दादा आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी

दादा आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी 

दादा म्हणजे चंद्रकांत दादा, तत्पूर्वी दादा म्हणजे अजितदादा किंवा सुरेशदादा यांचा दादा म्हणून बोलबाला होता, सुरेशदादा संपले, अजितदादा हे केलेल्या चुकांमुळे आणि काकांमुळे जवळपास संपल्यात जमा आहेत. ते ठरल्याप्रमाणे भाजपा मध्ये आले तर टिकतील नाहीतर काका त्यांचाही विजयसिंहदादा मोहिते पाटील करून ठेवतील. ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांचे लक्ष भोजनाने लग्न गाजले होते तेच पाटील आज बऱ्यापैकी आर्थिक डबघाईला आल्याचे माझी माहिती आहे, कारण विजयसिंह मोहिते पाटील काही वर्षे विशेषतः राज्याचे बांधकाम खात्याचे मंत्री होते पण त्यांनी आपला भुजबळ करून न घेतल्याने पुढे त्यांचे खासदार झालेले सुपुत्र रणजितसिंह हे देखील सुसंस्कृत निघाल्याने काकांच्या गटात पक्षात राहून देखील इतरांसारखी अमाप समाप कमाई या बापबेट्याने करून न ठेवल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे माझी माहिती आहे…


www.vikrantjoshi.com

सध्या एकच दादा जोमात जोरात जोशात त्वेषात आहेत, चंद्रकांतदादा पाटील हे ते नाव. कोथरूड पुणे विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवताहेत जेथे ब्राम्हण मतदार फार मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदार संघात ब्राम्हण ज्यांना मतदान करतात तो हमखास निवडून येतो. आधी मेधा कुलकर्णी नावाच्या अतिशय लोकप्रिय नेत्या तेथे आमदार होत्या. त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने पाटलाने  बामनाचे तिकीट कापले असा तेथे अपप्रचार सुरु आहे, ज्या अपप्रचाराला फारसा अर्थ नाही. निवडणुकीनंतर जशी मेधा कुलकर्णी यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने चंद्रकांत पाटील यांना आदेशावरून बहाल केली तशी विधानसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेची चंद्रकांत पाटलांची रिक्त होणारी जागा उमेदवारी फक्त आणि फक्त मेधाताई यांच्यासाठी तेच चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेधाताईंना मिळवून देणार असल्याची माझी शंभर टक्के माहिती आणि खात्री आहे…

आणखी अत्यंत महत्वाचा मुद्दा जो कोथरूड विधान सभा मतदार संघात मुद्दाम केल्या जातो आहे कि चंद्रकांत पाटील यांनी जशी एका बामनाची आमदारकी घालविली ती तशी नामदारकी ते आणखी एका नेत्याची घालविणार आहेत आणि ते नाव आहे देवेंद्र फडणवीस. फडणवीस आणि चंद्रकांतदादा या दोघांचे आपापसातले संबंध अतिशय सुमधुर आहेत, चंद्रकांत पाटील फडणवीसांना थेट धाकट्या सख्य्या भावासारखे मानतात आणि मनापासून सतत साथ देतात त्यामुळे दादा हे देवेंद्र फडणवीसांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत घालवतील आणि पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री होतील हा कोथरूड मतदारसंघात काही विरोधकांनी चालविलेला निव्वळ अपप्रचार आहे, ब्राह्मण मतदारांनी या तद्दन फाल्तुक अपप्रचाराला अजिबात बळी पडू नये असे मी स्वतः अतिशय कडवा ब्राम्हण, ब्राम्हण प्रेमी या नात्याने स्थानिक मतदारांना सांगतो आहे, मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन नक्की होईल तसेच चंद्रकांत पाटील फडणवीसांना शम्भर टक्के फसविणारे नाहीत, जेव्हाकेव्हा फडणवीस आपणहून दिल्लीत राज करायला निघून जातील त्यानंतर मुख्यमंत्री स्पर्धेत चंद्रकांत पाटील हे नक्की अग्रस्थानी असतील, आज मात्र दूरदूरपर्यंत असे त्यांच्याविषयी अपसमज पसरविणे देखील पाप आहे…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *