एकूण वातावरण : पत्रकार हेमंत जोशी


एकूण वातावरण : पत्रकार हेमंत जोशी 

मी आणि माझा पत्रकार मुलगा विक्रांत २४ तास गेली कित्येक वर्षे आगीशी एकटे खेळत आलोय. पण सच्च्या पत्रकारितेचा वारसा घेणाऱ्याने मृत्यूचे संकटाचे भय सोडून द्यायचे असते उलट आता असे झाले आहे कि जगभरातल्या २० लाख मराठी वाचकांमधून धमक्या आल्या नाही टीका झाली नाही आमच्या विषयी विविध गॉसिप्स वर राजकीय वर्तुळात जर चर्चा रंगल्या नाहीत कानावर पडल्या नाहीत तर आम्हाला चुकल्यासारखे वाटते. पुरावे असल्याशिवाय लिहायचे नाही हे मी विक्रांतला सांगून ठेवलय, भडकविणारे आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून असतात आपण त्यांच्या भडकविण्यातून लिखाण करायचे नाही हेही त्याला सांगून ठेवले आहे. शरद पवार यांचे माझ्यावर कधीकाळी अनंत उपकार आहेत त्यामुळे त्यांनी मध्यंतरी फोन करून विक्रांतकडे नाराजी व्यक्त केली ते त्यांचे योग्य होते कारण विक्रांतने ऐकीव माहितिच्याआधारे बऱ्यापैकी चुकीचे लिहिले होते. पत्रकारितेचा हा असा पराभव होता कामा नये. पण जसजसे अनुभव येतात त्यातून माणसाने शिकत जायचे असते घाबरून न जाता त्यातून  टिकून राहणे शक्य होते…

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे, शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका पुन्हा एकवार ताब्यात न आल्यास त्यातल्या अनेकांना वेड लागण्याची दाट शक्यता आहे त्यांच्यासाठी निवडणूका जिंकणे जीवन मरण्याचा प्रश्न असतो त्या आटोपेपर्यंत या सरकारला अजिबात धोका नाही आणि काँग्रेस व राष्ट्रवादीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून तोपर्यंत अजिबात भय नाही, तुम्ही म्हणाल तसे आणि सांगाल तसे, हे असे १००% उद्धव ठाकरे यांचे धोरण असेल म्हणजे उद्या पवार म्हणालेत कि उद्धवजी चालत माझ्याकडे या तर हे पळत जातील. आणि याच मोक्याचा फायदा घेत पवार त्यांचे एक फार मोठे काम उद्धव यांच्याकडून करवून घेताहेत पण त्या कामाचे क्रेडिट फक्त पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे तशी सुरुवातही झालेली आहे. शरद पवार इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय भव्य दीव्य स्मारक उभारून बांधून मोकळे होतील. मिळालेल्या माहितीनुसार हे स्मारक गुजराथ मधल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारका पेक्षा अधिक आकर्षक आणि जगातील प्रत्येकाचे आकर्षणाचे असे तयार करण्यात येईल….


www.vikrantjoshi.com

अर्थात शरद पवारांचे कागदावर नेहमीच सारेच भव्य दिव्य होते पण नंतर अमुक एखाद्या अशा योजने साठी उभारण्यात जमा करण्यात येणारी रक्कम किंवा शासकीय मदत त्यावर त्यांची माणसे पूर्ण खर्च करतील याची अजिबात शास्वती खात्री नसते अपवाद बारामतीचा प्रचंड विकास तेथे मात्र आजपर्यंत खर्च करण्यात आलेली रक्कम पवारांचे जातीने लक्ष असल्याने नेत्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी वळती केली नाही. पवारांना इंदू मिल स्मारक उभे करतांना देखील असेच खडूस आणि कडक चेहऱ्याने जातीने लक्ष घालावे लागले अन्यथा अन्य नेते मंत्री व अधिकारी त्यांच्या स्वतःच्या स्मारकाची दिल्लीतील महाराष्ट्र सदन पद्धतीने त्यातून तजवीज सोय करून ठेवतील. एक मात्र नक्की आहे कि पवारांना बाबासाहेबांचे भव्य स्मारक यापुढे तातडीने उभे यासाठी करायचे आहे कि त्यांना व त्यांच्या राष्ट्रवादीला दलित मतदारांमध्ये अलीकडच्या काळात  स्थान राहिलेले उरलेलले नाही, कोणत्याही निवडणुकीत जर  बघितले तर एकूण दलित मतदारांपैकी फारतर त्यांना एक दीड  टक्का दलितांची मते राष्ट्रवादीला मिळतात हे एकंदर आकडेवारीवरून लगेच ध्यानात येते. पवारांकडे मुस्लिम मते आकर्षित करण्यासाठी विविध सोंगे करणारे जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांच्यासारखे काही नेते नक्की आहेत पण रामदास आठवले त्यांना सोडून गेल्यापासून दलितांना आकर्षित करणारे असे त्यांच्याकडे कोणीही नाही नव्हते त्यामुळे राज्यात त्यांच्या हाती सत्ता येताच त्यांनी उद्धव यांच्या खांदयावर बंदूक ठेवून आणि उद्धव यांच्या मुंबई महापालिका निवसणुकीच्या अगतिकतेचा नेमका फायदा घेत इंदू मिलमधले बाबासाहेबांचे स्मारक उभे करण्याचा मोठा घाट घातला आहे, पवार हे काम वेगाने पूर्ण करून राहतील त्यातून त्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला दलित मतदानाचा भविष्यात मोठा फायदा होईल कारण साऱ्यांना हे माहित आहे, दलितांची मते आज देखील म्हणजे ते शिकल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर  भावनेच्या ओघात कायम खेचली जातात ती त्यांची कमकुवत बाजू आहे…

तूर्त एवढेच: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *