ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी

ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी 

ज्या ब्राम्हणेतरांना सार्वजनिक ठिकाणी ब्राम्हणांना शिव्या हासडायच्या असतात विरोध करायचा असतो त्यांना व्यक्तिगत खाजगी जीवनात मात्र ब्राम्हणांशीच मैत्री करायला आवडते ब्राम्हणांशी कौटुंबिक संबंध ठेवायला जोडायला मनापासून आवडतात. जे सार्वजनिक ठिकाणी ब्राम्हणांच्या नावाने शिमगा साजरा करतात त्यांचे आवडते शिक्षक आवडते साहेब आवडते मित्र आवडत्या मैत्रिणी गावातले शेजारचे आवडते कुटुंब मात्र हटकून ब्राम्हण असतात. प्रत्येकाला बायको एकतर ब्राम्हण हवी असते, बामणासारखी हवी असते. जेवण असो कि विचार, राहणीमान असो कि कौटुंबिक वातावरण ब्राम्हणेतर हमखास मुलांना सांगतात अरे त्या देशपांडे जोशी गोडबोल्यांसारखें जरा वागत चला आणि आमच्यासारखे तुमचे सारे असावे म्हणून आम्ही ब्राम्हण अगदी पोटतिडकीने तुमच्याकडून हे सारे करवून घेत असतो म्हणून तुमचा जवळचा मित्र मैत्रीण शिक्षक कोण, तर ते हमखास मूठभर ब्राम्हण असतात. मग का रे असे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला त्रास देण्यात परेशान करण्यात टोमणे मारण्यात लिखाण करण्यात असा विकृत आनंद मानताहेत तुम्ही बहुतेक सारे ? कोणा नथ्थुराम गोडसेने ती चूक केली आणि त्यानंतर भोगले कोणी तर समस्त ब्राम्हण कुटुंबांनी,  सिंधी समाजाने जसे अंगावरच्या कपड्यानिशी पाकिस्थान सोडले ते तसे गांधी वधानंतर त्यावेळी कित्येक ब्राम्हणांनी नेसत्या कपड्यानिशी आपले खेडे सोडले आणि ते शहरात आले किंवा अनेक देशाबाहेर देखील गेले…

शिखांचा खलिस्तान साठी एकत्रित सार्वजनिक संघर्ष होता त्यातून त्यातल्या एका शिखाने इंदिरा गांधी यांची हत्या केली त्यानंतर पुढे काही वर्षे शिखेतर समाजात शीखांविषयी आग धुमसत होती हे एकवेळ आपण समजू शकतो पण ब्राम्हणांचा ब्राम्हणेतर लोकांविरुद्ध असा कोणताही संघर्ष नाही वाद नाही मग तरीही आमच्या नशिबी केवळ आपल्याच या राज्यात हे अपमानाचे जीणे का, एखादा देवेंद्र फडणवीस पेटून उठतो काहीतरी चांगले करायला जातो त्याचे पडसाद अख्य्या ब्राम्हणांना सोसावे लागताहेत त्यांना अप्रत्यक्षरीत्या वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळते आहे एवढे का ब्राम्हण वाईट आहेत जरा स्वतःच्या मनाला एकदा तर विचारून बघा आणि उत्तर जर वाईट नाहीत असे आले तर शिकवणाऱ्यांचे कृपया न ऐकता आजपासून तुमचे आमच्याविषयीचे कलुषित मन आरशासारखे एकदा स्वच्छ पुसून मोकळे व्हा. ज्यांनी त्यांना जवळून बघितले अनुभवले त्या प्रत्येक ब्राम्हणेतर व्यक्तीला फडणवीसांविषयी त्यांचे मत काय, विचारून तर बघा, उत्तर शंभर टक्के पॉझेटिव्ह येईल. पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे जगात दीड कोटी मराठी वाचक आहेत त्यांना किंवा आम्हाला सतत कायम दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केल्या जातोय कारण फक्त हेच कि शरद पवारांच्या किंवा त्यांच्या काही मूठभर बेधुंद उजव्या डाव्यांचा आम्ही शब्दांतून समाचार घेतो, हे काय आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी लिहिणे असते, नाय नो नेव्हर, राज्याचे वाटोळे होऊ नये म्हणून आमचे किंवा भाऊ तोरसेकरांचे सततचे लिहिणे असते सांगणे असते. एवढेच सांगतो शाळेतल्या कडक ब्राम्हण शिक्षकांचा जसा मार सहन केला ज्यामुळे पुढे उत्तम आयुष्य घडले तसे हे आमचे शब्दांचे मार तुम्ही नीट ध्यानात घेतले तर तुमचा राग नक्की कुठल्या कुठे पळून जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी देखील तुम्ही तुमचे शंभर टक्के ब्राम्हणांवरील प्रेम व्यक्त करून मोकळे व्हाल…


www.vikrantjoshi.com

रानडे आडनावाच्या ब्राह्मणाशिवाय सचिवाशिवाय शरद पवारांचे पान हलत नाही किंवा धनंजय मुंडे जाहीर सांगतात दररोज तोंडाला फेस येईपर्यंत काम करणारा प्रशांत जोशी जर माझा स्वीय सहाय्यक नसता तर मला मिळालेले आजचे यश कदाचित आणखी लांबणीवर पडले असते हे असेच वातावरण आजही जेथे तेथे त्या ब्राम्हणांच्या बाबतीत पण काही विकृतांकडून ब्राम्हणांचा त्याग इतिहास सारा काही कचऱ्यात फेकल्या जातोय आणि आपल्यातल्याच एका मराठी ज्ञातीला समाजाला काही ताकदवान विकृत मराठी नामोहरम करण्यात आनंद मानताहेत. उभे आयुष्य केवळ मराठ्यांच्या भल्यासाठी राब राब राबणाऱ्या विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना सर्वाधिक जवळची आवडती कोण तर सतत त्यांच्या पाठीशी एखाद्या रणरागिणीसारखी उभी असलेली ती भारती लव्हेकर नावाची ब्राम्हण आमदार स्त्री. उगाच नाही मेटे यांनी तब्बल दोन वेळा याच भरतीसाठी उमेदवारी पारड्यात पाडून घेतली. मित्रांनो, थांबवा कुठेतरी सततचे सार्वजनिक ठिकाणी फक्त ब्राम्हणांना त्रास देणे…

क्रमश: हेमंत जोशी

Comments 1

  1. Gamma Pailvan says:

    नमस्कार हेमंत जोशी.

    त्याचं काये की, काही जणांना ज्या ताटात खाल्लेलं असतं तिथेच हा#ल्याशिवाय चैन पडंत नाही. अशांना आपण काय करणार.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *