राज कि बात : अंतिम भाग : पत्रकार हेमंत जोशी

राज कि बात : अंतिम भाग : पत्रकार हेमंत जोशी 

सुडाने पेटलेले आयुष्य नशिबी नसावे. ध्येय नक्की गाठावे, वाइटांचे नक्की पतन करावे व्हावे पण जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ ठेवून. बोलून घालवू नये संबंध बिघडवू नयेत. एकदा संबंध बिघडलेत कि ते फुटलेल्या विखुरलेल्या काचेसारखे असतात पुन्हा जोडल्या जात नाहीत पण त्यातून होणारे दुष्परिणाम परिणाम पुढे दूरदूरपर्यंत भोगावे लागतात, हे मी घेतलेल्या आलेल्या अनुभवातून सांगतो आहे, कुठेतरी वाचायचे आणि लिहून काढायचे, सतत वाचन करणाऱ्यांच्या ते लक्षात येते. एकदा मी एका अतिशय दुर्मिळ पुस्तकातले वाक्य चोरून माझ्या नावाने लिहिले होते, पत्रकार अभिजित मुळ्ये यांनी ते फोन करून माझ्या लक्षात जेव्हा आणून दिले, खजील झालो, तेव्हापासून कानाला खडा लावला…

दरदिवशी कितीतरी मंडळींच्या विविध माध्यमातून चौकशा होत असतात, मला माहिती मिळत असते. या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो पण ज्या राज ठाकरे यांच्याकडून आजतागायत साध्या चहाचा मी लिंपित नाही तरीही ईडीने त्यांना घेरले, मनातून मनापासून वाईट वाटले. बडे मासे जाळ्यात अडकवायचे सोडून कदाचित आवाज दाबण्यासाठी हे घडले असावे. आजपासून थेट १०-१२ वर्षे मागे गेल्यानंतर, जेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात पैसे ओरबाडण्याच्या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा थरार माजला होता तेव्हाच मी मोठ्या पदावर असणाऱ्या काही अभियंत्यांना हे बोलून दाखविले होते कि मोठे अराजक यातून ओढवेल, पुढे तेच घडले, केवळ पैसे लुटण्याच्या स्वार्थापोटी या खात्याची वाट लागली आणि परिणीती भुजबळ काका पुतण्याला थेट तुरुंगात जावे लागले….


ईडीकडे सर्वात महत्वाचे शास्त्र आहे ते पीएमएलए या कायद्याचे म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट. हा अत्यंत महत्वाचा कायदा फार छान घडले २००२ मध्ये मंजूर झाला अस्तित्वात आला. तत्पूर्वी व त्यानंतर देखील काळा पैसा पांढरा करणे सऱ्हास सुरु असायचे पण मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याचे पालन केल्या जाऊ लागले. मी आधीच सांगितले आहे कि भारतीयांना काळा पैसा पांढरा करतांना भीती अशी वाटायचीच नाही, आयकर विभागातले अधिकारी कर्मचारी कर सल्लागार हाताशी धरून मॅनेज करायचे आणि कोट्यवधी रुपये पांढरे करायचे, कालपर्यंत हे सऱ्हास सुरु होते, आजही सुरु आहेच जरा लगाम बसलाय एवढेच. २००५ पासून या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार ईडीकडे देण्यात आले याशिवाय फेरा, फेम यासारखे परकीय चलन कायदे किंवा परदेशातल्या गुंतवणुकी इत्यादींवर ईडीचे नियंत्रण आल्याने ईडीचे महत्व वाढले त्यापेक्षा त्यातून सरकारी तिजोरीत पूर्वीपेक्षा अधिक रक्कम कराच्या स्वरूपात निदान भरल्या जाऊ लागली, हेही नसे थोडके…


www.vikrantjoshi.com


काळा पैसा पांढरा करण्याच्या नादात जे जे सहभागी होतात, असतात त्या सर्वांचे मालमत्ता जप्तीचे अनिर्बंध अधिकार ईडीकडे असल्याने एकदा का ईडीमध्ये अडकले कि सहजासहजी सुटका नसते. अत्यंत महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी किंवा मंत्रमंडळाने ईडी मध्ये अनेक बहुतेक शिस्तीचे, भीक न घालणारे, विकल्या न जाणारे अधिकारी आणून बसविल्याने पहिल्यांदाच आपल्याकडे काळा पैसा मिळविणारांच्या मनात धडकी बसलेली आहे मात्र त्याचवेळी दुसरी कमकुवत बाजू अशी कि मोदी स्वतः खात नाहीत पण इतरांनी अजिबात खाणे बंद न केल्याने देशातला भ्रष्टाचार संपता संपत नाही. आरोपींची दिसणारी मालमत्ता हि काळ्या पैशातूनच घेतल्या गेलेली आहे असे समजून कारवाई होते, त्यामुळे ईडीचा धसका अडकलेले घेतात. या देशाच्या इतिहासात आत्तापययंत मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तब्बल ५० हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या गेल्या आहेत, माझी माहिती अशी कि पुढल्या काही वर्षात हे जप्तीचे प्रमाण तिप्पट झालेले असेल….


केवळ चौकशीच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठीच अलीकडे आपल्या राज्यात बहुतेकांनी पक्षांतर केले आहे पण तुम्ही आमच्याकडे आलात तर अमुक तमुक देऊ असे सेना भाजपाने एखादा दुसरा अपवाद सोडल्यास अजिबात सांगितलेले नाही. मध्यंतरी मी गमतीने मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो होतो कि तुमचे हे देशप्रेमा पोटी बदललेले आक्रमक स्वरूप बघून आता तर मला देखील तुमची भीती वाटू लागलेली आहे पण मित्रांनो मनातले सांगू का, त्यांचे हे पराक्रम बघून त्यांची भीती वाटण्यापेक्षा त्यांच्याविषयी काळजी किंवा भीती वाटू लागली आहे जी फार पूर्वी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर वाटू लागली होती आणि पुढे तेच घडले, पवारांनी त्यांना लवकरच राजकारणातून सत्तेतून कायमचे अखेरपर्यंत नोव्हेअर केले अर्थात तो काळ शरद पवारांचा आणि त्यांच्या थर्ड ग्रेड साथीदारांचा होता, आता काळ बदलला आहे, राज्यात किंवा देशात दाऊदचे नव्हे देशभक्तीचे वारे वाहू लागलेले आहे…

तूर्त एव्हढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *