OFF THE RECORD

उद्धव ठाकरेंचे जनसंपर्क प्रमुखांचा “आगाऊ” पणा-लोकमत 

काय म्हणायचं याला? सुपारी न्युज? आज लोकमतमध्ये उद्धव ठाकरेंचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांच्या विरुद्ध एक खोडकर बातमी छापून आली आहे. कालच लोकमतचा “महाराष्ट्राज मोस्ट स्टयलिस्ट” कार्यक्रम जुहूच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला.. आदित्य ठाकरेंना युथ आयकॉन पुरस्कार देऊन खुद्द ऋषी दर्डांनी त्यांची मुलखात घेतली. आज पहिल्या  पानावर कार्यक्रमाचे फोटो सुद्धा छापले आहेत… एकीकडे एवढा मान, आणि दुसरीकडे अपमान! आतील पानावर मात्र ज्याने आदित्य ठाकरेला प्रसिद्धीझोतात आणले (त्या मागचे ब्रेन), त्या हर्षल प्रधान विरुद्ध नको ते छापले… अगदी “करून दाखवलं” पासून ते या निवडणुकीचे स्लोगन पर्यंत, जाहिराती बनवणे, फलक तयार करणे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या हर्षल प्रधान यांच्या संकल्पना आहेत..आज जो शिवसेनाला जो  “मॉडर्न” टच आला आहे, (उदा.. ट्विटर, फेसबुक) त्याचे श्रेय फक्त आणि फक्त हर्षल प्रधानांना जाते…  असो.. मूळ बातमी विषयी बोलूया.. 

प्रत्येक प्रसिद्धी प्रमुखांचे काम काय असते? आपल्या नेत्यावर किंवा पक्षावर जर कुठे बदनामी कारक बातम्या किंवा ज्या काही अफवा पसरत असतील त्याची शहनिशा करून आपल्या बॉसला ब्रिफ देणे आणि त्यांचे खुलासे, किंवा आपल्या बॉसने किंवा पक्षाने काही काम केले असेल तर हे सगळं पत्रकारांना “प्रेस नोट” म्हणून पाठवणे… सोशल मीडिया हा जसा आजच्या काळाची गरज आहे, तोच सोशल मीडिया कसा कोणाची बदमानीचे कारण सुद्धा असू शकतो, याचे ज्वलंत उदहारण म्हणजे हर्षल प्रधान विरुद्धची आजची ही बातमी! बातमी मध्ये, हर्षल प्रधानांनी व्हाट्सअपवर मनसे विरुद्धचे जे काही मजकूर होते, ते सगळ्यांना पाठवले, आणि ते चुकीची असून खुद्द उद्धव ठाकरे यांना बाजू सांभाळावी लागली, असे छापले आहे… बातमी मला सुद्धा व्हॉट्सअप वर आली होती…कुठेही हर्षल प्रधानने हि लिहिली आहे यांचा उल्लेख नाही. काय आहे, मी जसे काल लिहिले होते, कि जर सेना आणि मनसे एकत्र आले तर सगळ्यात अपमानित होईल तो फक्त “शिवसैनिक” कारण त्यांना मनसेवर खरंच खूप राग आहे…कोणीतरी सैनिकाने ते लिहिले असेल… साहेबापर्यंत आपले लिखाण पोहोचले पाहिजे या भावनेने  हर्षल प्रधान यांच्याकडे त्याने आपले लिखाण पाठवले असेल… ते लिखाण प्रधानांनी अगदी मनात कोणताही हेतू न ठेवता आम्हा सर्व पत्रकारांना ती पाठवली. फॉरवर्ड असतात न त्या प्रकारे…कुठे ही छापा..किंवा कव्हर करा (जी त्यांची स्टाईल आहे) असे कुठेही नाही….अहो,  पी.आर.ओ काय-काय पाठवतात काय सांगू?  पर्वा एकाने तर मला त्याचा बॉस भर सभेत भाषण करताना कसा पादला हे सुद्धा गमतीने लिहून पाठवले…ते आम्ही छापायचे का?  आजच्या पत्रकारांमध्ये रेस लागली आहे… माझी बातमी…  माझे बायलाईन… तुम्हाला काय सांगू हे प्रसिद्धी प्रमुखवाले कोणत्या थराला जातात ते ?… काही पत्रकारांना ते सरळ सरळ पॅकेजवर ठेवतात आणि हव्या तश्या बातम्या छापून आणतात… तुम्ही ओळखणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला हर्षल प्रधान विषयी विचारा…कारण सगळेच त्यांना ओळखतात… ते आधी पत्रकार होते… २० वर्ष….  सगळे हेच म्हणतील, भाऊ लै कंजूस आहे… आज पर्यंत एक रुपया कधी हि बातमी लावण्यासाठी देणे सोडाच साधी ऑफर सुद्धा केला नाही..सगळ्यांचे सोडा… माझे वय आज ३४ चे आहे… मी हर्षल प्रधान यांना गेली २० वर्ष ओळखतो…अगदी त्यांच्या अख्ख्या खानदानाला…हो त्यांचेकडे पैसे सोडून एका गोष्टीची मात्र खूप साठवण आहे… तो म्हणजे प्रचंड मेहनतीनंतर आलेला अनुभव… माहितीसाठी सांगतो हर्षल प्रधान यांनी अख्ख महाराष्ट्र तीनदा एस.टी. बसने फिरून काढला आहे.. दिग्गज पत्रकार आणि प्रहारचे आजचे संपादक श्री मधुकर भावे हे आज हि ते करतात… कोणता पत्रकार किंवा पी.आर.ओ ने हे केलेले आहे जरा मला सांगा? अहो, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि आता उद्धव ठाकरे या सगळ्यांकडे  सलग २० वर्षांपासून हर्षल प्रधान यांनी सर्व्हिस दिली… सगळे भाजप वाले ठीक आहे… उद्धव ठाकरे यांच्याकडे इतके वर्ष राहणे सोपे आहे का हो? तुमीच सांगा… तेही मिलिंद नार्वेकर यांच्या अंडर? भले भले टिकत नाहीत त्यांच्या “नेतृत्वाखाली” पण  हर्षल प्रधान मात्र आजही ५ वर्षांपासून टिकून आहे…सगळं सोडा, केवढे शार्प आहेत उद्धवजी… त्यांच्या आणि मिलिंद नार्वेकरांच्या नजरेखालून कोणी साधी काडीपेटी तरी नेऊ शकतो का? आणि आजच्या बातमीनुसार लोकमतवाले म्हणतात हर्षल प्रधानांमुळे उद्धव ठाकरेंना बाजू सांभाळून घ्यावी लागली… काय राव? एका सेकंदात कोणताही विचार न करता उद्धव ठाकरेंनी हर्षल [प्रधान यांना घरचा रस्ता दाखवला असता… पण तसे काहीच घडले नाही… म्हणजे उद्धवजी स्वतः कॉन्फिडन्ट असतील तेव्हाच ना…  हो हे खरे आहे कि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कोणता पत्रकार भेटायचं हा अधिकार मात्र संपूर्ण प्रधानांकडे आहे… त्यात कदाचित हा रिपोर्टेर पास नसेल झाला… राग म्हणून हि बातमी दिसते…  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *