महाराष्ट्र दिन कि महाराष्ट्र दीन : पत्रकार हेमंत जोशी 

महाराष्ट्र दिन कि महाराष्ट्र दीन : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या ओळखीत दोघे जुळे भाऊ होते त्यातल्या एकाचे लग्न झाले म्हणून दुसरा मनातून अस्वस्थ झाला, लग्न झालेल्या भावाचा बदला घ्यायचा अविवाहित राहिलेल्या भावाने मनोमन ठरविले होते आणि हि संधी त्याला आयतीच याच्या मधुचंद्राच्या राती चालून आली. त्यांचे गावातले दोन मजली घर होते आणि जेव्हा विवाहित भाऊ वरच्या माडीवरून खाली तेही मध्यरात्री या जुळ्या भावाला तेलाची बाटली मागायला आला या दुष्टाने त्याला रातीच्या अंधारात तेलाऐवजी फेविकॉलची बाटली जाणून बुजून दिली हे घरातल्यांच्या तेव्हा लक्षात आले जेव्हा नवविवाहित जोडपे दोन दिवस खाली उतरले नाही आणि याच पद्धतीचे खालच्या पातळीवर त्या जळगाव जिल्ह्यातले आजपर्यंतचे राजकीय वातावरण मी अगदी जवळून अनुभवले बघितले पाहिले आहे. आधी जळगाव जिल्ह्यातले नेते एकमेकांचे जवळचे मित्र असतात नंतर त्यांच्यात सत्तेच्या किंवा पैशांच्या वाट्यावरून अचानक जुम्पते त्यानंतर ते एकमेकांना संपवायला निघतात म्हणजे ज्या दिवंगत प्रल्हादराव पाटील यांना सत्तेच्या राजकारणात स्थानिक एकनाथ खडसे यांनी कधीही वर येऊ दिले नाही आज त्याच प्रल्हाद पाटलांचा अपयशी राजकारणी मुलगा रवींद्र एकनाथ खडसे यांनाच दिवसातून तीनवेळा सलाम ठोकून जणू स्वर्गातल्या बापाला वाकुल्या दाखवून मोकळा होतो. एकेकाळी ज्या एकनाथ खडसे यांनी तोंडातून शब्द काढला कि तासभर एका पायावर उभा राहा, सांगायचा अवकाश, जे गिरीश महाजन मग एक काय एकाचवेळी दोन्ही पाय वर करून बगळ्यासारखे गुपचूप दोन्ही पाय वर करून उभे राहायचे, यांनी पळ म्हणायचा अवकाश कि महाजन धावत सुटायचे, खडसे यांनी थोडेसे खाऊन घे म्हणायचा अवकाश कि महाजन यांचा बकासुर व्हायचा पण आज तेच खडसे आणि महाजन जळगाव जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत म्हणजे महाजन यांना खडसे राजकारणातले विकृत गुलशन ग्रोव्हर वाटतात तर खडसे यांना महाजन सिनेमात बलात्कार करणारा रणजित नावाचा खलनायक भासतात, महाजन खडसे यांना राजकारणातून थेट संपवायला निघाले आहेत तर खडसे म्हणतात मी गिरीश महाजन यांचा सुरेशदादा जैन करेन म्हणजे जेव्हा महाजन यांना खडी फोडायला पाठवेल तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल…
तुम्हाला तर माहित आहे कि माजी मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात मानले जातात तर एकनाथ खडसे यांना त्याचवेळी राज्यातल्या दुसऱ्या बलाढ्य नेत्याने म्हणजे शरद पवार यांनी थेट कडेवर उचलून घेतले आहे, नजीकच्या काळात खडसे त्या पवारांच्या लवकरच कडेवरून डोक्यावर बसतील तो भाग वेगळा पण आम्ही ज्या पॉर्न फिल्म बघण्यासाठी एकेकाळी कुठेतरी माहिजी किंवा भुसावळला जाऊन येत असू आज ती संधी खडसे आणि महाजन आम्हाला उपलब्ध करून देणार असल्याचे फक्त सांगतात पण प्रत्यक्षात नेमके काहीच घडत नाही म्हणजे खडसे त्या महाजन यांची ब्लु फिल्म घोषणा करूनही दाखवत नाहीत म्हणे त्यात महाजन यांचा उरलेला माल त्यांचा पीए रामेश्वर लुटताना दिसतो आहे आणि महाजन कधीकाळी यात माहीर असलेल्या एकनाथ खडसे यांच्या त्या चावट किंवा वादग्रस्त फिल्म्स दाखवून मोकळे होत नाहीत पण काळेबेरे नक्की असावे त्याशिवाय का ते दोघेही थेट एकमेकांवर असे आरोप करीत सुटलेले आहेत? एक मात्र नक्की विकासाच्या मुद्द्यांवर या जिल्ह्यातल्या नेत्यांचे आपापसात अजिबात मतभेद नाहीत कारण त्याकडे त्यांचे फारसे लक्षच नाही विशेष म्हणजे ईश्वरबाबू जैन आणि सुरेशदादा जैन आणि दोघांचे कुटुंबीय जिल्ह्याचे राजकारण करतांना बऱ्यापैकी आर्थिक अडचणीत आले आहे कारण या दोघांनाही अनेकांनी आधी आर्थिक लुटले नंतर राजकारणातून तडीपार केले किंवा त्यांच्या काही चुकांमुळे हे दोघेही जैन आणि ईश्वरबाबू यांचा माजी आमदार मुलगा मनीष आजतरी बऱ्यापैकी राजकीय अस्ताला पोहोचले आहेत पण वस्तुस्थिती मात्र अशी कि सुरेशदादा जैन यांना त्यांची अरेरावी आणि त्यातून घडलेली ती चूक खूप महागात पडली आणि ते जवळपास अडीच वर्षे गजाआड गेले हे त्यांचे मोठे दुर्दैव पण एक सुसंस्कृत निर्व्यसनी दिलदार धडाकेबाज प्रभावी नेता कसा असावा त्याचे या राज्यातले सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एकमेव सुरेशदादा जैन मात्र त्यांना त्यांची धरसोड वृत्ती व अरेरावी आयुष्यात खूप महागात पडली आणि सतत ३०-३५ वर्षे जळगाव जिल्ह्यातले अत्यंत यशस्वी असे हे नेतृत्व एकनाथ खडसे यांनी उध्वस्त करून सोडले अर्थात त्याची मोठी राजकीय किंमत खडसे यांनाही मोजावी लागली. सांगितले ना कि जळगाव जिल्ह्यातले राजकारण हे थेट रणांगणावर एकमेकांसमोर भिडणाऱ्या शत्रूसारखे आहे म्हणजे सारे नेते एकमेकांवर तुटून पडतात आणि एकाचवेळी किंवा आळीपाळीने सारेच धारातीर्थ पडतात…
जाऊ द्या हे राजकारण वाचक मित्रानो जरावेळ बाजूला ठेवा आणि त्या कोरोना महामारीकडे आतातरी गांभीर्याने बघा कारण प्रेतांचा खच पडतो आहे अनेक कोरोनाग्रस्त आजही त्या रांगेत आहेत आणि माझे तो कोरोना काहीच करू शकत नाही या भावनेतून आपण त्याला उल्लू बनवू पाहत आहोत पण फसवणूक कोरोनाची नव्हे तर तुमची होणार आहे, एकदा का अति आमविश्वासाने तुम्ही बाहेर पडलात कि शंभर टक्के त्याच्या जाळ्यात अडकणार आहात त्यामुळे कृपया निदान पुढले काही दिवस तरी घराबाहेर पडू नका आणि घरात शक्यतो कोणा बाहेरच्याला घेऊ नका भले काही अडचणी पुढले काही दिवस सहन करा अन्यथा तुमची रवानगी थेट स्मशानात होण्याची मोठी शक्यता आहे. मला काही होणार नाही मी बाहेर पडतांना सगळी काळजी घेतो मी एकदम ताकदवान आहे मी सावध आहे मी वाफ घेतो मी अमुक घेतो तमुक करतो या भ्रमात कृपया राहू नका, जरा त्या जगदीश लाड या जगप्रसिद्ध बॉडी बिल्डरचे फोटो बघा तुम्ही ते बघून त्याक्षणी म्हणाल कि या राज्यातला हा सर्वाधिक बलवान पुरुष पण त्याचाही या कोरोनाने बळी घेतला किंवा या राज्यातले कमालीचे सुसंस्कृत निर्व्यसनी एक नेते आमचे आदर्श मित्र राजीव सातव असेच सतत इकडे तिकडे देश सेवेसाठी धावपळ करीत राहिले आणि आज पुण्यात मृत्यूशी केवळ कोरोना झाल्याने झुंज देताहेत त्यामुळे गेले काही दिवस आमचे कशातही लक्ष लागत नाही. एकदा त्यांचे आणि माझे कॉमन मित्र माझे अत्यंत आवडते आमदार राजेंद्र पाटनी मला म्हणाले कि नव्या मंत्री मंडळात काँग्रेस तर्फे राजीव सातव यांना मंत्री पदाची ऑफर आहे त्यावर मी म्हणालो आज दिल्लीत अत्यंत प्रभावी ठरलेल्या या देश नेत्याला जर राज्यात येऊन स्वतःचा पृथ्वीराज चव्हाण करून घायचा असेल तर त्यांनी लगेच इकडे निघून यावे, सातव यांच्या सुदैवाने त्यांनी तो निर्णय त्यावेळी घेतला नाही, बरे झाले अन्यथा येथल्या काही दुष्ट नेत्यांनी त्यांचा पार राजकीय खात्मा नक्की केला असता आणि देश त्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एका उत्तम नेतृत्वाला मुकला असता. राजीव याही संकटातून लवकर बाहेर पडावेत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या लाडक्या नेत्या रजनी सातव यांना हे संकट पेलवण्याची हिम्मत मिळो एवढे सांगून हे लिखाण येथे तूर्त थांबवतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top