OFF THE RECORD review on todays headlines….

OFF THE RECORD review on some of todays headlines….

1. Sena Corporator ranked among top in city, held accepting 15,000 bribe.

तंग  आलो आहे टाईम्स ऑफ इंडियाच्या दलालीने.. जिथे बघो तिथे एकतर जुन्या राजकीय बातम्या (ट्रान्सलेट केलेल्या) नाहीतर पेड न्यूज…आज टाईम्सच्या दुसऱ्या पानावर बातमी आहे ती सेनेची एक नगरसेविका लाच घेताना पकडल्याबाबत…. बातमीनुसार जी बाई पकडली गेली आहे, हेमांगी चेम्बुरकर, म्हणे हि मुंबईची टॉप नगरसेविका होती.. कोणत्या आधारावर टी टॉपवर होती हो टाईम्स ग्रुप? आता हा मजकूर कोण तपासत? मध्ये असेच मुंबई मिररने (टाईम्स ग्रुप) असेच आपल्या एका “छपरी” पत्रकारानुसार टॉप नगरसेवकांची बातमी फ्रंट पेज लावली… एका नगरसेवकाने त्या बातमी मध्ये येण्यासाठी प्रयत्न केलेत, पण पत्रकाराचा आकडा ऐकून त्याने स्वतः माघार घेतली…एखाद दुसरे पत्रकार सोडले तर बाकीचे नुसते दलाल्या करत असतात…. आता तर ऐकले आहे कि टाइम्स मध्ये रिटायर पण होण्याची भीती नाही… जर तुम्ही “बिझनेस” मध्ये उत्तम असाल तर तुम्हला प्रत्येक वर्षी नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जातील… वाह !! 

2. Uddhav meets Hardik Patel 

कोण हार्दीक पटेल? गुजराथ मध्ये पाटीदार आंदोलनाचे प्रमुख आणि ‘पटेल’ जातीच्या आरक्षणासाठी लढणारा हा गुजराथमधला तरुण! अख्ख गुजराथ याने खुबीने बंद पाडले होते… आठवत ना?का असे केले होते त्याने?तर म्हणे जातीच्या आरक्षणासाठी? हो…आजकालच्या तरुण पिढीला जर राजकारणात नाव करायचे असेल तर त्यांना जातीच्या भरवशावर आंदोलन केली तरच मोठं होता येत, अशी कदाचित त्यांची समजूत दिसते.. असो…पण हार्दिक पटेलने मातोश्रीवर जाणे आणि उद्धव ठाकरेंनी त्याचे जंगी स्वागत करणे आणि गुजराथ मध्ये १०० सीट हार्दिकच्या भरवशावर लढणे जा निर्णय घेणं, हे जरा अतीच झालं.. मग उद्धवचा जातीचे राजकारण करणाऱ्यांचे छुपे पाठीराखे आहेत का? मग शिवसेनेने मराठा, धनगर आणि महाराष्ट्रातून निघणारे अनेक ‘जातिवंत’ मोर्च्यांना खुले पाठिंबा का देत नाही? आरक्षणाला विरोध आहे ना तुमचा? कसलं काय… सत्तेसाठी काहीपण का?  मित्रहो, आश्चर्य वाटून घेऊ नका जर उद्या उद्धव ठाकरेंनी ‘स्वतंत्र विदर्भ’ ला भाजपला पाठिंबा दिला तर… केवढं हे डेस्परेशन ठाकरेंचं? 


www.vikrantjoshi.com

www.offtherecordonline.com


3. Not tied to BJP: Sena hints at govt walkout 

मागच्या आठवड्यात लिहिले होते.. पुन्हा सांगतो…शिवसेना सत्ता सोडणार नाही… त्यांच्याकडून सोडवतच नाही… अहो, सेनेच्या एका जेष्ठ मंत्र्याकडे परवाच बसलो होतो आणि हा विषय निघाला…म्हणाले आम्ही सगळे २० वर्षानंतर सत्तेवर आलो आहोत…इतके वर्ष नुसते घरातून पैसे टाकून निवडणुका लढवल्या… कफल्लक झालोत.. आम्ही भरपाई तर करणारच ना… हीच स्थिती सेनेच्या आमदारांची सुद्धा आहे… आता सत्तेत असल्यामुळे थोडीफार तरी त्यांची कामे होत आहेत.. कसा पाठिंबा काढणार? पण मला सांगा,  जे सेनेचे खासदार संजय ‘पवार’ पाठिंबा काढू असे  सारखे  चिमटे काढत आहेत त्यांना सेने मध्ये तरी किती महत्व आहे, हे सगळ्यांना ठाऊकच आहे… 

4. BJP pledges to probe 20,000 cr BMC scams

अरे मग इतके वर्ष झोपले होते का तुम्ही? यात भाजपची सारासर चुकी आहे… आम्ही सामान्य जनता…इतके वर्ष तुम्ही सेनेसोबत महापालिकेत सत्तेत होता हेच आम्हाला ठाऊक आहे… जर सेनेने २० हजार कोटींची चोरी केली आहे, तर तुम्ही पण त्यांच्या  एवढेच गुन्हेगार आहात ना?….असेच का भाजपचे नगरसेवक ज्यांची अगदी काल पर्यंत जेवणाची सोय नव्हती ते आज एकदम मस्त लाईफ जगतात का… महापालिकेला नुसतं सेनेनं नाही लुबाडलं.. इथे एकच रुल  आहे… कोणताही पक्ष असो.. प्रत्येक ठेकेदाराला प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला हिस्सा द्यावा लागतो.. टक्के ठरलेले आहेत… आणि त्यात ते हरामखोर अधिकारी… मी तुम्हला सांगतो, येत्या महिन्याभरात कोणाचीही सत्ता येऊ द्या, पुन्हा आम्ही पत्रकार काही हजार कोटींचे भ्रष्टाचार तुमच्या समोर नव्याने पुढे आणूच!! 

5. Munde was keen to ditch BJP, join Congress, says Ajit pawar 

अजित पवारच्या या विधानाला कोण दुजोरा देणार? आपले पत्रकार मनमोहन सिंहला थोडीच जाणार हे विचारायला… म्हटले तर, मला विश्वास नाही बसत या बाबतीत…गोपीनाथ मुंडे दरम्यानच्या काळात नाराज होते, पण मला आठवत त्यांनी केलेलं त्यावेळेला केलेले विधान… कि कधीही पक्ष सोडणार नाही… म्हणून तथ्य वाटत नाही..  अजित पवारांचं काय बाबा… उद्या थेट पारशी समाजात जायचं सुद्धा ठरवतील… अल्पसंख्यांक म्हणून… नाहीतरी पारश्यांवर खास ‘प्रेम’ आहेच दादांचं… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *