कोण जिंकले कोण कोण हरले : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी


कोण जिंकले कोण कोण हरले : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

या राज्यातल्या विरोधकांचा, प्रत्येक नेत्याचा मग तो नेता कोणत्याही जातीचा विचारांचा पक्षाचा असला तरी, बहुतेक पत्रकारांचा, बहुसंख्य व्यावसायिकांचा, राज्यातल्या जनतेचा, महिलांचा, तरुणांचा, विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा साऱ्यांचा सर्वांचा अत्यंत आवडता लाडका प्रिय नेता म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस त्यांच्यासारखी लोकप्रियता वरून सहानुभूती राज्यातल्या अलीकडच्या कोणत्याही नेत्याला कधीच लाभली मिळाली नाही अपवाद दिवंगत आर आर आबा पाटील यांच्यासारखे एखादे दुसरे. देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच मिसरूड फुटले होते तेव्हापासून मी त्यांना बघत आलोय बऱ्यापैकी न्याहाळत आलोय. प्रत्येक कार्यकर्त्याला तो अमुक एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे काम करायला लागला कि त्याच्यात नेतृत्व करण्याची आकांक्षा आपोआप निर्माण होते. मुलाचे पाय पाळण्यात पद्धतीने देवेंद्र हे पुढले संघ व भाजपाचे भविष्यातले मोठे नेते त्यांना जवळून बघणार्यांच्या ते लक्षात येत होते पुढे नेमके तेच घडले. जसे लहानपणीच डॉक्टर डॉकटर खेळून मोकळी होणारी पोरगी तारुण्यात प्रवेश करताच वर्षाच्या आत किमान दोन प्रियकर करून मोकळी होईल हे जसे तिला बघणार्यांच्या लक्षात आलेले असते ते तसेच नागपूरकरांचे फडणवीसांना बघतांना वाढतांना लक्षात आले होते, जो तो 

त्यांना अगदी लहानपणापासून बघतांना हेच म्हणत होता कि देवेंद्र बाप गंगाधरराव यांच्यापेक्षा नेतृत्व करतांना नक्की सवाई ठरणार आहेत. मला सतत ४० वर्षे राजकीय पत्रकारिता करतांना असे फार कमी नेते त्या बाळासाहेब चौधरी यांच्यासारखे मनातून मनापासून आवडले त्यात का कोण जाणे पण देवेंद्र फडणवीस नंबर वन अगदी आजही कालही आणि उद्याही… 

नुकत्याच राज्यात पार पडलेल्या निवडणूका त्यात भाजपा आलेले अपयश त्यातून काहींची वाढलेली चिंता काहींना झालेला असुरी आनंद अनेकांना झालेले दुःख त्यावर मला येथे नेमके काही सांगायचे आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर होणारी टीका त्यावर त्यांचे नेमके काय कुठे कसे चुकले हेही नेमके सांगायचे आहे. सध्याचे राजकारणातले सॉफ्ट टार्गेट म्हणजे देवेंद्र फडणवीस यापुढे त्यांनी नेमके काय करायचे आहे कसे वागायचे आहे कोणते निर्णय घेऊन मोकळे व्हायचे आहे त्यावर त्यांनाही काही सांगायचे आहे कारण मोदी आणि शाह या जोडगळीला त्यांच्या निवृत्तीनंतरचे नेते कोण त्यावर नेमके उत्तर सापडले होते त्यावर पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस होते दुसऱ्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ तर तिसऱ्या क्रमांकावर खासदार तेजस्वी सूर्या हे होते अलीकडे मात्र दुर्दैवाने हि क्रमवारी त्यांनी बदलली आहे आणि आता पहिल्या क्रमांकावर तेजस्वी सूर्या तर फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत अर्थात त्यात मोठी चूक फडणवीस यांची स्वतःची असली तरी भाजपा आणि भाजपा बाहेरच्या राज्यातल्या नेत्यांनी त्यांची कधी उघड तर कधी आतून चालवलेली छळवणूक व बदनामी हेही एक महत्वाचे कारण आहे शिवाय अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस यांना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातल्या १०-१२ अत्यंत नालायक नाकर्त्या भ्रष्ट दलाली करणाऱ्या मंडळींनी जवळचे मित्र निकटचे सहकारी महत्वाचे विश्वासू सवंगडी म्हणून फडणवीसांना मोठ्या खुबीने व युक्तीने घेरून ठेवणे मोठे महागात पडले आहे, या नालायकांना त्वरेने दूर करणे हे यापुढे फडणवीस यांचे मोठे महत्वाचे असे काम आहे…. 

केवळ त्यांना घेरणाऱ्या घेरलेल्या अति नालायक अशा १०-१२ सवंगड्यांना जवळच्यांना दूर करणे हाकलून लावणे महत्वाचे ठरणारे नाही तर भाजपा अंतर्गत घुसलेल्या नालायक नेत्यांना दूर करून दूर सारून त्याचवेळी त्यांना नवी टीम पुन्हा नव्याने उभी करणे, चंद्रशेखर बावनकुळे मेधा कुलकर्णी पंकजा मुंडे यांच्यासारख्या कितीतरी दुखावलेल्या व दुरावलेल्या नेत्यांचे पुनर्वसन हेही फडणवीसांनी स्वतः पुढाकार घेऊन करणे गरजेचे आहे एवढेच काय औरंगाबाद मध्ये शिरीष बोराळकर यांच्यासारख्या अति सामान्य नेत्याऐवजी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना स्वतः प्रेस्टिज इश्यू करून उमेदवारी मिळवून दिली असती तर अतिशय ताकदवान सतीश चव्हाण यांच्यासमोर पंकजा यांनी नक्की आव्हान निर्माण करून कदाचित चित्र बदलले असते. चव्हाण यांच्यासमोर बोराळकर म्हणजे सुटलेल्या सांडासमोर भाकड गाय किंवा माकडाने हत्तीणीला सेक्स करण्यासाठी आव्हान करण्यासारखी हि निवडणूक ठरली, तेच पुण्यात आणि नागपुरात पण घडले म्हणजे पुण्यात मेधा कुलकर्णी व नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे किंवा पुन्हा अनिल सोले असे घडले असते तर भाजपाच्या या निवडणुकीत किमान दोन तरी जागा आणखी वाढल्या असत्या आणि कशी जिरवली असे फडणवीसांनी हातवारे करून शरद पवारांना चिडवले असते म्हणजे ते पवारांना वाकुल्या दाखवत मोकळे झाले असते पण या तिन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार शंभर टक्के चुकले नेमके तेच पवारांना भावले फावले. फडणवीस व पवार या मुख्य शर्यतीत देवेंद्र फडणवीसांच्या चुका, पवार आयतेच पुढे निघून गेले. वर्गातल्या अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्याला ऐन परीक्षेच्या वेळी टायफाईड व्हावा आणि वर्गातला सामान्य विद्यार्थी त्याच्या पुढे निघून जावा तसे सध्या फडणवीसांच्या बाबतीत घडते आहे. स्वतःच्या हिंमतीवर आणि लोकप्रियतेवर विधान सभेत त्यांनी मिळविलेले प्रचंड यश, पुढे त्यांच्या हातून घडलेल्या लहान मोठ्या चुकांतून विनाकारण झाकोळल्या गेले… 


तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *