फडणवीसांची पोलखोल करतांना भीती का बाळगावी ?
लहान मुलांकडे अनेकदा रबरापासून बनविलेले असे खेळणे असते कि ते कसेही कितीही दुमडले तरी क्षणार्धात हात दूर केला कि नेहमीच्या आकारात जसेच्या तसे मूळ आकारात आपल्याला बघायला मिळते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्वाधिक प्रभावी आणि मोदीजी योगीजीं पद्धतीने हिंदुस्थानात जगभरात आवडणारे, आकर्षणाचा विषय ठरलेले श्री देवेंद्र फडणवीस, ते याच पद्धतीचे राजकीय मुशीतून तयार झालेले उत्तम नेतृत्व, देवेन्द्रजी नागपुरातले भाजपा नेते ते आज जगभरातले चर्चेतले नेतृत्व, मी त्यांना बघत आलोय म्हणून सांगतो कि असा एकही दिवस त्यांच्या आयुष्यातला मी बघितला नाही कि ज्या दिवशी त्यांना त्यांचा एखादा त्या त्या वेळेचा प्रभावी विरोधक मग तो अनेकदा विरोधी पक्षातला असतो किंवा कधी कधी तर थेट भाजपामधला अत्यंत ताकदवान प्रतिस्पर्धी असतो किंवा विविध कठीण प्रसंग, फडणवीसांवर नेहमी सतत कायम कोणीतरी तुटून पडलेले असते आणि काही काळानंतर काही वेळानंतर बघावे तर त्या रबरी खेळण्या सारखे देवेंद्र पुन्हा जसेच्या तसे नेहमीसारखे हसमुख चेहऱ्याने ताठ उभे असतात आणि नव्या आव्हानांना तोंड देण्या सज्ज झालेले असतात, रात्री उशिरापर्यंत कामाला जुंपून घेत पुन्हा भल्या पहाटे ताजे तवाने होत पुढल्या कामांना कार्यक्रमांना मोहिमेवर रवाना झालेले असतात. अनेकांना गेल्या काही वर्षांपासून फडणवीसांच्या नेतृत्व आणि कर्तृत्व आकर्षणातून जवळ जायचे आहे जवळ जायचे असते त्यातल्या कित्येकांचे मला तसे विचारणे असते कि आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या आसपास आहोत पण आम्हाला त्यांनी केतन पाठक पद्धतीने जवळ घेतलेले नाही आणि त्यावर उत्तम उपाय किंवा मार्ग म्हणजे फडणवीसांच्या सभोवताली असा एक वेगळा गट उभा झालेला तयार केल्या गेला आहे प्रसंगी त्यात त्यांच्याकडे काम करणारे किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा आदर राखणारे दिलीप राजूरकर, श्रीकर परदेशी, अश्विनी भिडे, विवेक भीमनवार, देवराम पळसकर , सुमित वानखेडे यांच्यासारखे अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी असतील किंवा शैलेश जोगळेकर आल्हाद राजे अमोल काळे यांच्या सारखे अनेक निरपेक्ष अपेक्षाविरहित वृत्रीने जवळ आलेले वर्षानुवर्षे जोडल्या गेलेले मित्र असतील काही संघातले असतील अनेक भाजपाचे असतील काही समाजसेवक किंवा एखादा दुसरा कदाचित नातेवाईक असेल किंवा गिरीश महाजन यांच्यासारखे राजकारणातले जोडल्या गेलेले जिवलग सखे सोबती असतील, एक मात्र नक्की निश्चित कि अपेक्षाविरहित म्हणजे केवळ सत्ता मिळविण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी जवळ येणारे मित्र फडणवीसांच्या सभोवताली गरजेनुसार नक्की जमा होणारे असतात किंवा जमा झालेले आहेत पण मी जे सांगतो तेच नेमके सत्य आहे कि देवेंद्र फडणवीसांच्या सभोवताली राज्याच्या कानाकोपऱ्यातून एक असा गट उभा आहे ज्याला नक्की काही मिळतही नसते पण हे जे कुठल्याही अपेक्षा न ठेवता जे फडणवीसांच्या पाठीशी उभे असतात उभे आहेत त्या साऱ्यांचे स्थान त्यांच्या हृदयात असते आणि हि अशीच माणसे त्यांना अगदी मनापासून मनातून आवडतात ज्यांची त्यांना मोदी पद्धतीने खरी गरज आहे आणि त्यातलेच तुम्हीही एक असावे असे मला वाटते…
www.vikrantjoshi.com
पत्रकारितेत उतरल्यानंतर आपण स्वतःवर कोणत्याही कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, हा शिक्का लावून घ्यायचा नाही हे आम्ही ठरविले आणि तेच केले तेच करतो पण एखाद्या नाचगाणे करून पोट भरणाऱ्या नर्तकीला देखील तमाशाच्या फडात नियमित येणारा ग्राहक मनापासून आवडायला लागल्याने ती त्याच्यावर नकळत प्रेम करायला लागते, आमचे देखील अनेकदा हे असेच झाले आहे किंवा होत असते म्हणजे राज्याच्या राजकारणातले किंवा सत्तेत असलेले नसलेले काही माणसे काही नेते काही अधिकारी काही समाजसेवी काही मान्यवर नकळत आवडायला लागले लागतात कारण हे असे भन्नाट मनोवृत्रीची माणसे खरेच समाज बांधून घडवून फार मोठे उपकार राज्यातल्या जनतेवर करून ठेवतात त्यातलेच एक देवेंद्र फडणवीस जे आम्हाला किंवा अनेकांना त्यांच्या केवळ कार्यातून कर्तृत्वातून भावले आवडले आवडतात अशावेळी फडणवीस किंवा आर आर पाटील गणेश नाईक आनंद दिघे पद्धतीच्या व्यक्तीची ना जात बघायची असते ना त्यांचा राजकीय पक्ष बघायचा असतो ना त्यांच्या पैशांकडे लक्ष ठेवायचे असते पण माझी भूमिका कट्टर हिंदुत्ववादी असे स्पष्ट बजावून देखील जेव्हा आहे त्या राजकीय पक्षाची इमानेइतबारे सेवा करणारे मुनाफ हकीम सारखे मुसलमान नेते देखील जेव्हा तुम्हाला जवळ घेतात तेव्हा मन आनंदाने ओसंडून वाहते.अत्यंत महत्वाचे म्हणजे जर विरोधी पक्षातले बहुसंख्य असंख्य नेते आकर्षणातून आदरातून अगदी सहज फडणवीसांच्या जवळ जाऊन मोकळे होतात, भाजपातून कधी काळी विरोध करणाऱ्या भाजपा मधल्याच अनेकांना या दिवसात फडणवीसांच्या जवळ जायचे आहे असते अशांनी अगदी संकोच न करता सकाळी सकाळी उठून त्यांचे निवासस्थान गाठून मोकळे व्हावे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी तुम्हाला नेमके वेगळे सतत काहीतरी माझ्याकडून माहित करून घ्यायचे असते म्हणून येथे चार ओळी रेखाटल्या…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी