PART 2 मंत्री विष्णू सवरा या भामट्यांना आवरा

अनेक वर्षानंतर या राज्याला, आदिवासी विकास खात्याला सभ्य, सुसंस्कृत, सुविचारी, संघाने घडविलेला, सदाचारी, सालस मंत्री विष्णू सवरा यांच्या रूपाने लाभला आहे, आधी झालेल्या इतर आदिवासी विकास मंत्र्यांसारखा केवळ स्वत:च्या खानदानाचा विचार न करणारा आणि अगदी सुरुवातीपासून गरजवंत आदिवासींसाठी धडपडणारा मंत्री सवरा यांच्या रूपाने आपल्या राज्याला मिळाला आहे,आदिवासी पाड्यांवरील रहिवासी सवरा यांच्यात साक्षात आधुनिक साने गुरुजी म्हणून बघतात, त्यांना परमेश्वर मानतात, देव समजतात. पण त्यांच्या सभोवताली मोठ्या खुबीने त्या सावलासारखे दलाल आणि औताडेसारख्या महाबिलंदर, महापापी मंडळींनी मुक्काम ठोकला आहे, सवरा यांच्या कार्यालयात त्यांचे दर्शन कमी औताडे यांच्या भोवताली पिंगा घालणाऱ्या दलालांचेच दर्शन सतत, मोठ्या प्रमाणावर होते. श्रीमान के आर औताडे मंत्री कार्यालयात रुजू होण्यापूर्वी मंत्री सवरायांनी मला वाटते माहिती घेतली नसावी कि शासनाची परवानगी न घेता श्रीमान औताडे का, केव्हा केव्हा, किती वेळा, कशासाठी, कोणासंगे परदेश वारी करून आलेले आहेत, भारताबाहेर जाऊन आलेले आहेत, शासनाने किंवा सवरा यांनी औताडे यांचे पारपत्र ताब्यात घेऊन चौकशी नक्की करावी कि औताडे वारंवार परदेशात जाऊन आलेले आहेत का….? मंत्री विष्णू सवरा यांचे खाजगी सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वी ते जालना येथील लेखा व कोषागारे कार्यालयात कार्यरत होते, त्याच कार्यालयातील एक लेखाधिकारी जी आर चिकटे यांनी त्यांच्याकडे श्री औताडे यांच्या विरोधात असलेले सबळ पुरावे आणि त्यांच्यावर श्री औताडे यांनी केलेला अन्याय लेखी स्वरुपात, अगदी व्यापक मंत्रालयातील सामान्य प्रशासन बिभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी स्वरुपात, सपुरावा मांडला आहे, तशा स्वरूपाचे लेखी पुरावेच चिकटे यांनी लिहिलेल्या पत्रातून मांडले आहेत….

विष्णुजी कि रसोई मध्ये माफ करा, कार्यालयात औताडे आल्या आल्या,आल्यापासून दररोज नको ते काहीतरी घडते आहे, जे आधीच्या आदिवासी विकास खात्याच्या मंत्र्यांनी केले ते तसेच जर विश्नुजींकडे घडत राहिले तर त्यांना बदनाम व्हायला पुढले सहा महिने आता पुरेसे आहेत. कृष्णाई निवास, राजर्षी शाहू नगर, अंबड रोड, जालना याठिकाणी राहणाऱ्या आणि लेखा व कोषागारे कार्यालयात लेखाधिकारी म्हणून काम करणाऱ्या जी आर चिकटे यांनी औताडे यांच्या विरुद्ध केलेल्या लेखी तक्रारीत अनेक आरोप केलेले आहेत. ते म्हणतात, औताडे तुम्ही कोषागार कार्यालय जालना येथे असतांना माझ्यावर सरळ सरळ अन्याय केलेला आहे. माझा मुल पदभार अप्पर कोषाधिकारी असतांना त्याजागी तुम्ही आपल्या जातीच्या माझ्यापेक्षा सेवा ज्येष्ठतेणे कनिष्ठ असलेल्या श्री जगदाळे आणि श्रीमती बांगर यांना पदभार देऊन ठेवलेला आहे. शासनाची आणि माझी शुद्ध फसवणूक तुम्ही केलेली आहे. आपण २६.४.२०१३ ते १३.५.२०१३ या कालावधीत माझ्यापेक्षा सेवाज्येष्ठतेने कनिष्ठ असलेल्या श्री जगदाळे यांना आपला कार्यभार देऊन वरिष्ठांची किंवा शासनाची परवानगी न घेत परदेशी यात्रेवर निघून गेला होता.चिकटे पुढे लिहितात, विना परवानगी तुम्ही जानेवारी २०१४ मध्ये सतत आठ दिवस कार्यालयात उपस्थित नव्हता, त्यांनी त्यावर चौकशीची मागणी केलेली आहे. असे तर नाही कि या आठ दिवसात औताडे पुन्हा एकदा परदेश यात्रेवर निघून गेले होते, चीक्तेंच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी…..पुढे चिकटे म्हणतात, कोषागार कार्यालय, जालना त्याच्या नुतनीकरण कामावर तुम्ही बांधकाम खात्यातील काही अभियंत्यांना हाताशी धरून जवळपास एक कोटी रुपये एवढी आवश्यकता नसतांना खर्च केलेत, त्यावर मी सांगतो त्या पद्धतीने चौकशी केल्यास शासनाचे पर्यायाने जनतेच्या पशांची, तब्बल एक कोटी रुपयांची कशी वाट लावली हे उघड होईल, तुमचे पितळ उघडे पडेल…..आपल्या चार पानी पत्रात श्री चिकटे यांनी औताडे यांच्य्वर असे अनेक आरोप करून चौकशीची मागणी केलेलि आहे, औताडे हे भ्रष्ट कसे त्याचे पुरावे उघड केलेले आहेत.इकडे सवरा यांच्या कार्यालयातील वातावरण सध्या कमालीचे बिघडलेले आहे कारण वाळूंज आडनावाच्या आपल्या मेव्हण्याला आदिवासी विकास विभागातील कंत्राटे मिळवीत म्हणून विशेषत: आदिवासी विकास विभागात जेथे मोठ्या प्रमाणावर खाबुगिरी आहे त्या प्रशिक्षण किंवा पुरवठ्याची विविध कामे, कंत्राटे वाळूंज यांना मिळवीत म्हणून औताडे कार्यालयातील काही ‘अनुभवी’ कर्मचार्यांना वेठीस धरताहेत, त्यावर हे कर्मचारी अस्वस्थ आहेत असे समजते…..राष्ट्रवादीच्या ज्या ज्या मंत्र्याकडे आदिवासी विकास विभाग हे खाते असायचे, त्या त्यावेळी त्यांना गव्हाणे आडनावाचा कंत्राटदार खूप खूप जवळचा असायचा तो अलीकडे औताडे यांची सर्व प्रकारे सेवा करण्यात गुंतला असल्यानेही कर्मचारी वर्ग हतबल आणि अस्वस्थ आहे.केवळ काही महिन्यात सवरा यांच्या कार्यालयात हे असे भ्रष्टाचारी औताडे युग सुरु झालेले आहे, बघूया मंत्री विष्णू सवरा औताडे यास हाकलून लावतात कि आणखी आणखी जवळ घेऊन आघाडीच्या मंत्र्यान्प्रमाणे गोंधळ घालून मोकळे होतात…..वास्तविक जी आर चिकटे यांनी के आर औताडे यांच्या विरोधात जी चार पानी तक्रार केलेली आहे त्यावर मंत्री सवरा यांनी सक्त चौकशीचे आदेश देऊन जोपर्यंत तुमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्यात परत जा, सांगायला हवे, हे असे घडले तर सवरा यांची मान आणखी आणखी उंचावेल आणि तसे घडले नाही तर सवराहेच संशयाच्या भोवर्यात सापडतील असे आम्हाला वाटते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *