वासनांध आणि मध्यमवर्गीय : पत्रकार हेमंत जोशी 

वासनांध आणि मध्यमवर्गीय : पत्रकार हेमंत जोशी 
राज्यातल्या कानाकोपऱ्यात राजकीय पत्रकारितेच्या माध्यमातून जेथे तेथे खोलवर रुजलेले निर्माण झालेले वैयक्तिक संबंध त्यामुळे दर दिवशी दर तासाला कोणाचा तरी फोन येतो, हा सिरीयस आहे आणि तो गेल्याच्या या बातम्या असतात. जिकडे बघावे तिकडे स्मशानवत वातावरण भयावह शांतता आणि जो तो अतिप्रचंड तणावाखाली वावरतांना. मित्रांनो, गरिबांना आजही रोजगार मिळतो आहे सरकारी मदत मिळते आहे आणि श्रीमंतांकडे याही दिवसात नेहमीप्रमाणे पैशांचा ओघ सुरूच आहे नेमके मरण होते कुचंबणा होते फजित होते ती फक्त आणि फक्त मध्यमवर्गीय समाजाची, ना त्यांचा कोणी वाली आहे ना त्यांच्याकडे कोणाचे लक्ष आहे पण मध्यमवर्गीयांचे हाल न बघता येण्यासारखे कारण त्यांचे छोटे मोठे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत किंवा एकतर नोकऱ्या गेल्या आहेत नाहीतर त्यांचे पगार निम्म्यावर आले आहेत त्याचवेळी या मध्यमवर्गीय मंडळींमध्ये अलिकडल्या काही वर्षात अचानक अनेक बहुतेक जोडप्यांमध्ये काही वाईट सवयी व वाईट व्यसने घुसलेले आहेत त्यावर त्यांनी आधीच साठवलेला पैसा लुटला आहे उधळला आहे त्यामुळे मदत सहकार्य या दिवसात करायचेच असेल तर नजर आणि नियत साफ ठेऊन राज्यातल्या या मोठ्या प्रमाणावर असलेल्या मध्यमवर्गीय म्हणजे ना इकडे ना तिकडे याने कि ना धड श्रीमंत ना धड गरीब असलेल्या या वर्गाला मनापासून करून मोकळे व्हा. मध्यमवर्गीयांच्या घरातल्या स्त्रिया किंवा तरुण मुली नेमक्या देखण्या आणि चुणचुणीत त्यामुळे सहकार्य करणारे पुरुष त्या घरातल्या बायकांवर वाईट विकृत नजर ठेवून सहकार्याचे मोठे नाटक करतांना मला विशेषतः सोशल मीडियावर दिसतात. कृपया या अतिशय कठीण अशा दिवसात तरी राज्यातल्या संधीसाधू व काही बदमाश पुरुष मंडळींनो जरा काही दिवस तुमच्या लघवीची जागा बांधून ठेवा आणि सहकार्य मागायला येणाऱ्या स्त्रियांकडे आपण घरातल्या आया बहिणींच्या पाठी उभे आहोत या भावनेने त्यांना जमेल तेवढे मनापासून सहकार्य करा….
या कठीण अशा कालखंडात आम्ही समस्त पुरुष मंडळींनी नेहमीच्या विकृत सवयींना बाजूला न सारणे म्हणजे पुढले संकट आपल्या स्वतःवर ओढवून घेण्यासारखे ते नक्की आहे कारण आज तुम्ही गैरफायदा घेताहात त्यामुळे उद्या परमेश्वर तुम्हाला त्याच पद्धतीने अडकवल्याशिवाय राहणार नाही. काम वासनांना दूर ठेवून सहकार्य करणारे फार कमी आजूबाजूला दिसतात ज्यांना त्यांना एखाद्याला मदत केल्यानंतर काम वासनेचा मोबदला म्हणून हवा आहे किंवा ज्यांना असे मदत सहकार्य करणारे अमुक एखादे कुटुंब असते अशा कुटुंबांना केलेल्या तुटपुंज्या सहकार्याचा मोठा मोबदला विविध रूपात हवा असतो आणि त्यासाठी त्यांना सहकार्य करणारे विकृत वासनांध पुरुष तद्दन स्वतःची खोटी माहिती देऊन समोरच्यांना उगाच इम्प्रेस करताहेत उलट त्यातून मदत तर होत नाहीच उलट एखादे कुटुंब आणि तरुण भोळ्या स्त्रिया अशा बदमाश पुरुषांच्या जाळ्यात अलगद अडकतात. फेसबुक वर स्वतःचे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून जाळ्यात इतरांना ओढणारे स्त्री पुरुष आपले छान छान फोटो टाकतात स्वतःबद्दल नको तेवढी खोटी माहिती पुरवून आम्ही श्रीमंत कसे असा भास निर्माण करून अबलांना अलगद जाळ्यात ओढतात त्यानंतर त्यांचे शारीरिक शोषण करून अशा स्त्रियांना भविष्यात अधिक, मोठ्या अडचणी निर्माण करून हे बदमाश मोकळे होतात. हे अतिशय कठीण दिवस पुण्य पदरात पाडून घेण्याचे तयामुळे लिंगपिसाट पुरुषांनी कृपया आपली नजर आणि नियत साफ ठेवून सहकार्य मागायला येणारी आलेली आपली आई बहीण आहे या भावनेने जर मदत केली तर मला खात्री आहे अशा पुरुषांनी आजतागायत केलेली अशाप्रकारची पापे नक्की धुवून निघतील. खरेच या राज्यातले फक्त मध्यमवर्गीय खूप खूप चिंतेत व अडचणीत आहेत त्यांच्या पाठीशी मनापासून उभे राहण्याची खरी गरज आहे. पण तसे फारसे घडतांना दिसत नाही कारण मध्यमवर्गीयांचा कणा त्यांच्या घरातली साफसुथरी तरुण स्त्री असते आणि मदत करणारे तिच्या चेहऱ्याकडे नव्हे तिच्या पायांकडे नव्हे तर तर तिच्या छातीकडे बघून तिला मदत करतात जे अत्यंत वाईट घडते आहे. सरकारने तर जसे गरिबांचे आर्थिक प्रश्न या कठीण दिवसात बऱ्यापैकी सोडवले आहेत ते तसे प्रश्न त्यांनी या मध्यमवर्गीय मंडळींचे सोडवावेत अशी माझी उद्धव सरकारला केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे…
राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढण्याचे हे दिवस नाहीत त्यामुळे राजकीय पत्रकारिता हा माझा मूळ पिंड काही दिवस बाजूला ठेवून काही सामाजिक भान जपता येईल का, आपल्या लिखाणातून ते कसे प्रभावी मांडता येईल याकडे सध्या माझे लक्ष आहे. नोकऱ्या, व्यवसाय, प्रोफेशन्स, शिक्षण, घेतलेली विविध कर्जे, गेलेल्या नोकर्या, थांबलेले शिक्षण, किंवा या दिवसात मिळणारे तुटपुंजे वेतन, घरातली आजारपणे किंवा कोरोनाचा शिरकाव त्यातून कोलमडलेली या घरातली अर्थव्यवस्था या सगळ्यात मध्यमवर्गीय अतिशय अतिशय खूप खूप खुपच होरपळून निघाला आहे, काय करावे हे त्यांना कळत नाही त्यातून अनेकांना व्यसने जडली आहेत किंवा नैराश्येने ग्रासले आहे काहीतरअंथरुणाला खिळले आहेत आणि काही कुटुंब सदस्य तडकाफडकी देवाघरी निघून गेले आहेत अशा महा कठीण कालखंडात ज्या मध्यमवर्गीयांकडे मोठे दुर्लक्ष झालेले आहे त्यांना खरेतर या कठीण प्रसंगातून कोणीतरी बाहेर काढण्याची खरी आणि नितांत गरज आहे आवश्यकता आहे पण सरकारचे आणि इतर दानधर्म करणाऱ्यांचे राज्यातल्या या त्रासलेल्या मध्यमवर्गीय लोकांकडे अजिबात लक्ष नाही त्यामुळे त्यांची मोठी हेळसांड होते आहे. या राज्यातले बहुतांश बदमाश विकृत पुरुष मंडळी या मध्यमवर्गीय मंडळींचा ओळखीतून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा गैरफायदा घेताहेत जी अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्यांना आपण सहकार्य करतो आहे मदत करतो आहे ते करून या कानाचे त्या कानाला कळू न देता बाजूला व्हायचे असते पण तसे अजिबात घडतांना दिसत नाही याउलट बहुतेक वासनांध पुरुष मंडळी महत्वाची दैनंदिन कामे बाजूला ठेवून एखादे सावज जाळ्यात अडकते का जसे मासे पकडणारे नदीच्या काठी कित्येक तास बसलेले असतात त्यापद्धतीने हे अति कामांध पुरुष त्या सोशल मीडियावर जाळे टाकून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतांना दिसतात. शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मी माझ्या घरात देखील सांगतो कि जेव्हा तुमच्याकडे पैसा येतॊ तेव्हा तो साठवून ठेवायचा असतो पण अलीकडे या मध्यमवर्गीय घरातल्या अर्धवट विचारांच्या तरुण तरुणींना पाश्चिमात्य विचारांनी इम्प्रेस केले असल्याने त्यांना सेव्हिंग या महत्वाच्या शब्दाचा प्रामुख्याने विसर पडला असल्याने देखील या महामारीत त्यांच्यावर हे कठीण क्षण ओढवले आहेत. आपण जगणे आणि इतरांना जगवणे हे या दिवसात अत्यंत महत्वाचे असे वाक्य आहे असे मला वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top