डॉ. उदय निरगुडकर : पत्रकार हेमंत जोशी

डॉ. उदय निरगुडकर : पत्रकार हेमंत जोशी 

येथे कोणाचेही कोणापासून अडत नसते. अगदी पती पत्नीचेही, विक्षिप्त स्वभावातून तू पाठ करून झोपतेस का, नवरा दुसरा पर्याय लगेच शोधून मोकळा होतो, अलीकडे बायकांचेही त्यांच्या नवर्यावाचून फारसे अडत नाही, त्याही नोकरीनिमित्ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने येथे विशेषतः महानगरातून असे बघायला मिळते कि प्रियकराशी पतीशी पटत नाही, पटणार नाही, नजीकच्या काळात जमवून घेणे शक्य होणार नाही, असे लक्षात आले कि हल्लीच्या अनेक तरुण स्त्रिया देखील एकाचवेळी तबल्यावर आणि डग्ग्यावर थाप मारून मोकळ्या होतात, याचे त्याला माहित नसते, त्याचे याला माहित नसते. त्याला वाटते हि फक्त आपलीच आहे आणि याला देखील हेच वाटते, हि काय जाईल आपल्याला सोडून, पण असे अजिबात नसते, पुरुष काय फसवत, सोडून देतील स्त्रियांना, अहो, आजकल पटत नाही, लक्षात आल्या आल्या त्याच जातात सोडून पुरुषांना, थोडक्यात सांगायचे असे, कोणाचेही कोणावाचून अडत नसते, आपल्याला उगाचच वाटत असते, त्या बैलगाडीखालून शेकडो मैल जाणाऱ्या कुत्र्यासारखे, कि ही बैलगाडी मीच वाहून नेतोय म्हणून…

डॉ. उदय निरगुडकरांना झी वाहिनीवरून तडकाफडकी काढून टाकणे, हा त्यातलाच प्रकार. फारतर हा कुवळेकरांचा ‘ विजय ‘ आहे, असा संशय घ्यायलाही हरकत नाही. सुरुवातीला अतिशय महत्वाचे सांगतो, निरगुडकर सोडून गेले किंवा निरगुडकर यांनी झी वाहिनीचा राजीनामा दिला, असे बाहेर सांगण्यास हरकत नाही, सूचना ‘ झी ‘ च्या सुभाष गोयलांकडून डॉ. उदय यांना देण्यात आली होती, पण खोटे का म्हणून सांगायचे हा यांचा मराठी स्वाभिमानी बाणा, निरगुडकरांनी कोणत्याही बदनामीची चिंता, पर्वा न करता सर्वांना हेच सांगितले, सत्य तेच सांगितले कि मी राजीनामा दिलेला नाही, मला ‘ झी ‘ ने काढून टाकले आहे, डॉ उदय यांचे सत्य सांगण्यातून नुकसान झाले वाटत नाही उलट जसे इतर व्यापारी वृत्तीचे शेठ वागतात तेच सुभाष गोयल देखील वागले, गोयल यांच्याबाबतीतीही तेच झाले, घडले, म्हणजे मालकाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते. मला आमच्यातल्या एका कॉमन मित्राने सल्ला विचारला कि यापुढे निरगुडकर यांनी नेमके काय करायला हवे म्हणजे पत्रकारितेतून, माध्यमक्षेत्रातून बाहेर पडावे किंवा नाही, मी म्हणालो, पडायला नको, आणखी दोन तीन वर्षे त्यांनी जे जसे झी वाहिनीचे भले केले ते तसे दुसर्या एखाद्या वाहिनीचे भले करावे मग सन्मानाने निवृत्त होऊन पुढे पुन्हा एकदा कोणतेही आवडीचे क्षेत्र निवडून मोकळे व्हावे…

तसेही वाहिनी, वृत्तपत्रांची मालकी एखादा दुसरा अपवाद वगळता, अमराठी शेटजींकडेच असते आणि माध्यमातील कोणत्याही शेटजींचे वागणे हे बिर्ला मंदिरासारखे असते म्हणजे आत देव कोणते, ते महत्वाचे नाही पण मंदिर मात्र ‘ बिर्ला मंदिर ‘ म्हणूनच ओळखले जायला हवे, नेमके हेच निखिल वागळे किंवा डॉ. उदय निरगुडकर यांच्या लक्षात आले नाही. सुभाष गोयल यांची झी वाहिनी पेक्षा ती डॉ. उदय निरगुडकरांच्या नावाने जेव्हा ओळखल्या जाऊ लागली, तेव्हाच मला वाटले होते, डॉ उदय निरगुडकरांचा कोणत्याही क्षणी ‘ वागळे ‘ होईल आणि तेच झाले पण वागळे आणि निरगुडकर या दोघात मला जो महत्वाचा फरक जाणवायचा तो असा कि डॉ उदय यांनी झी वाहिनी मोठी केली म्हणून ते मोठे झाले पण वागळे नेहमी केवळ स्वतःवर फोकस असायचे, आपले थोबाड चमकले कि संपले मग वाहिनी च्या इतर अंगांशी त्यांचे अजिबात देणे घेणे नसायचे, निरगुडकर यांनी मात्र झी वाहिनी पोटच्या अपत्यासारखी चहूबाजूंनी मोठी केली, झी वाहिनी त्यांनी प्रत्येक अँगलमधून मोठी केली. पण पुन्हा तेच या शेटजींना लता मंगेशकर यांचे गाणे हिट व्हावे वाटते, लता वैक्तीतक हिट होणे त्यांना अजिबात आवडणारे नसते, म्हणून निरगुडकर गोयलांच्या डोळ्यात खुपले असावेत वरून काही हितशत्रूंचे कान भरणे सुरु होतेच म्हणजे निरगुडकर राज्यसभेवर चालले आहेत, वाहिनीचा अधिक फायदा त्यांना वैयक्तितक होतो आहे, वगैरे वगैरे…

कठोर राजकारणी आणि व्यापारी म्हणजे त्यात सारेच आले उद्योगपती वगैरे, यांना अमुक एखाद्याला दूर करतांना अजिबात मानसिक धक्का बसलेला नसतो, शरद पवार तर या प्रकारात एकदम माहीर आहेत म्हणजे अमुक एखाद्यालाजेव्हा असे वाटत असते कि पवार केवळ आपले आहेत, ते आपल्याला कधीही दूर करणार नाहीत, तो त्याचा केवळ एक भ्रम असतो, पवार केव्हा एखाद्याचा ‘ दत्ता मेघे ‘ करून नजीकच्या काळात अधिक अधिक फायदेशीर ठरु शकतील हे गणित नजरेसमोर आणून मेघेंच्याजागी  प्रफुल्ल पटेल सारख्या अधिक फायदेमंद माणसाला बिलगून चिपकून मिठीत घेऊन पप्पी देऊन मोकळे होतील, सांगणे कठीण असते. इकडे दत्ता मेघे कितीही मोठ्यांदा म्हणालेत, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे दत्त्ताला, त्यावेळी उपयोग शून्य असतो, अशी माणसे, नेते, उद्योगपती केव्हाच दुसऱ्याचे झालेले असतात, हे मी स्वतः बरे झाले करिअर च्या अगदी सुरुवातीला सुरेशदादा जैन किंवा शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्यांच्या संपर्कातून शिकलो आहे, त्यातून मग आपणच ठरवायचे असते, अमुक एखाद्याच्या खूप जवळ जायचे नसते म्हणजे वाईट वाटत नाही, मानसिक धक्का बसत नाही…

झी वाहिनीने डॉ. उदय निरगुडकर यांना भलेही नंतरच्या काळात अधिक प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळवून दिली असेल पण त्याआधी डबघाईला आलेल्या आणि दर्जा या याबाबतीत मागे असलेल्या झी वाहिनीला प्रथम क्रमांकावर आणले ते निरगुडकर यांच्या अथक प्रयत्नातून कष्टातून, जबळपास या राज्यातले १७५ तालुक्के त्यांनी पायाखाली घातले आणि त्या त्या ठिकाणी वैयक्तिक फिरून त्यांनी झी चे जनमाणसातले स्थान अधिक घट्ट केले. ते विविध प्रयोगातून झी वाहिनीचा दर्जा लोकमान्य करायचे, यात शंका घेण्याचे कारण नाही कारण ते तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले आहे. एक दर्शक म्हणून झी वाहिनीचे यापुढे जे आयबीएन लोकमत होणे अपरिहार्य वाटते, नेमके वाईट त्याचेच वाटते. समजा कुवळेकर निरगुडकरांच्या पुढे जाण्यात यशस्वी ठरलेच तर नक्की हत्तीवरून फॉयल यांनी साखर वाटावी आणि ते व्हावे कारण झी वाहिनी लोकांना भावून गेले होती, तिचे मातेरे होऊ नये…

असे अजिबात घडलेले नाही कि डॉ. उदय निरगुडकर यांनी भाजपाच्या विरोधात अमुक एखादया ठिकाणी बाजू  घेतली म्हणून त्यांची हकालपट्टी झाली, असे अजिबात अजिबात नाही. निरगुडकर यांना तेथे ते असेपर्यंत स्वातंत्र्य होते आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा डॉ उदय यांना स्वतःला आणि झी वहिनीला देखील प्रचंड प्रचंड फायदा झाला, डॉ उदय आणि झी वाहिनी, सुभाष गोयल त्यातून सामाजिक स्तरावर खूप खूप मोठे झाले, वरून झी वाहिनीची विस्कटलेली आर्थिक घडी डॉ. उदय निरगुडकरांनी व्यवस्थित बसवूनदिली ती त्यांना तेथे दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच, उदय कितीही चतुर आणि बुद्धिमान असलेत तरी आम्ही मराठी हमेशा भावनेच्या आहारी जात असतो तेच त्यांचे झाले झी वाहिनी म्हणजे नावारूपाला आणलेले माझे आणि गोयल यांचे गोंडस बाळ, असे फक्त निरगुडकरांना वाटत होते, पण डॉ. उदय यांचे गहिवरून काम करणे बघून सुभाष गोयल मात्र गालातल्या गालात हसत होते, भावनिक होणे असणे अशांच्या रक्तातच नसते, उदय मनोमन नक्कीच कोलमडून पडले नाहीत नसावेत पण डिस्टरब झाले असावेत यात शंका नाही…

मराठी माणसाचा तो स्वभाव आहे जो व्यापारी वृत्तीच्या मंडळींचा नसतो, म्हणजे हि माझीच वाहिनी आहे असे मनाशी सांगून डॉ निरगुडकरांनी मोठी प्रसिद्धी मिळवून घेत असतांना तिकडे डॉ. सुभाष गोयल यांचे करिअर मार्गदर्शनाचे पाठ, मराठी दर्शकांना बोअरिंग वाटल्याने त्यांनी गोयल यांच्या त्या तद्दन कंटाळवाण्या झी वाहिनीअवरुन भारतभर दाखविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाकडे पाठ केली म्हणजे असे या राज्यात एकही घर नव्हते कि सुभाष गोयल यांचे झी वाहिनीवर थोबाड दिसले रे दिसले कि त्यांनी चॅनेल बदलले नाही नेमके त्याचवेळी निरगुडकर यांचे झी वाहिनीवरील विविध कार्यक्रमातून होणारे दर्शन दर्शकांना हवेहवेसे वाटत असल्याने, स्वाभाविकपणे सुभाष गोयल यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली वरून त्यांचे निरगुडकर यांच्या विषयीअनेकांनी  कान भरणे सुरु केले होते कि, उदय त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा वाहिनीसाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या उभ्या केलेल्या कंपनी साठी करवून घेताहेत, हे खरे असावे वाटत नाही म्हणजे, झी वाहिनीचा उपयोग उदय निरगुडकर यांनी स्वतःसाठी कधी करून घेतला असेल, खोटे असावे ते. हे अगदी खरे आहे कि झी वाहिनीच्या मालकापेक्षा जगभरातल्या मराठींमध्ये मोठे झाले, होत होते ते डॉ निरगुडकर, पण वेस्टेड इंटरेस्ट न ठेवणारे ते होते ते 

पाकिटे स्वीकारणारे नव्हते, नाहीत, अतिशय वरचे विचार डोक्यात ठेवून डॉ. निरगुडकर यांची वाटचाल असते. वाटचाल होती, एक मात्र याक्षणी नक्की सांगता येणार कि झी वाहिनीच्या लोकप्रियतेचा उपयोग करून, निरगुडकर यांनी उद्योगाचे एखादे जाळे विणून घेतलेले आहे किंवा नाही. समजा अमुक एखादा उद्योग चुकून उभाही केला असेल तर त्यांनी जे केले, बरे झाले, म्हणता येईल,कारण अचानक, कृपया आपण आता याक्षणी बाहेर पडावे, निरोप आल्यानंतर अमुक एखाद्या सेलिब्रिटींचे केवढे नुकसान होते, निखिल वागळे हे उदाहरण आपल्यासमोर नुकतेच घडून गेलेले आहे त्यामुळे निरगुडकर यांचा आर्थिक दृष्ट्या जर ‘ निखिल ‘ झालेला नसेल तर जगभरात फिरून विविध क्षेत्रातून आलेल्या अनुभवाचा फायदा निरगुडकरांना झाला असे फारतर म्हणता येईल. पण अन्य कोणत्याही विषयांवर बोलणे काहीही उपयोगाचे नाही, जे वागळे यांचे झाले तेच निरगुडकर यांचे झाले, गाढवाच्या मागे किंवा मालकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला कि जे होते तेच या दोघांचेही झाले आणि तेच सर्वांचे होते, याला अपवाद लोकसत्ता सारखे फार कमी माध्यमे, आमच्याकडचे संपादक किती मोठे झाले किंवा होतील याचा कधीही लोकसत्ताच्या मालकांनी विचार केला नसावा म्हणून तेथे कुबेर असोत कि गडकरी किंवा गोखले असोत कि केतकर, हे सारे मोठे होण्यात, लोकसत्ता दैनिकाचा मोठा वाट होता, ते लोकमत किंवा अन्य माध्यमांच्या बाबतीत घडणे शक्य नाही म्हणून मी यदु जोशी असोत कि अतुल कुलकर्णी, मोठ्या प्रेमातून त्यांना हेच अगदी जाहीर सांगत आलोय कि स्वतःचा ‘ मधुकर भावे ‘ करवून घेऊ नका, स्वतःला बैलगाडी खालचे कुत्रे समजू नका. आणखी एक येथे नमूद करावेसे वाटले ते असे कि बघा निखिल वागळे यांना जेव्हा आयबीएन लोकमत मधून काढून टाकले त्यांनी खूप थयथयाट केला आणि तुमच्यामुळे मी मोठा नाही तर माझ्यामुळे तुम्ही मोठे झालात हे सिद्ध करण्यासाठी पुढे वागळे यांनी इतरत्र वाहिनींवर जे प्रयोग करून बघितलेत ते सारे फोल ठरले कारण वागळे हे देखील त्या वाहिनी मुळेमोठे झाले होते नेमके उलटे निरगुडकर यांचे त्यांना बाजूला केल्यानंतर ना त्यांनी समाजवादी थयथयाट केला ना हिंदुत्ववादी खणखणाट, ते पक्के व्यवसायिक वागले. जणू काही घडलेच नाही या थाटात म्हणे निरगुडकर पुढल्या तयारीला लागलेले आहेत. आम्हा दोघांचा म्हणजे निरगुडकर आणि माझा कॉमन मित्र म्हणाला तेच खरे आहे, सुभाष गोयल यांनी नक्की उदय निरगुडकर यांना संधी दिली, जगप्रसिद्ध सहज होऊ शकणार्या या क्षेत्रात त्यांनी निरगुडकरांना आणले पण निरगुडकरांनीही त्यांची परतफेड केली, झी ला प्रथम क्रमांकाचे स्थान निरगुडकरांनीच मिळवून दिले…

पत्रकार हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *