काहीतरी भयंकर घडले आहे : पत्रकार हेमंत जोशी


 
काहीतरी भयंकर घडले आहे : पत्रकार हेमंत जोशी 

घटना क्रमांक एक : विधान सभा निवडणुकांचे दिवस होते, मी आणि माझ्या अगदी घराजवळ राहणारे माझ्यावर किंवा माझ्यासारख्या अनेकांवर पुत्रवत प्रेम करणारे त्यावेळेचे सामना दैनिकाचे संपादक दिवंगत अशोक पडबिद्री व मी एक दिवस रात्री उशिरापर्यंत विरारला हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गप्पा मारत बसलो होतो नंतर घरी परतलो नंतर अगदी सकाळीच मला अलिबागला जाऊन परतायचे होते तेव्हा भ्रमणध्वनी नव्हते घरी आल्या आल्या कळले कि भल्या पहाटे अशोकजींना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आणि ते गेले. आजही आठवते तो दिवस १० मार्च होता कारण त्यादिवशी माझा वाढदिवस होता. किस्सा क्रमांक दोन : जळगावला असतांना सुरुवातीचे काही दिवस मी आणि माझा एक मित्र अतिशय हलाखीचे जीवन जगत असू. दिवसभरात पोटभर कोण खाऊ घातले तरी ती आमच्यासाठी दिवाळी असे. मित्र कुठल्यातरी गॅरेज मध्ये झोपायचा आमचे वय जेमेतेम १८-१९ आणि एक दिवस तो हसतच माझ्याजवळ येऊन सांगू लागला कि त्याच्या साहेबांनी त्याला आजपासून त्यांच्या घरातच राहायला एक खोली दिलेली आहे आणि जेवण देखील तेच देणार आहेत, ते ऐकून आम्ही दोघेही रडायला लागलो एवढे ते सरप्रायझिंग होते. दोन तीन दिवसांनी तो रडतच माझ्याकडे येऊन सांगू लागला कि तो पुन्हा गॅरेज मध्ये राहायला आला आहे कारण तो त्याच्या साहेबांकडे ज्यादिवशी राहायला गेला त्यांची चाळिशीतली पत्नी त्यारात्री अचानक जवळ येऊन त्याच्याशी नको ते लैंगिक प्रकार करून मोकळी झाली. हा तिला म्हणाला कि साहेब उठले तर ते आपल्याला मारून टाकतील असे करू नका मला काही दिवस सुखाचे घालवू द्या, त्यावर ती म्हणाली, साहेबांची हे करायला परवानगी आहे, अशा प्रकारे त्याच्यावर त्यारात्री त्याच्या गरिबीने बलात्कार केला होता, अर्थात असे एक ना अनेक किस्से… 

तुमच्या माझ्या थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे अचानक प्रसंग येतात, आलेले आहेत, अशा प्रसंगांची साधी आठवण जरी झाली तरी अंगावर भीतीने शहारे येतात आपण त्यामुळे कमालीचे अस्वस्थ होतो नेमका हा असाच प्रसंग जब्बार पटेल यांनी सिंहासन सिनेमात चित्रित केलेला आहे. त्यात निळू फुले पत्रकार असतो आणि जेव्हा कालपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेवर येतात ते बघून हा पत्रकार अक्षरश: वेडा होतो. यादिवसातले या राज्यातले अचानक एकाकी तडकाफडकी बदललेले राजकीय वातावरण व घडामोडी बघून व ऐकून मला येथे आयुष्यातले असे थरकाप उडविणारे प्रसंग आठवले. खासदार पत्रकार शिवसेना नेते संजय राऊत किंवा तत्सम, लाज लज्जा बासनात गुंडाळून अचानक भाजपा नेत्यांशी भेटून प्रदीर्घ बोलतात काय आणि राजकीय वातावरण त्यानंतर केवळ आठ दिवसात राजकीय वातावरण बदलते काय, सारे काही  सामान्य माणसाच्या डोक्याला झिणझिण्या आणणारे, नाही का ?  सामान्य माणूस वेडा होतो, राज्यकर्ते एकमेकांच्या हातात हात देऊन मोकळे होतात यालाच यालाच राजकारण म्हणतात आणि मी तर तुम्हाला अगदी सुरुवातीलाच किंवा सुरुवातीपासूनच सांगत आलोय कि उद्धव ठाकरे यांना आपण  साऱ्यांनी किंवा अगदी शरद पवार यांनीही अंडरएस्टीमेट करू नये त्यांच्याएवढा राजकारणातला  खतरनाक खिलाडी मी बघितलेला नाही अर्थात त्यात त्यांची चूक ती कसली कारण पक्षाच्या स्वतःच्या आणि पोटच्या मुलाच्या नाकातोंडात पाणी यायला लागल्यानंतर लागल्यानंतर जर नेता हातपाय हलविणार नसेल तर तो नेता कसा ? ते योग्य वागले वेडे आम्ही सर्वसामान्य असतो… 

ज्या राजकीय पक्षाच्या हाती कि ज्या नेत्यांच्या हाती मुंबई आणि लगतच्या परिसरातील अख्खा केबल चा धंदा आहे तेच नकली ग्राहके उभी करून जर अर्णब गोस्वामी भोवती टीआरपी चा फास आवळू बघताहेत किंवा पोलीस आयुक्त असोत कि गृह मंत्री किंवा थेट मुख्यमंत्री, उठसुठ अर्णब आणि त्याच्या रिपब्लिक वाहिनीवर ज्या पद्धतीने तोंडसुख घेऊन मोकळे होताहेत किंवा देशातल्या राज्यातल्या वृत्त वाहिन्या त्याची नको तेवढी सतत दखल घेताहेत नेमके तेच तर अर्णबला हवे आहे कारण त्यातून त्याला प्रसिद्धी मिळते, आपोआप त्याचा टीआरपी वाढतो आहे,  हा केवढा महान ज्याची दखल तो प्रत्येकाला घ्यायला लावतो आहे आणि महत्व मुंबई पोलिसांचे किंवा महाआघाडी सरकारचे कमी होते आहे हे तर असे झाले एकदा माझ्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयाच्या इमारतीखाली एक तरुण वेडा सारखी चड्डी खाली करून करून नको ते प्रकार जाणाऱ्या येणाऱ्यांना करून दाखवत होता, सारेच सुशिक्षित स्त्री पुरुष आपल्याला रीस्पॉन्ड करताहेत त्याच्या लक्षात आल्याने त्याला अधिकच चेव येत होता, मी जमलेल्या गर्दीला एवढेच म्हणालो, त्याच्याकडे दुर्लक्ष करा तो पुढल्या पाच मिनिटात दिसेनासा होईल, नेमके तेच तेथे आलेल्या पोलिसाने केले आणि तो वेडा तेथून निघून गेला. अहो, वाहिन्यांचे टीआरपी रॅकेट तर अलिकडल्या काही वर्षातले पण एबीसी सर्टिफिकेट च्या नावाने राज्यातले देशातले सारे वृत्तपत्रे ज्या फार मोठ्या प्रमाणात सरकारी तिजोरीची लूट करताहेत त्यासमोर या वाहिन्यांचे रॅकेट अगदीच क्षुल्लक आहे, देशातली राज्यातली दैनिके ज्यापद्धतीने अगदी उघड सरकारला लुटताहेत ते जर एखाद्याने पुराव्यांसहित उजेडात आणले तर मला खात्री आहे प्रत्येक दैनिकाचा मालक गजाआड असेल. अर्णबचा तुम्हीच निखिल वागले करताहात, त्याची सतत दाखल घेतल्याने, महत्व त्याचे वाढते आहे आणि महाआघाडी व मुंबई पोलिसांची बदनामी होऊन त्यांचे महत्व कमी होते आहे. जे अर्णबला हवे आहे तेच नेमके हे सरकार करते आहे, बाळासाहेबांनी दखल घेतली आणि निखिल पुढे २५ वर्षे मोठा पत्रकार म्हणून विनाकारण गणल्या जाऊ लागला, आता उद्धवजी देखील तेच कारताहेत, त्यातून अर्णब मोठा होईल, तुमची अनेकांची डोकेदुखी त्यातून वाढत जाईल…. 

अपूर्ण : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *