बामणा नको हा बहाणा : पत्रकार हेमंत जोशी
मी कडवा कट्टर ब्राम्हण यानात्याने कोथरूड विधानसभा मतदार संघातील तमाम ब्राम्ह्मण मतदारांना हात जोडून विनंती करतो कि आपल्या हातून अशी कोणतीही चूक घडता कामा नये ज्या अगदी क्षुल्लक चुकीचा देखील पुढे त्रास व्हावा, माझे जाऊ द्या, मी पत्रकार असल्याने मला सारे राजकीय पक्ष एकसारखे असतात म्हणजे चुकलेल्यांना हाणायचे आणि चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे हे माझे कामच आहे जे मी कायम चोख पार पाडत आलो आहे पण तुम्ही कोथरुडकर तर मेधाताई कुलकर्णी यांच्या पाठीशी जसे ठामपणे उभे होता तोच प्रतिसाद यावेळी चंद्रकांत पाटील यांनाही मिळायला हवा, तुम्हाला विनंती. उठा आणि प्रचाराला लागा. अहो, चंद्रकांतदादा यांना एक मित्र म्हणून जसे मी फार पूर्वीपासून ओळखतो तसे त्यांना एक यशस्वी मंत्री आणि बेधडक बुद्धिमान नेता म्हणूनही जवळून बघतो. जसे दिसतात तसेच ते अगदी साधेपणाने प्रत्येकाशी वागतात बोलतात, त्यांची नाळ कट्टर स्वयंसेवकांची त्यामुळे समोरचा कोण कुठला कसा काहीही न बघता ते भेटणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मदत सहकार्य करतात जी पद्धत मेधाताई कुलकर्णी यांची सुद्धा होती…
अलीकडे मला आपल्यातले आपले एक नेते विश्व्जीत देशपांडे म्हणालेत कि आपल्या ब्राम्हणांच्या काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करवून घेण्यासाठी मला विधानसभा येथून लढवायची होती पण चंद्रकांत पाटलांनी त्यांना विनंती केली आणि मोठ्या मनाने त्यांनी जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतली. हरकत नाही, मी अंकित काणे विश्व्जीत देशपांडे आणि अन्य मान्यवर नेते नव्या सरकारात नक्की आपल्या मागण्यांचा चंद्रकांत पाटलांना हाताशी धरून पाठपुरावा करू आणि आपल्या मागण्या मान्य करण्यास सरकारला नक्की भाग पाडू. अत्यंत महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटलांच्या पक्षाचे नेते त्यांचे काम धैर्य बघून आपण सारेच त्यांच्या जसे सतत कायम पाठीशी उभे आहोत, आज त्याच फडणवीसांचे एक सहकारी मित्र नेते निवडणुकीला उभे असतांना आपण नाराज होणे राहणे हे थेट देवेंद्र यांना क्लेशदायक नक्की ठरणारे आहे ते तसे बोलण्याच्या ओघात म्हणालेही कि कोथरूड मधले ब्राम्हण जर चंद्रकांत पाटलांच्या पाठीशी ठाम आणि उघड उभे राहिले नाहीत तर ते मला अतिशय वाईट वाटणारे असेल…
मला माहित आहे तुम्हाला चंद्रकांत पाटील नेमके व्यक्तिगत कसे आहेत हे फारसे माहित नसावे. चंद्रकांत पाटील यांच्या ब्राम्हण पत्नी अंजलीताई या त्या दोघान्चाही उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा म्हणून आजही काम करतात कारण हे बाबा सतत संघ जनसंघाला वाहून घेतलेले म्हणाल तर एक अवलिया, दादांचे एक बरे आहे, साधा पेहराव आणि पायात चप्पल घातली कि ते सकाळी बाहेर जे पडतात ते रात्री उशिरा घरी येतात. पैशांमध्ये ना कधी लक्ष होते ना पैशांची त्यांना आवश्यकता वाटली त्यामुळे सतत फक्त लोकांसाठी धडपडणे तेवढे त्यांना चांगले माहित आहे. खाण्याचा नखरा नाही आणि संघ स्वयंसेवक असल्याने पिण्याचा किंवा अन्य वाईट कोणताही नाद नाही, व्यसन नाही. अरे हो, त्यांना एक अतिशय वाईट व्यसन आहे, घरदार विसरून कायम लोकांसाठी काहीतरी चांगले करीत बसण्याचे. हे मात्र अनेक नेत्यांना रुचणारे व्यसन नाही कारण लोकांसाठी काहीही न करता केवळ स्वकुटुंबाचा विचार करणाऱ्या नेत्यांना दादांचे हे असले व्यसन कसे हो आवडायचे, त्यातून एक बरे आहे कि स्वतःकडे असलेल्या लोकसंग्रहातून प्रसंगी ते थेट शरद पवारांना देखील अंगावर घेतात आणि चारी मुंड्या चीत करतात, या चंद्रकांत पाटलांना कोथरूड विधान सभा मतदार संघातील समस्त मतदारांनी मतदान करणे आवश्यक वाटते आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी