मी तुम्हाला बघून घेईन : पत्रकार हेमंत जोशी
ज्या बालकांना आई वडिलांच्या कुशीत पहुडण्याचे योग नव्हते, ऐन तारुण्यात जर पती पत्नीला एकमेकांच्या बाहुपाशात येण्याचे योग चालून आलेले नसतील आणि वार्धक्यात जर नातवांना जवळ घेऊन चार चांगल्या गोष्टी सांगण्याचे भाग्य लाभले नसेल तर त्यांच्यासारखा दुर्दैवी या जगात नाही. आणि हे सुख या कोरोना महामारीत अनेकांपासून हिरावले जाते आहे कारण जिकडे बघावे तिकडे प्रेतांचा खच पडलेला आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेचा निर्लज्ज व बेफिकीर स्वभाव आणि मोस्ट फेल्युअर व पैशांसाठी हपापलेले राज्यकर्ते त्यातून संपलेला कोरोना पुन्हा जोरात उफाळला आणि बघावे तिकडे मृत्यूचे थैमान आणि आजाराचे तुफान घोंगवायला लागले आहे. जशी कंगना राणावत चुकून उद्धव ठाकरेंना नावाचा एकेरी उच्चार करीत, उद्धव मी तुला बघून घेईन, म्हणाली होती तसे मी पण माझ्या मनाशी म्हणालो होतो कि या राज्यातल्या काही बदमाश सरकारी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना बघून घेईन, त्यातली छोटीशी कामगिरी पार पाडलेली असली तरी अद्याप मोठी लढाई बाकी आहे आणखी काही मंत्र्यांना तर मी नक्कीच बघून घेईन ज्यांनी लाज सोडलेली आहे आणी ते व त्यांचे साथीदार प्रेताच्या टाळूवरचे लोणी निर्लज्ज होऊन बनून खाताहेत. या सरकारमधले काही आजी माजी मंत्री व काही शासकीय अधिकारी तर पैसे खाण्यात एवढी खालची पातळी गाठलेले होते किंवा आहेत कि मला वाटते ते बायकोशी सेक्स करण्याचे देखील तिच्याकडून पैसे घेत असतील. मला अत्यंत वाईट याचे वाटते कि काही माझ्यावर भाजपा धार्जिणा असल्याचे आरोप करून मोकळे होतात आई शपथ ज्या आरोपाला अजिबात अर्थ नाही याउलट माझे भाजपापेक्षा शिवसेनेवर अधिक प्रेम आहे आणि मी कडवा हिंदू आहे माझ्या मराठी माणसावर तर मनापासून मी प्रेम करणारा आहे…
घरातल्या सदस्यांना मी हात जोडून विनंती करीत असतो कि माझ्यासारख्या संवेदनशील माणसावर लेखणीरूपी शस्त्रे खाली ठेवण्याची तेवढी वेळ तुम्ही माझ्यावर आणू नका फक्त सावध राहा सावधगिरी बाळगा. प्रदीर्घ राजकीय लिखाणाच्या अनुभवातून आणि लोकांशी सततच्या संभाषणातून असे वाटते कि उद्धव ठाकरे यांनी पुढल्या काही दिवसातच आपणहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे ज्यात त्यांचे त्यांच्या नाजूक तब्बेतीचे त्यांच्या शिवसेनेचे भले आहे. मनाचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरणे हि भाजपाची पद्धत त्यापेक्षा संस्कृती नाही एकदा का सटकली कि रस्त्यावर येऊन राडा करणे हे मला वाटते राष्ट्रवादी आणि शिवसेनेला छान व अधिक जमते पण नेमके तेच सत्तेत असल्याने त्यांच्या सध्या मनापासून चिडलेल्या सामान्य कार्यकार्त्यांना किंवा अनेक नेत्यांनाही रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणे शक्य झालेले नाही पण तो दिवसही दूर नाही कि हेच सत्तेतल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा सैनिक शंभर टक्के आपल्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून राडा करतील, माणसे का मरताहेत याचा आंदोलने करून जाब विचारतील कारण मेलेले आणि मरणारे बहुसंख्य त्यांच्याच घरातले आहेत अर्थात त्यात भाजपा नाहीत असा हास्यास्पद दावा देखील मी येथे करणार नाही. अगदी अलिकडल्या काही दिवसात राष्ट्रवादीचा एक अतिशय प्रभावी कणखर मराठा नेता मला त्यांच्याच एका नालायक मंत्र्याचा त्याला कसा तेही कोरोना महामारीच्या सहकार्यासंबंधात कसा वाईट अनुभव आला आणि त्याचवेळी त्याला काँग्रेसच्या मंत्र्याने म्हणजे अमित देशमुख यांनी कसे मनापासून सहकार्य केले त्यावर कधी चिडून तर कधी रडून मला सांगत होता एवढे करून तो थांबला नाही तर त्या देखण्या नेत्याने या मंत्र्यांचे आणखी काही किस्से तेही पुराव्यांसहित जेव्हा मला सांगितले त्यातून त्याक्षणी त्या मंत्र्यांचा एक दिवस नक्की अनिल देशमुख करून मोकळे व्हायचे लढा द्यायचा मी मनाशी ठरविले. मी त्याला हेही म्हणालो कि त्या मंत्र्यांचे हे नाटकी पण तेवढेच धोकादायक वागणे, तुम्ही तर थेट श्री शरद पवार यांना अतिशय जवळचे त्यांच्या कानावर का घातले नाही त्यावर पवार साहेबांचे या दिवसातले आजारपण त्यामुळे त्यांना यातले काहीही सांगितलेले नाही पण त्यांच्या कानावर घालणार नाही असे मात्र नक्की नाही, मंत्री आणि शासकीय अधिकारी यांनी या दिवसात घातलेला सावळा गोंधळ, मित्रांनो तो दिवस फार दूर नक्की नाही ज्याचा जाब या मंडळींना नक्की द्यावा लागणार आहे…
आपल्याला पुन्हा एकदा नक्की मुख्यमंत्री होता येईल तेव्हा अनेक वर्षे हे पद आनंदाने नक्की उपभोगता येईल असा सारासार विचार करून या कठीण दिवसात काहीसे हतबल ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावे आणि पार विस्कटलेली शिवसेनेची घडी आधी व्यवस्थित बसवून मग पुढल्या निवडणुकीच्या लढाईला उतरावे जिंकावे आणि परत एकदा मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर दिमाखात विराजमान व्हावे. अन्यथा शंभर टक्के आजची विस्कटलेली पण केवळ वरकरणी सूज आलेली शिवसेना दिवसेंदिवस आणखी आणखी विस्कटत जाईल ज्याचा मोठा फायदा राज्यातल्या काही टग्या मुसलमान नेत्यांना होईल. पुन्हा तेच सांगतो कि उद्धवजी तुमच्या या मराठी राज्यात जर लोकांसमोर तुम्ही कमी आणि अस्लम शेख नवाब मलिक हसन मुश्रीफ इत्यादी वाहिन्यांच्या माध्यमातून जर अधिक वेळ दर्शन देऊन तेच कसे महाराष्ट्राचे खरे व मोठे नेते असे चित्र उभे करीत असतील तर आम्ही मराठी तेही शिवसेना सत्तेत असतांना महाराष्ट्रात राहतो कि भेंडी बाजारात या शंकेने मराठी माणसाच्या मनाचे वेगाने खच्चीकरण होणार आहे तेव्हा हात जोडून विनंती कि सोडा काही चतुर नेत्यांचा आणि या मुसलमान नेत्यांचा नाद आणि बाजूला होऊन लागा पुन्हा पूर्वीच्या त्वेषाने कामाला हि शिवसेना अधिक बळकट करायला…