भाग 2 : नेत्यांची मुले, कोण भले कोणाचे वाटोळे :
अनेक नेते अनेक बायकांशी एकाचवेळी अधिकृत किंवा अनधिकृत विवाह करून संसार करून मोकळे होतात किंबहुना एकाचवेळी अनेक अंगवस्त्र ठेवण्याची एक कॉमन सवय या नेत्यांमध्ये असते, एकपत्नीव्रत न पाळणाऱ्या बहुतेक नेत्यांचे त्यांच्या मुलांचे वाटोळे होतांना दिसते किंबहुना नेत्यांनी केलेल्या पापांची त्यातून फसविल्या जाणार्या स्त्रियांनी दिलेल्या शापातून कदाचित त्यांनी किंमत मोजलेली असते पण काही नेते एकाचवेळी अनेक स्त्रियांशी संबंध ठेवून देखील कदाचित मिळविलेल्या पुण्याईतून किंवा पापाच्या अगडबंब कमाईतून शेवटपर्यंत सुखाने दीर्घकाळ जगून वर जातात, विविध बायकांची लफडी करणारे तुमच्या आजूबाजूचे नेते डोळ्यासमोर आणा, तुमच्या ते अगदी सहज लक्षात येईल अर्थात सारेच नेते बाईलवेडे असे नाही पण ज्यांच्याकडे तरुण सुंदर सेक्सी स्त्रिया देखील पूर्णतः सुरक्षित असतात असेही काही स्थानिक किंवा वरिष्ठ नेते आहेत असतात पण माझ्यासारख्याला देखील अशा नेत्यांची नावे शोधावी लागतात आठवावी लागतात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील, गिरीश गांधी, उद्धव ठाकरे, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण, सुरेशदादा जैन, उल्हास पवार, चंद्रकांत पाटील, ईश्वरबाबू जैन, डॉ दीपक सावंत, राजेंद्र दर्डा, प्रसाद लाड, मिलिंद देवरा, अनंत गाडगीळ अशी नेत्यांची अगदीच बोटावर मोजण्या एवढी नावे नक्कीच आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्रात देखील शोधून सापडावी लागतील….
www.vikrantjoshi.com
मुंबईतले आधी उद्धव कडे असलेले नंतर शिंदेंना बिलगलेले असे एक नेते मला ठाऊक आहेत ज्यांनी अनेक विवाह उरकलेत शेवटचे लग्न तर त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी उरकले पण एकाचवेळी अनेक किंवा दोन दोन विवाह करून देखील ज्यांच्या पुढल्या पिढीत वादविवाद न होता असे जे नेते सुखासमाधानाने जगले त्यात प्रामुख्याने दत्ता मेघे असतील, डी वाय पाटील असतील किंवा दिवंगत जवाहरलाल दर्डा असतील त्याचे श्रेय जसे त्या दोन दोन किंवा अनेक विवाह करणाऱ्या नेत्यांना आहे त्यापेक्षा मोठे श्रेय त्यांच्या पुढल्या पिढीला देऊन मी मोकळा होईल, विजय दर्डा किंवा सागर मेघे पद्धतीची पुढली समजूतदार पिढी या अशा नेत्यांच्या पोटी जन्माला आली म्हणून त्यांच्या मुलांची आपापसात वादावादी झाली नाही म्हणजे दत्ता मेघे हे अतिशय दानशूर पण तेवढेच बिनधास्त जीवन जगलेले जगणारे नेते, मात्र त्यांचे सुपुत्र सागर दत्ताभाऊंच्या लवकर हाताशी आले आणि त्यांनी या बेफाम बिनधास्त जीवन जगणार्या बापाला कधीही आडकाठी निर्माण न करता दत्ताभाऊंचा अख्खा मोठा संसार आणि व्यावसायिक व्याप सागर यांनी अतिशय मोठ्या मनाने आणि चतुराईने सांभाळून, दत्ताभाऊंच्या पुढल्या पिढीला याच सागर यांनी छानपैकी आजही बांधून ठेवलेले आहे किंवा जवाहरलाल दर्डा यांचे दोन्ही कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यात मोठे श्रेय मी प्रामुख्याने विजय दर्डा आणि त्यांच्या दिवंगत पत्नी सुरेशदादा जैन यांच्या धाकट्या भगिनी ज्योत्स्ना दर्डा यांना देखील देऊन मोकळा होईल अर्थात दिवंगत ज्योत्स्ना यांनी व्यवसायात चोख असलेल्या पण व्यक्तिगत जीवनात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार्या विजय दर्डा यांना देखील ज्या उत्तम पद्धतीने कुटुंबात बांधून ठेवले तेही नक्कीच कौतुकास्पद होते…
नेत्यांची पुढली पिढी विषयी बोलतांना दिवंगत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांचा येथे उल्लेख करणे आवश्यक वाटते कारण बाळासाहेब आणि त्यांच्या सुविद्य व समाजसेविका असणाऱ्या दिवंगत पत्नी कुसुमताई चिरंजीव शिरीष चौधरी यांच्या सहवासात मी अनेक वर्षे विशेषतः जळगावला असतांना घालविली आहेत, बाळासाहेब आणि कुसुमताई यांना शिरीष राजकारणात एवढा पुढे निघून जाईल त्यावर त्यांना अजिबात खात्री नव्हती पण शिरीष चौधरी यांनी केलेला व्यवस्थित व्यक्तिगत संसार आणि राजकारणात मारलेली मजल वरून बाळासाहेबांचा शिक्षण संस्थांचा सांभाळलेला उत्तमरीत्या व्याप हे कौतुक बघायला निदान कुसुमताई हयात असायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने फार लवकर गेल्या. इतर पक्षातून नेते आमदार फोडण्यात आणि आपल्याशी आपल्या पक्षाशी जोडण्यात सराईत निष्णात वाकबगार असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा सखा जळगावचाच गिरीश महाजन या दोघांनीही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या आमदार होणाऱ्या बाळासाहेबांच्या शिरीषला अद्याप आपल्याकडे का घेतले नाही खेचले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते कारण जळगाव जिल्ह्यातले बहुसंख्य लेवा पाटील समाज ज्यांनी भाजपा किंवा गिरीश महाजन यांना विशेषतः एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडल्यानंतर ज्यापद्धतीने पाण्यात बघितले किंवा विरोध केला, आमदार शिरीष चौधरी जर आज भाजपाकडे असते तर उभ्या महाराष्ट्रातला लेवा पाटील समाज पुन्हा एकवार भाजपाकडे फडणवीसांकडे नक्की वळला असता, अजूनही वेळ गेलेली नाही….
क्रमश: हेमंत जोशी