कडवे जहाल हिंदुत्व हेच असावे राष्ट्रीयत्व : भाग २ :  पत्रकार हेमंत जोशी 

कडवे जहाल हिंदुत्व हेच असावे राष्ट्रीयत्व : भाग २ :  पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे अगदी कठोर वृत्तीच्या तापट प्रवृत्तीच्या स्त्री पुरुषांमध्ये देखील या कोरोना महामारीमुळे कमालीचा हळवेपणा आला आहे, जो तो इमोशनल भावुक भावनाप्रधान होऊनच बोलतो वागतो आहे. साधा फोन जरी वाजला तरी आधी छातीत धस्स होते त्यात एखाद्या कुटुंबात कोरोना असेल आणि अशांकडून वेळी अवेळी फोन आला असेल वाजला असेल तर आधी आपण देवाचे नाव घेतो नंतर फोन किंवा भ्रमणध्वनी उचलतो. आमचे वडील जळगाव जामोदचे श्रीराम जोशी मास्तर अतिशय कडक तापट स्वभावाचे गरम डोक्याचे होते ते कट्टर संघ स्वयंसेवक असल्याने त्यांना शिळ वाजवायची सवय होती त्यामुळे अगदी गल्लीच्या कोपऱ्यातून जरी त्यांच्या शिळेचा आवाज कानावर पडला तरी इकडे आम्ही सारी भावंडे अगदी तरुण मोलकर्णीसहित चिडीचूप होत असू, पूर्वी वडीलधाऱ्यांच्या मोठा धाक असायचा किंवा आजही बायकोच्या बांगड्यांचा साधा आवाज किणकिण जरी कानावर पडली तरी बहुतेक नवरे मोलकरणींशी गुलुगुलु किंवा फोनवर मैत्रिणींशी फिदीफिदी हसायचे बंद करून आपल्या बेड रूमकडे पळतात आणि अंगावर शाल चादर ओढून गाढ झोपल्याचे सोंग करतात तसे या कोरोनाचे झाले आहे म्हणजे कोरोना साधा शब्द जरी एखाद्याने उच्चारला तरी बहुतेकांची चड्डी पिवळी होते. शेवटी नको ते घडले, राज्याचा देशाचा लाडका नेता राजीव सातव कोरोना पुढे हात टेकून आणि साऱ्यांना रडवून देवाघरी निघुन गेला. त्याची ७५ वर्षांची आई रजनी सातव मी पत्रकारिता करण्यासठी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा राज्यमंत्री होत्या विशेष म्हणजे त्या अगदीच तरुण वयात विधवा झाल्या आणि केवळ राजीवला घडविण्या वाढविण्यासाठी त्या महात्मा फुलेंच्या समाजाच्या विचारांच्या असूनही सिंगल पॅरेण्ट म्हणून जगल्या. देवाला त्यांचे कोणतेही सुख बघवले नाही म्हणजे ऐन तारुण्यात त्या विधवा झाल्या आणि उतार वयात त्यांच्या कर्तृत्ववान तरुण सुपुत्राने प्राण सोडले. ताई मंत्री असतांना मी त्यांचा अतिशय लाडका होतो, धाकट्या भावासारखे त्या माझ्यावर प्रेम करायच्या, काळाच्या ओघात त्या राजकीय दृष्ट्या मागे पडल्याने त्यानंतर त्यांच्या वारंवार भेटी झाल्या नाहीत, आज त्यांच्यावर ओढवलेला हा कठीण प्रसंग, माझ्या या बहिणीला देवाने जगण्याची हिम्मत द्यावी. राजीव तुम्ही मला अगदी अलीकडे वचन दिले होते कि गुजराथ मधून परततांना मुंबई विमानतळावरून माझ्या घरी जेवायला येण्याचे, का हो नाही पाळले मला दिलेले वचन, प्रिय मित्रा तुला श्रद्धांजली वाहतांना आसवे थांबायला तयार नाहीत. खूपच अत्यंत वाईट घडले तुम्ही आम्हाला सोडून गेले. आज सोशल मीडियावर तुम्हाला लाखोंनी वाहिलेली श्रद्धांजली त्यात विविध राजकीय पक्षाचे विविध जाती धर्माचे बहुसंख्य होते, तुम्ही राजकारणात तसे दिल्लीतच अधिक रमलात तरीही तुमचे या राज्यातले फॉलोअर्स पाहून तुमचे मोठेपण त्यातून आमच्या साऱ्यांच्या लक्षात आले. राज्याच्या व देशाच्या काँग्रेसची फार मोठी हानी झाली, राजीव साऱ्यांना पोरके करून निघून गेले. देवाने हे अतिशय चुकीचे असे काम केले.
हिंदूंनो आपण नेमके कुठे कमी पडतो याचा गांभीर्याने विचार व्हावा, अंतिम विचारांचे निर्णयात रूपांतर करून त्या निर्णयांवर हिंदूंनी ठाम असावे. हिंदूंना स्वतःची प्राचीन संस्कृती असली तरी इतर धर्मात जे जे चांगले सांगितले आहे त्याचे आपण हिंदूंनीही अनुकरण करावे म्हणजे ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम इत्यादी धर्म जसे जगाच्या कानाकोपऱ्यात वाढले तेच हिंदू धर्माचे करता येईल, सध्या उलट घडते आहे म्हणजे हिंदू धर्म वाढण्यापेक्षा कमी होतो आहे, हिंदूंचे धर्मांतर हा हिंदू धर्मगुरुंसमोर फार मोठा प्रश्न आहे. जसे दिवसातून कित्येक वेळा जगातले मुस्लिम्स काहीही व कसेही करून नमाज पठणासाठी एकत्र येऊन आपापसातले हेवेदावे विसरून एकमेकांच्या शेजारी बसतात ते तसे हिंदूंनी का करू नये, मुस्लिम दिवसातून कितीतरी वेळा जसे मशिदीत किंवा भर रस्त्यावर नियमित कायम किंवा समोर कोणतीही विपरीत परिस्थिती असली तरी एकत्र येतात, हिंदूंनी किमान आठवड्यातून एक दोन वेळा तरी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एकत्र यावे म्हणजे जातीपातीचे विलगीकरण दूर होऊन कोणतेही भेदभाव न पाळता आपण सारे एकमेकांच्या हातात हात घेऊन काही कॉमन प्रार्थना म्हणूया ज्यामुळे हिंदू एकी झपाट्याने वाढीस लागेल मात्र एकत्र आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांनी आपला कुठलाही छुपा अजेंडा अशाठिकाणी म्हणजे प्रार्थना स्थळी राबवू नये अन्यथा हिंदूंची ती वाईट सवय आहे कि चार हिंदू डोकी एकत्र आली कि त्यांचे बोलण्याचे विषय ठरलेले असतात, राजकारण सिनेमा सेक्स आणि एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या. केवळ महाराष्ट्र जरी नजरेसमोर आणला तरी तुमच्या ते लक्षात येईल कि आपण सारे हिंदू आपापसात एकमेकांच्या जातींचा किती दुस्वास करतो आहोत जे नेमके अतिशय चुकीचे घडते आहे. ज्यांनी या देशासाठी या राष्ट्रासाठी या राज्यासाठी त्याग केला त्या प्रत्येक थोर पुरुषाला महात्म्याला संताला समाजसेवकाला तुम्ही मराठींनी राज्यातल्या समस्त हिंदूंनी परस्पर आपापल्या जातीचे कप्तान करून मोकळे झाला आहात, महात्मा फुले माळी समाजाने वाटून घेतले तर शिवाजी महाराज संभाजी महाराज केवळ मराठ्यांची मक्तेदारी असे चित्र स्वतः याच समाजाने उभे करून थेट या दोन महाराजांचे महत्व मर्यादित करून सोडले, सावरकर टिळक रामदास स्वामी इत्यादी ब्राम्हणांच्या जे कधी स्वप्नातही आले नव्हते हे असे महापुरुष तर केवळ बामणांचे पद्धतीने हिणविल्या जाऊ लागले आहेत, संत रोहिदास चर्मकारांचे तर बाबासाहेब फक्त बौद्ध धर्म स्वीकारलेल्या मंडळींचे हे असे त्यांना मर्यादित करून जातीच्या घाणेरड्या साचात बसवून या महापुरुषांना जे जातीपातीच्या राजकारणात मर्यादित करून सोडले आहे ते अत्यंत चुकीचे घडले आहे, अगदी अलीकडे माझ्या ओळखीतल्या ब्राम्हण आजींचा नातू त्यांना म्हणाला कि मला शिवाजी संभाजींच्या गोष्टी सांगू नको ते ऐकून त्या अवाक झाल्या कारण कोणत्याही ब्राम्हणाच्या घरात शिवाजी संभाजीचा इतिहास सांगूनच संस्काराची बीजे रोवली जातात पण निघणाऱ्या मोर्चात शिवाजी व संभाजी महाराजांचा वारंवार उल्लेख, त्यातून हे दोघे केवळ मराठ्यांचे किंवा टिळक आगरकर रामदास स्वामी इत्यादी केवळ बामणांचे, ब्राम्हणेतर मुलांवर चुकीचे संस्कार लादल्या जाऊ लागलेले आहेत ज्यातून हिंदू किंवा येथले समस्त मराठी यात एकप्रकारे मोठी दरी निर्माण होऊन द्वेषाची विषाची वाढ होऊन नुकसान हिंदू धर्माचे होते आहे जे नेमके हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्यांना हवे आहे…
(अपूर्ण )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top