बावनकुळेंची बत्तीशी आणि पत्रकारांची ऐशीतैशी :
मी गेल्या 43 वर्षांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि नियमित कालखंडात अगदी 13 वेळेस देखील कोठेही कधीही पत्रकार परिषद अटेंड केलेली नाही, कारण प्रत्येक पत्रकार परिषदेत काही मोठ्या आणि मान्यवर वाहिन्यांच्या वृत्तपत्रांच्या वतीने तेही बोटावर मोजण्या इतके मृणाल नानिवडेकर सारंग दर्शने अजय वैद्य यांच्यासारखे ध्येयवेडे अनुभवी सुसंस्कृत अभ्यासू भाषाप्रभू दलाली विरहित विविध मीडियातले जमलेले असतात दुरदैवाने त्यांच्या शेजारी पत्रकारितेतले अक्कलशून्य पण व्यसने आणि दलाली पद्धतीला वाहून घेतलेले बहुसंख्य मीडिया पर्सन प्रचंड गर्दी करून थेट पहिल्या रांगेत बसलेले असतात किंवा राजकीय वर्तुळात मोठी गर्दी करून असतात विशेष म्हणजे हे बहुसंख्य बदनाम आणि बदमाश पत्रकार अतिशय निर्लज्ज असतात ज्यांच्यावर मी आजपर्यंत अनेकदा प्रसंगी अशांच्या नावासहित तुटून पडलेलो आहे आणि एवंच पद्धतीच्या केवळ दुकानदारी करण्या अतिशय अडाणी व्यसनी पत्रकारांवर बोलण्याच्या ओघात अहमदनगरला पदाधिकारांच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष नेमके सत्य सांगून गेले त्यामुळे बावनकुळे मीडियातल्या कोणत्या पांगली सोडून वागणार्या मंडळींविषयी नेमके वक्तव्य करून गेले हे पत्रकारितेला खर्या अर्थाने वाहून घेणाऱ्या समाजसेवी मीडियाच्या ते लक्षात आल्याने अशांनी त्यावर साफ दुर्लक्ष केले कदाचित पत्रकारिता सोडून इतर उद्योगांवर आणि व्यसनांवर भर देणार्या मीडियाचे नेमके बिंग फुटल्याने अशांना मात्र त्यांच्या ढुंगणाला मिरच्या झोंबणे स्वाभाविक होते…
www.vikrantjoshi.com
मला अलिकडल्या विशेषतः भाजपा आणि रा स्व संघाविषयी काळजी किंवा शंका यासाठी वाटते कि जेथे राजकारण येते तिथे हेवेदावे आणि स्वार्थ नक्की मोठ्या प्रमाणावर बोकाळतो पण संघ म्हणजे फक्त आणि फक्त त्याग पण या संघात देखील तेही आपल्या या राज्यात विविध संस्था आणि भाजपा पक्षाला हाताशी धरून कदाचित काही समाजकंटकांचा तो मोठा डाव असू शकतो पण गटबाजी सुंदोपसुंदी हेवेदावे रा स्व संघ देखील घेरला गेला आहे कि काय अलीकडे बावनकुळे किंवा तत्सम काही प्रकारणांवरून मला हे नेमक्या पक्क्या माहितीच्या आधारे जाणवू लागलेले आहे जे नेमके निदान जगातल्या रा स्व संघात अजिबात घडता कामा नये. अहमदनगर जिल्ह्यात या दिवसात माजी मंत्री राम शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोघांच्या गटात विस्तव देखील जात नाही, नेमके संघ विचारांचे भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदेंच्या गटात आहेत आणि तेथूनच बावनकुळे विषयी या दिवसात टीकेला कारण ठरलेला तो व्हिडीओ जर व्हायरल झाला असेल तर एकेकाळी अत्यंत प्रभावी ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे जे पुढे आपापसातील हेव्यादाव्यातून अधःपतन झाले नेमके तसे या राज्यात किंवा अहमदनगर जिल्ह्यातील भाजपामध्ये ऐन महत्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर घडता कामा नये, त्यात बावनकुळे जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले त्या स्पर्धेत नेमके राम शिंदे देखील आघाडीवर असल्याने माझ्या शंकेला उगाचच बळकटी येते, आपल्याच कार्यकर्त्याने जो स्वयंसेवक देखील असू शकतो बावनकुळे यांची बदनामी घडवून आणल्याने माझी शंका नक्की रास्त ठरते….
याठिकाणी केवळ भाजपाचा विचार केल्यास देवेंद्र फडणवीस पाठोपाठ किमान महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना अगदी जवळून ओळखणारे आणि अनेकदा बघणाऱ्यांची फार मोठी संख्या आहे आणि बावनकुळे हे जमणाऱ्या प्रत्येकाला अगदी कायम आपला माणूस समजत असल्याने ते अनेकदा वर्हाडी अघळपघळ स्वभावातून नको तेवढे सतत मोकळे बोलतात ज्याचा त्यांना हा असा विनाकारण मोठा फटका बसू शकतो विशेष म्हणजे राज्यातल्या बहुसंख्य मीडियाशी त्यांचे अतिशय घरगुती व व्यक्तिगत संबंध असल्याने अनेकदा बावनकुळे आम्हा मीडियाशी जे ऑफ द रेकॉर्ड बोलतात ते जर आम्ही लिहून मोकळे झालो तर मला वाटते असे कठीण प्रसंग त्यांच्यावर अगदी दररोज ओढवतील पण हे घडत नाही याआधी घडले नाही कारण बावनकुळेंवर मनापासून प्रेम करणारा मीडियातला मोठा वर्ग आहे आणि बावनकुळे ते वक्तव्य कसे गमतीच्या ओघात बोलून गेले असावेत हे बहुसंख्य मीडियाला शंभर टक्के माहित असल्याने त्यांना जवळून बघणार्या किंवा ओळखणार्या मीडियाने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला नाही, थोडीफार बोंबाबोंब नगर मधल्या भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी केवळ. बावनकुळे यांना मोठ्या राजकीय अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम केलेली आहे हे आता अजिबात लपून राहिलेले नाही. शेवटी महत्वाचे हेच कि अलीकडे भाजपा किंवा रा स्व संघातले बडे आसामी गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेकदा बेभरवशाच्या किंवा व्यक्तिगत स्वार्थावर भर असणाऱ्या देणार्या चंचल मनोवृत्तीच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर अति महत्वाकांक्षी काही कार्यकर्त्यांवर नको तेवढा नकळत मोठा विश्वास टाकतात त्यातून हि मंडळी आपले उपद्रव मूल्य दाखवून थेट भाजपाचे मोठे नुकसान करतात किंवा प्रसंगी रा स्व संघाला देखील मूळ विचारांपासून खूप दूर नेऊन ठेवतात, त्यावर मोठे आत्मचिंतन व्हावे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी