कडवे जहाल हिंदुत्व हेच असावे राष्ट्रीयत्व : अंतिम भाग: पत्रकार हेमंत जोशी
पश्चिम बंगालच्या विधान सभा निवडणुकीत भलेही भाजपा पराभूत झाली पण तेथे हिंदुत्व जिंकले, एकदाचा हिंदूंना मुस्लिम धार्जिण्या ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा रस्ता आसान झाला घुसखोर मुस्लिमांना काही प्रमाणात नक्की वचक बसला. माझा एक सामान्य वकुबीचा मित्र होता त्याला गावातली देखणी आणि श्रीमंता घरची पोर आवडली होती, तिला गटवणे पटवणे महाकठीण काम होते पण याने मोठ्या जिद्दीने प्रेमात यश मिळविण्या प्रयत्न सुरु केले, त्याने तिच्या घरासमोरील रिकाम्या ओट्यावर दिवसातले काही तास ठाण मांडून बसायला सुरुवात केली, त्या ओट्यावर बसून तो कधी गाणी म्हणायचा तर कधी पावा वाजवायचा कधी तिच्या भावाला वाकुल्या दाखवायचा तर ती दिसली रे दिसली कि बळजबरी आपणहून तिच्याकडे बघून हसायचा कधी तिच्या वडिलांना सिगारेट्स आणून द्यायचा तर कधी तिच्या आईला बाजारातून भाजी आणून द्यायचा त्यातून एक दिवस हळूच त्याला आधी तिच्या घरात आणि एक दिवस थेट तिच्या हृदयात एंट्री मिळाली पुढे ती त्याची कायमस्वरूपी झाली. संघ आणि भाजपाचे कायम माझ्या या मित्रासारखे असते म्हणजे एकदा का त्यांना अमुक ठिकाणी एंट्री मिळाली कि एक दिवस ते जे हवे असते मिळवून मोकळे होतात. पश्चिम बंगाल मध्ये ते थेट ३ वरून ८० हा आकडा यावेळी पार करून मोठे यशस्वी ठरले आहेत आणि मला माहित आहे पुढल्या वेळी ते नेमका आकडा पार करतील आणि सत्ता काबीज करून मोकळे होतील त्यामुळे त्यांच्या यावेळी पदरात पडलेल्या यशाचे आपण हिंदूंनी यासाठी कौतुक करायला हवे कि संपूर्ण पश्चिम बंगाल तेही शेजारील राष्ट्रातून घुसखोरी करणाऱ्या मुसलमानांच्या हातात देणार्या ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि तेथल्या बहुसंख्य जात्यंध मुस्लिमांना यापुढे वठणीवर आणण्याचे मोठे कार्य नक्की त्यांच्या हातून घडणार आहे. आजपर्यंत मी भाजपाला कितींदा मतदान केले आहे, एकदाही नाही पण जेथे हिंदुत्व धोक्यात तेथे जर भाजपा संघ जीवाचे रान करून एक राज्य घुसखोर मुसलमानांपासून कोसो दूर ठेवण्यात यश मिळवीत असतील तर त्यांचे उघड जाहीर कौतुक करणे प्रत्येक विचारांच्या हिंदूंचे ते कर्तव्य ठरते. आणि हो, तसेही पश्चिम बंगालमध्ये गमावण्यासारखे भाजपाकडे काहीही नव्हते. अवघे तीन आमदार होते आता थेट ८० च्या वर आहेत. आणि आयुष्यात ७० हा आकडा पार करू न शकणार्या उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी तुम्ही ८० या आकड्याचे महत्व कसे व किती नक्की विचारायला हवे. विशेषतः काँग्रेसने तर ममता चे नाव देखिल येथे या राज्यात तोंडातून बाहेर काढता कामा नये कारण पुढल्या लोकसभेला राहुल किंवा सोनिया यांचे पंतप्रधान उमेदवारीसाठीचे नाव आता नक्की मागे पडणार आहे आणि त्याजागी ममता बॅनर्जी हेच नाव असेल, शेम्बडे पोर देखिल ते सांगेल. मला नाही वाटत पश्चिम बंगालमध्ये भाजपा परभूत झाला, संघ किंवा भाजपा कधीही पराभूत होत नाही तर तो आजच्या तोकड्या यशात उद्याचे मोठे यश बघत शोधत असतो. गम्मत म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भुईसपाट झालेल्या काँग्रेसचे थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जेव्हा, देशातून भाजपा आता संपत चाललेली आहे म्हणतात, अलीकडे नाना यांचा बोलण्यातून तोल का जातो आहे नेमके कारण अद्याप लक्षात आलेले नाही. येथे विषय भाजपा नाही हिंदुत्व आहे आणि उद्या जर थेट शरद पवार यांनी जरी हिंदुत्वाच्या झेंड्याखाली मते मागितली तरी समस्त हिंदूंनी त्यांचे स्वागत करायला हवे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी


