजे अनिल थत्ते यांना देखील अडचणीत आणले त्यामुळे यापुढे अगदी जलद गतीने थत्ते देखील लोकशाही वाहिनी पाठोपाठ नक्की अडचणीत येणार आहेत…
लोकशाही वाहिनी समोर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तीन संकटे नेमकी उभी केलेली आहेत जशी लोकशाही विरोधात माहिती प्रसारण मंत्रालयाने यादिवसात ऍक्शन घेतलेली आहे सोमय्या यांनी याच खळबळजनक सेक्स व्हिडीओ संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे ज्यात अनिल थत्ते यांना देखील गोवण्यात आलेले असल्याने उद्या जर हा निकाल सोमय्या यांच्या बाजूने दोन्ही ठिकाणी लागला तर थत्ते यांना देखील तुरुंगवासाची वारी थापा मारल्यामुळे करावी लागणार आहे आणि किरीट सोमय्या तर या पद्धतीचे लढे यशस्वी करून दाखविण्यात माहीर असल्याने थत्ते यांना जर तुरुंगवासाची हवा खावी लागली तर त्यात फारसे आश्चर्य निदान मला तरी वाटणार नाही पण जरी थत्ते यांची पत्रकारिता थापांनी कायम भरलेली असली तरी या उतारवयात सोमय्या यांनी त्यांच्यावर दया दाखवावी अशी मी सोमय्या यांना येथे याठिकाणी हात जोडून विनंती करतो.आता नेमके सत्य किंवा सिक्रेट याठिकाणी सांगतो कि नेमके निश्चित ज्या राजकीय नेत्यांनी सोमय्या यांची ती अश्लील क्लिप लोकशाही किंवा तत्सम मंडळींकडे सुपूर्द केली होती ते अलगद राहिले बाजूला कारण सोमय्या यांची राजकीय दादागिरी त्यातून नक्कीच मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत पण राजकारणात मोठ्या खुबीने युक्तीने चलाखीने कसा पाहुण्याच्या काठीने साप मारून आपण फक्त कशी गम्मत बघायची असते, त्याचे हे उत्तम उदाहरण अलीकडच्या काळातले, लोकशाही वाहिनी मात्र अडचणीत आल्याने मनापासून वाईट वाटते पण कदाचित बातमीतला, व्हिडीओ दाखविताना झालेला अतिरेक त्यांना भोवला असावा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी