परिच्छेद २ : पत्रकार हेमंत जोशी

परिच्छेद २ : पत्रकार हेमंत जोशी 

बहोतही गन्दा है पर क्या करू पत्रकारिता मेरा धंदा है, फार कमी असे कि जे पत्रकारिता हे व्रत म्हणून स्वीकारतात त्यांनी व्रत स्वीकारले असते. बहुतेक जे स्वतःला आदर्श म्हणवून घेतात असे वृत्तपत्रात वाहिन्यांवर कार्यरत उलट ज्यादा ढोंगी असतात पण असेही नाही कि पत्रकारितेतले सारेच चित्र निराशजनक आहे, आमच्यातले देखील काही आहेत कि दिनू रणदिवे यांच्यासारखे व्रतस्थ. कालच औरंगाबादवरुन पत्रकार प्रवीण बर्दापूरकरांचा फोन आला होता, बर्दापूरकर किंवा भाऊ तोरसेकर, या चार दोन मराठी पत्रकारांचे कोटींच्या वर जगात वाचक आहेत, फॉलोअर्स आहेत, मग नेहमीचे माझे ते वाक्य कि मी त्यामानाने भाग्यवान कि मी या अशा बिग बिग मंडळींना तर ओळखतोच पण हि मंडळी मलाही जातीने व्यक्तिश: ओळखतात. फार कमी लोकांच्या नशिबी माझ्यासारखे भाग्य लाभणे असते. काही माणसे पत्रकारितेत थेट त्या आकाशाला गवसणी घालून येणारे असतात पण कुमार केतकर यांच्यासारखे असे बोटांवर मोजता येतील ज्यांचे पाय कायम जमिनीवर असतात, ज्यांचे वागणे बोलणे अतिशय नम्र असते, जे माजलेले असतात, तुम्हाला माहित आहे कि असे माझ्या तडाख्यात सापडले रे सापडले कि त्यांचा कसा माज मी उतरवून ठेवतो. आमच्या पत्रकारितेत एक मोठा दुर्गुण आहे कि आमच्यातले बहुतेक एकमेकांना एकमेकांच्या माघारी नावे ठेवतात, एकमेकांची अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उतरून निंदानालस्ती करतात, एकमेकांना संकटात सहकार्य करणे मदत करणे तर राहिले दूर पण एकमेकांची उणीदुणी काढण्यात स्वतःला धन्य समजतात. पत्रकारांच्या अनेक संघटना आपल्या या राज्यात आहेत पण पत्रकारांसाठी लढण्यात त्यांना न्याय मिळवून देण्यात मी यदु जोशी आणि एस एम देशमुख या दोघं ब्राम्हणांना त्यांच्याकडे कायम कौतुकाने बघत आलेलो आहे पण त्यांचेही तेच,म्हे दोघेही एकमेकांची उणीदुणी काढण्यात ज्यापद्धतीने विकृत आनंद घेतात, ज्याची त्या दोघांनाही अजिबात अजिबात गरज नाही. एकमेकांची रेषा पुसण्याचा घाणेरडा प्रयत्न केल्यापेक्षा आपली रेषा कशी अधिक मोठी रेखाटता येईल त्यावर या दोघांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास अन्य गरजू पत्रकारांचे त्यातून अधिक भले साधता येईल. ग्रामीण पत्रकारितेची अवष्ठा मोठी अधिक बिकट आहे, तेथे शंभर दोनशे रुपयांवर तोडपाणी करणाऱ्या अशिक्षित पत्रकारांच्या ढुंगणावर लाथ मारून अविनाश दुधे किंवा देवेंद्र गावंडे यांच्यासारखे ज्ञानी बहुगुणी बहुआयामी पत्रकार कसे निर्माण करता येतील वास्तविक त्यात लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. मी बर्दापूरकर यांना विचारले देखील कि तुमचे त्या औरंगाबाद मध्ये मन कसे काय रमते कारण आपल्या या राज्यात मुंबई पुणे आणि नागपूर हे तीन शहरे सोडल्यास इतर ठिकाणची पत्रकारिता मोठ्या प्रमाणावर अडाणी अशिक्षित आहे, अमुक एखादाच राम शिवडीकरांसारखा किंवा नाशिकच्या हेमंत कुलकर्णी यांच्यासारखा तपस्वी अभावाने नागपूर मुंबई किंवा पुणे सोडून इतरत्र अभावाने जन्माला येतो, बहुतेकांना पत्रकारिता कशाशी खातात हे देखील फारसे माहित नसते. केवळ कसेही करून पोट भरण्याचे साधन म्हणून पत्रकारितेकडे बघितल्या जाते. आपण खाणे आणि मालकांना कमावून देणे हि जी पद्धत मोठ्या प्रमाणावर विविध वृत्तपत्रात विशेषतः वाहिन्यांमध्ये किंवा दैनिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रुजलेली आहे ते दृश्य तर अतिशय लाजिरवाणे. आमच्या या मुंबईत ज्या ज्या दैनिक वृत्तपत्रांनी मोठमोठ्या शासकीय जमिनी मोक्याच्या ठिकाणी हडपून त्यावर इमारती बांधून त्या भाड्याने देऊन जे मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे साधन स्वतःसाठी उपलब्ध करवून घेतलेले आहे, लोकमत च्या दर्डा कुटुंबाने तर भूखंड हडपण्यात लाजच सोडलेली आहे. वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांचे विशेषतः मंत्रालय प्रतिनिधी केवळ यासाठी पोसून ठेवलेले आहेत कि या अशा प्रतिनिधींनी स्वतःचा दबावगट निर्माण करून भूखंड सरकार ताब्यात घेणार नाही याची तेवढी कायम काळजी घ्यावी. पत्रकारितेतली रंडीछाप दलाली यापेक्षा आणखी मोठी असूच शकत नाही. असे एकही वृत्तपत्र नाही किंवा वाहिनी नाही कि त्यातले मान्यवर नेमके कुठली पद्धत वापरून बक्कळ पैसे जमा करताहेत, मला हि सारी मंडळी आणि रस्त्यावर धंदा घेणाऱ्या वेश्या यांच्यात काडीचाही फरक जाणवत वाटत नाही. सरळ मार्गाने चालणाऱ्या माध्यमांची अवस्था आणि आयुष्य मोठे बिकट असते, डोळ्यात अश्रू आणणारे असते…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *