आशिष शेलार एक चमत्कार : पत्रकार हेमंत जोशी

आशिष शेलार एक चमत्कार : पत्रकार हेमंत जोशी 

फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया माझे उत्पन्न वाढण्याचे ओळखी वाढण्याचे प्रसिद्धी मिळण्याचे फार मोठे साधन आहे पण तुम्हाला ते केवळ एक टाइम पास करण्याचे माध्यम आहे. त्यावर फार वेळ खर्च करू नका, स्वतःचे मोठे नुकसान करवून घेऊ नका. मी आक्रमक लिहितो त्यामुळे अनेक तरुणी, विविध वयोगटाच्या कितीततरी स्त्रिया माझ्या लिखाणाला लाईक करतात. लाईक करतात याचा अर्थ असा नाही कि त्या मला लाईक करतात, तुमच्या अमुक एखाद्या पोस्टला एखादीचे लाईक आले याचा अर्थ ती त्या पोस्टवर फिदा आहे तुमच्यावर नाही, लगेचच तुम्ही पुढल्या कामाला लागता ते योग्य नाही त्यामुळे तरुण स्त्रियांचा खानदानी तरुणींचा चांगल्या वृत्तीच्या पुरुषांवरून विश्वास उडाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. एक विश्वासू विनामतलबी विकृती न बाळगणारा मी तुमचा सच्चा मित्र आहे खरा साथीदार आहे असे विश्वासाचे चित्र त्यांच्यात निर्माण केले तर काही पुरुषही चांगले असतात यावर त्यांचा नक्की विश्वास बसेल. माझे असे अनेक मित्र आहेत कि ज्यांना उत्तम पत्नी लाभलेली असतानाही त्यांची बाहेर कीप आहे आणि त्याचवेळी तिसरीवर नजर आहे. हिम्मत नसेल तर पुरुषांनी बाहेर लफडी करू नयेत कारण जेव्हा केव्हा कोणत्याही वयोगटाची भारतीय स्त्री तुमचा हात हातात घेते, प्रेमाने हात घट्ट पकडते त्याक्षणापासून तुम्ही अगदी विवाहित असलात तरी ती तुमच्यात भावी पती बघते, तिला फसवू नका. छान मैत्री तर करून बघा त्याचा आनंद प्रेयसींपेक्षा देखील अधिक उबदार असतो…


www.vikrantjoshi.com


काही नेते अनेकदा आपल्या पत्नीला जेथे तेथे यासाठी मिरवितांना दिसतात कि त्यांना त्यातून हे दाखवायचे असते कि मी चारित्र्यवान आहे वास्तविक असे काहीही नसते. फडणवीस किंवा आशिष शेलार कुठे त्यांच्या बायकांना असे जेथे तेथे मिरवितांना दिसतात, स्त्रियांच्या विषयी त्यांच्यावर त्यांचे शत्रू विरोधक देखील शिंतोडे उडविणार नाहीत. अलीकडे जेव्हा मी अशोक चव्हाणांना पत्नीचे सोशल मीडियावर आभार मानतानांचे फोटो बघितले, का कोण जाणे माझे हसून हसून पोट दुखले. आमचा हा बांद्रा ते सांताक्रूझ विधान सभा मतदार संघ मोस्ट मॉडर्न, शेलारांसारख्या हँडसम आक्रमक नेत्यांना तर हवे तेवढे मिळेल पण शेलार लफड्यात अडकले आहेत, रंगीले आहेत असे कधीही कोणीही बघितलेले नसल्याने किंवा ते तसे नसल्याने आमच्या या मतदारसंघातली किंवा एकेकाळी मुंबई भाजपाध्यक्ष नात्याने त्यांच्या पक्षातल्या किंवा विविध ठिकाणावरून विविध कामांसाठी कितीतरी तरुण स्त्रिया मुली वेळकाळ न पाळता थेट त्यांच्याकडे जातात व आपले काम करवून घेतात कारण त्या सार्या आशिष मध्ये थेट मोठा लाडका आदरयुक्त दादा भाऊ बघतात, विशेष म्हणजे एरवी पडदा बुरखा पद्धत पाळणाऱ्या आमच्या या मतदारसंघात कितीततरी तरुण मुस्लिम स्त्रिया, अगदी त्यांच्या घरातले ऑर्थोडॉक्स पुरुष देखील त्यांना आशिष शेलारांना यासाठी भेटण्याची बिनधास्त मोकळीक देतात कारण शेलार हे भेटणार्या प्रत्येक स्त्रीकडे सख्खी बहीण भेटायला आलेली आहे, पद्धतीने वागणूक देतात…


हा मुद्दा मी आशिष यांच्याबाबतीत याआधीच मांडलेला आहे तो पुन्हा सांगतो कि अनेक नेते असे असतात कि ते अमुक एखाद्याच्या घरात या ना त्या निमित्ताने घुसतात आणि त्या घराचे फार मोठे नुकसान करून ठेवतात. येथे आशिष शेलार आमच्या या परिसरातले एकमेव मोठे नेते ज्यांना येथे कोणत्याही कोणाच्याही घरी थेट किचन पर्यंत प्रवेश असतो, घरी कुटुंब प्रमुख असेलही किंवा नसेलही त्यांना आमच्या या मतदारसंघातील प्रत्येक घरात जणू एक कुटुंब सदस्य म्हणून थेट प्रवेश असतो. कोणत्याही जाती धर्माचे कुटुंब आशिष शेलार यांना आपल्यातलेच एक जणू मोठे भाऊ या नजरेने बघतात आणि आशिष देखील त्याच सभयतेने त्यांच्याशी वागतात बोलतात म्हणून एक आमदार एक नामदार एक दमदार तडफदार दिलदार आमदार म्हणून शेलार हे साऱ्यांना अगदी मनापासून भावतात त्यामुळे त्यांच्यासमोर कोण उभे आहे, कोण निवडणूक लढवते आहे, कदाचित सांगून तुम्हाला खोटे वाटेल पण मतदारांना त्याचे नाव गाव काहीही माहित नसते, साऱ्यांचे लक्ष्य आशिष शेलारांना भरगोस मतांनी निवडून आण्याचे असते, यावेळी देखील आशिष त्यांच्या कमळचिन्हावर मोठ्या फरकाने नक्की निवडून येणार आहेत, हार तुरे तयार आहेत…

क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *