Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

OFF THE RECORD Budget Session Highlights Part 3

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
1

१. राष्ट्रवादीच्या  एका माजी आमदाराने अहोरात्र कष्ट करून जळगाव जिल्ह्यात एक धरण बांधायला घेतले. अपक्ष निवडून आल्यामुळे आणि मोबदल्यात काहीही न घेतल्याने २००९ सालचे हे आमदार तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकदम लाडके. पण या कष्टकरी आमदारालासुद्धा २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेत हार पत्करावी लागली. असो, परवा विधान भवनात ते माजी आमदार भेटले. एरवी हसतमुख असणारे हे आमदार थोडेसे नाराज दिसत होते. नुकतेच अजित दादांची भेट घेऊन आले असावे. नंतर सूत्रांकडून माहिती घेतली . माजी आमदार आले होते दादांकडून एक पत्र घ्यायला. केबिन मध्ये शिरताच अजित पवार यांनी या आमदाराशी नेहमी जसे बोलतात त्याच प्रमाणे प्रेमाने बोलले, आदरतिथ्य केले. येण्याचे कारण विचारले. धरणा करीता  थोडेफार पैसे मिळावे म्हणून  दादांच्या पत्राची गरज होती. दादांनी हे आधीच ओळखले होते. “कोणाला पत्र द्यायचे सांगा?” “दादा गिरीश महाजन यांना”. होत्याचे नव्हते झाले.” जगाच्या पाठीवर कोणाला ही  सांगा , मी लगेच पत्र देतो, पण गिरीशला मात्र मी नाही लिहिणार” दादा ठामपणे म्हणाले. 

              माजी आमदाराचे नाराजीचे कारण मला कळले होते . पण अजित दादा, अहो गिरिश महाजन यांनी नुकतीच सिंचन विभागाची  कागदपत्र सोपवली आहेत, चौकशी अजून कोणालातरी करायला सांगितली आहे हो! गिरीषभाऊचा  काय संबंध?  एकदा डुख धरले कि झाले, कोण समजावणार तुम्हाला ? गिरीष भाऊ पिस्तुल ठेवतात पण सांगितले कीच चालवतात… पण वाचकहो, ताज्या बातमीनुसार माजी आमदाराने दादांकडून मग थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले। 

२. मंत्री विनोद तावडे यांनी मोदी जॅकेट घालणे का बंद केले?

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी घालतात म्हणून

ब. बायकोने सांगितले म्हणून .

क. की आता केशव उपाध्ये ही घालतात म्हणून…

३. मागे चार एक दिवसअगोदर मुंबई  भाजपच्या एका “राईसइटर” आमदाराला आपल्या  थोरल्या भावामुळे तोंडाघशी पडण्याची वेळ आली होती. खबर अशी की, आमदार महोदय बोरीवली येथे एका सोसायटीमध्ये राहतात. तेथे राहणाऱ्या एका स्त्रीने या आमदाराच्या मोठ्या भावाच्या कानाखाली लगावून दिली. साधा एक भाजीवाला बिल्डिंगमध्ये येउन भाजी कसा काय विकतो, हे या बाईला पटले नाही. सगळे तिची समजूत काढण्यात मग्न असताना आमदाराचा भाऊपण समजावण्यात व्यस्त झाला. पण काय घडले कोणाला ठाऊक,  काही समजण्यापूर्वी या बाईने

आमदाराच्या भावाला कानाखाली लगावली. दुसऱ्या दिवशी आमदार भेटले. प्रकरणाबद्दल विचारले. “ती बाई वेडी आहे. बिल्डिंगमध्ये थोडेही काही

घडले की ती सरळ मारामारी करायला लागते. म्हणून तिला समजवण्या पलीकडे काहीपण करता येत नाही” असे आमदारला सावध केले. आमदार बाबा तुम्ही सध्या खूप समाजकरणात व्यस्त असतात. जरा बिल्डिंग मध्ये सांभाळून येत जा …हवालदार असू द्या नेहमी सोबत… 

४. नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात परत उतरले आहेत. कितीही म्हटले तरी तसा मतदारसंघ नवीन. आज मतदान सुद्धा आटोपले.  जर त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांशी जर तुम्ही बोलले, तर समजेल की आजकाल राणेंना एकूणच सर्व प्रकारच्या माणसांनी घेरलेले आहे. मग त्यात बांद्रामध्ये राहणारे काही काँग्रेसी नेते असतील, काही विश्लेषक असतील,  काही नवीन जुने मित्र असतील, पण गम्मत म्हणजे हे सगळे लोक राणेंना कोणीही तंतोतंत माहिती दिली नाही . पण पाकीट मात्र मोठे घेतले आहे. असो. चालत. पण माहितीनुसार, ज्या दिवशी नितेश राणे ओवासी यांना भेटायला गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा एक मोठा नेता, जो आता मंत्री आहे, तोही भेटला. राणेंची ओवसीला “म्यानेज” करण्याची खेळी शिवसेनेच्या नेत्याने हाणून पाडली. राणेजी जरा संभालके, हर “कदम” पे धोका है!! शेवटी रामसुद्धा १४ वर्षानंतर वनवासातून परतले होते. तुम्ही जॉर्ज फर्नांडीस व्हा… इंदिरा गांधी यांनी त्यांना हरवण्यासाठी लाख प्रयत्न केले… ते चार वेळा हरले, पण शेवटी मात्र फिनिक्स पक्षासारखे त्यांनी भरारी घेतली आणि कधीही पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 

५. बातमी एका जाधव नामक क्लास वन अधिकाऱ्याची! सध्या महाशय कोकण भवनात काम करतायेत. पण माहितीनुसार  जाधवांच्या घरी

वातावरण नेहमीच तापलेले  असते. जाधव हा परभणीच्या एका कॉंग्रेस माजी आमदाराचा जावई. श्रद्धा नामक मैत्रीणीमुळे आपले जाधव साहेब आता एका आशिकासारखे वागतांना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.  एरवी अंगाला  वास येणारा जाधव आता कपड्यांना सेंट लावतो , चकचकीत दाढी करतो… साहेबांनी चांगलेच पैसे खर्च करून सांताक्रूझला एक अलिशान दुकान श्राद्धाला  “भेट” म्हणून उघडले आहे… अगदी इर्लाला जसे अल्फा आहे तसे… आणि असे ऐकले आहे, की जमीनी सुद्धा  आता श्रद्धाताईच्या नावावर आहे. अहो जाधव, तुमच्या सांताक्रूझच्या दुकानात “कैलाश” जीवन मिळत का हो?

६. मिळाल्या माहितीनुसार विधान भवनात जो मेन पोर्च  आहे त्याचे नामांकरण करायचे आहे. मी लगेचच सुचविले, “जितेंद्र आव्हाड चौक” … 

Previous Post

Budget Session OFF THE RECORD

Next Post

परत या, परत या! राणे साहेब सभागृहात परत या!!

tdadmin

tdadmin

Next Post

परत या, परत या! राणे साहेब सभागृहात परत या!!

Comments 1

  1. Avatar Anil Galgali says:
    6 years ago

    भ्रष्ट्राचाराची कृपा

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

    पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Nana Patole & traffic police!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हि विकेट हवी : पत्रकार हेमंत जोशी 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खून कि आत्महत्या : मंत्रीजी नेमके उत्तर द्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूजा अरुण, पूजा लहू कि पूजा संजय !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.