भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी

भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्यावर तेही लिखाणातून राग व्यक्त करतांना फार खालच्या पातळीवरजाऊन मी सहसा शब्द वापरत नाही पण या आधीच्या लिखाणात माजीकेंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी लिहितांना त्यांची ‘ गांड फाटली ‘आहे हा शब्दप्रयोग अनेकांनाच्या भुवया उंचावणारा ठरला पण राजकीय पत्रकारितेत वावरतांना काही माणसे अतिशय मस्तकात जातात त्यातले हे महाशय, ज्यांना मी अतिशय जवळून राजकीयदृष्ट्या ओळखतो त्यामुळे त्यांचे नाव जरी नजरेसमोर आले तरी आपली सटकते. पण हे असे क्वचित घडते. अमुक एखाद्याविषयी राग किंवा लोभ त्या त्या लिखाणापुरते संबंधित असतात, कधीही कायम टिकणारे नसतात….

अलीकडे विमानतळावर माझे आणि अजित पवार यांचे तब्बल दहा वर्षानंतर तोंडावर तोंड पडले, बोलणे झाले पण त्याआधी कधीही विनाकारण त्यांचे कौतुक केले नाही किंवा विनाकारण त्यांच्यावर घसरलो नाही. जेथे जेथे दादा योग्य वाटले मनापासून कौतुक केले आणि जेथे जेथे ते अयोग्य वागले वाटले तेथे तेथे ते अगदी सत्तेत आक्रमक नेते असतांनाही त्यांना शब्दांतून लिखाणातून ठोकून काढले. काही नेत्यांनी काही अधिकाऱ्यांनी हे राज्य बुडविण्यात फार मोठी भूमिका बजावलेली असते अशावेळी मग मनापासून सटकते, पुरावे हाती पडले रे पडले कि मग माझे शाब्दिक झोडपणे सुरु होते त्यातून भले भले पत्रकार देखील अशावेळी सुटत नाहीत…

प्रफुल्ल पटेल यांनी ते केंद्रात मंत्री असतांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवार या दोघांनाही एकाचवेळी उल्लू बनवून मोठा आर्थिक गैरफायदा करवून घेतला. ईडी सारख्या शासकीय यंत्रणा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या कधी चौकशा करतील का, नाय नो नेव्हर. या प्रफुल्ल पटेलांनी घोळ घातले म्हणून ईडी त्यांच्या मागे लागली तोवर खरे तर फार उशीर होऊन गेला आहे पण जे काय ईडी च्या हाती लागेल तेही नसेल थोडके त्यामुळे बघूया पुढे पुढे काय होते ते. मी अनेकदा लिखाणातून पवारांना फार पूर्वी सांगितले, वारंवार सांगितले कि प्रफुल्ल पटेल आमच्या विदर्भात तुम्ही वाढविलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे करतो आहे, एक दिवस असा येईल कि याच  प्रफुल पटेलांमुळे तुमची राष्ट्रवादी माझ्या विदर्भात औषधाला देखील सापडणार नाही, नेमके आज तेच घडले….

राजकारणातून निवृत्त होऊ पण प्रफुल पटेल यांच्या लबाड नेतृत्वाखाली अजिबात काम करणे नको असे दत्ता मेघे गिरीश गांधी संजय खोडके अजय पाटलांसारख्या विदर्भात राष्ट्रवादी पक्षात एकेकाळी भरीव कार्य करणाऱ्या नेत्यांना वाटले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीतून बाहेर पडणे पसंत केले. ज्यांनी तसे केले नाही त्यांचा अनिल देशमुख झाला, प्रफुल्ल पटेलांची हुजरेगिरी करणाऱ्या अनिल देशमुखांनी भलेही पैसे अमाप मिळविले असतील पण केवळ बख्खळ पैसा असणे म्हणजे सुखी आयुष्य जगणे नसते त्यांच्या ते लक्षात आले तोवर उशीर झाला होता, अनिल देशमुख तसा प्रचंड राजकीय ताकदीचा नेता पण काही काळासाठी नोव्हेअर झाला, आता अनिलबाबू राजकारणात पुन्हा एसट्याब्लिश होण्यासाठी झगडताहेत, प्रयत्न करताहेत. पण मी जे बेंबीच्या देठापासून शरद पवारांना सांगत होतो कि तुमच्या या अशा बेधुंद वागण्याने विदर्भातली तुम्ही उभी केलेली नेत्यांची फळी आणि राष्ट्रवादी रसातळाला जाईल, माझे ते सांगणे पवारांना आज पटले असेल, आता विदर्भात राष्ट्रवादी अस्ताला गेलेल्या माकडांच्या काही प्रजातींसारखी शोधावी लागते कारण पवारांनी पटेलांसारख्या मधुर फळांचा नाश करणाऱ्या माकडांना जवळ केले आणि मेघेसारखे सहकारी अपमानित केले…

क्रमश :

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *