प्रशासकीय अधिकारी : ( सुधारित लेख ) : पत्रकार हेमंत जोशी

प्रशासकीय अधिकारी : ( सुधारित लेख ) : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे बहुसंख्य प्रशासकीय शासकीय स्वतःला परमेश्वराचा अवतार समजायला लागले आहेत, आपण म्हणजे साक्षात देव, परमेश्वर थोडक्यात थेट परमेश्वराने आपल्याला या राज्यात पाठिविलेले आहे, असा त्यांनी समज करवून घेतला असल्याने, आपले कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे जो तो स्वतःला समाजत असल्याने परमेश्वरी थाटात बहुतेक प्रशासकीय शासकीय अधिकारी वागतात, बोलतात, कृती करून मोकळे होतात. मला वाटते त्यांचा दुर्योधन झालाय, दुर्योधनाला जसे माहित होते धर्माचरण नेमके कोणते, पण त्याची प्रवृत्ती त्याला धर्माचरणाप्रमाणे वागू द्यायला तयार नव्हती, अधर्म कोणता हेही त्याला माहित होते पण त्यापासून परावृत्त व्हावे लांब राहावे असे त्याला वाटत नव्हते, जणू त्याच्या हृदयातल्या देवाने, देवरूपी विचारांनी अविचाराची जागा घेतली होती, त्यातून तो मनातून मिळणाऱ्या प्रेरणेप्रमाणे वागत होता, विचारांनी करप्ट असलेल्या या राज्यातल्या बहुतेक शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा असा दुर्योधन झालाय, दुर्योधनाचा त्याच्या अख्या कुटुंबाचा या अशा थर्डग्रेड प्रवृत्तीतून नाश झाला, येथल्या दुर्योधनांना कदाचित थोडा वेळ लागेल. वाईट वागणाऱ्यांचा वक्त नक्की चांगला असतो, काही वर्षे अशा वाईट ही विचारातून चांगलेही निघून जातात, पण परतफेड याच जन्मी करावी लागते हेही लक्षात ठेवणे आवश्यक असते..

सहकार खात्यात काही मंडळींनी गेल्या अनेक वर्षांपासून धुमाकूळ घातला आहे, त्यात अनेक अधिकारी आहेत, तुंगार असतील, चिंचोलीकर  असतील, सोनी असतील, कल्याणकर असतील, देशमुख असतील, चव्हाण असतील, असे आणखी काही असतील, धुमाकूळ चांगला कि वाईट हे येथे आत्ताच सांगणे थोडे अवघड आहे, मोठ्या अपेक्षा अलीकडे सहकार मंत्री म्हणून सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी असलेल्या सुभाष देशमुख यांच्याकडून आहेत, त्यांनाही थोडी संधी द्यायला हवी, नंतर वर्षभराने फारतर सपुरावा मांडता येईल कि देशमुखही दुर्योधन ठरले आहेत कि त्यांनी अर्जुन म्हणून वाईटांवर तीक्ष्ण धनुष्य सोडून सहकार क्षेत्रातील वाईटांचा सर्वानाश केला आहे. पण वाईटांचा फक्त वक्त चांगला असतो हे जे मी म्हणालो, त्याची सुरुवात विकास रसाळ यांच्यापासून झाली आहे, भामटे भ्रष्ट रसाळ हे सहकार खात्यातील एक अधिकारी असून सध्या ते मुंबई महानगर विभागीय लोह पोलाद मार्केट कमिटीवर मुख्य कार्यकारी अधिकारीम् म्हणून कार्यरत आहेत. विकास रसाळ हे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरकारी खात्यातून दरवर्षी जे प्रशासकीय अधिकारी पदाच्या मुलाखतीसाठी निवडले जातात, जे मुलाखतीत उत्तीर्ण होतात ते प्रशासकीय अधिकारी होतात त्यासंदर्भातल्या थेट मुलाखतीसाठी ते दिल्लीला गेले होते, त्यांच्याच खात्यातून अशा पद्धतीने जे एक बिलंदर महाशय प्रशासकीय अधिकारी म्हणून मागल्या दोन तीन वर्षांपूर्वी निवडल्या गेले, त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानून दिल्लीत कार्यरत असलेल्या एका रॅकेटला जे तीन कोटी रुपये देण्याचे ठरले होते त्यापैकी पहिला ५० लाख रुपयांचा हपता सहकार खात्यातले हे अति करप्ट विकास रसाळ दिल्लीला घेऊन गेले होते, पण यावेळी मात्र मुलाखती घेणारे मेधा गाडगीळ यांच्यासारखे बहुतेक सारेच प्रशासकीय अधिकारी वाम पैशांना हात लावणारे नसल्याने, रसाळ यांना पैसे देउन प्रशासकीय अधिकारी होता आले नाही, रसाळ ते पन्नास लाख रुपये घेऊन मुंबईला परतले, त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये आहेत हि टीप आयकर खात्याला आधीच मिळाल्याने रसाळ मुंबई विमानतळावर उतरताच, त्यांची झडती घेण्यात आली, परत आणलेले पन्नास लाख रुपये त्यांच्याकडे सापडले, आयकर खात्याने ते पैसे आधी ताब्यात घेतले, नंतर रसाळ यांनी जो त्यांच्याकडे असलेल्या काळ्या मालमत्तेचा तपशील त्यांना अधिकाऱ्यांनी घाम फोडल्यानंतर जबानीतून दिला, त्याप्रमाणे रसाळ यांच्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे लगेचच धाडी टाकण्यात आल्या, चला, सहकार खात्यातला त्यानिमीत्ते एक बडा मासा अलगद जाळ्यात अडकला. 

विशेष म्हणजे रसाळ यांच्या संगतीने त्यांच्याच खात्याशी संबंधित एक आणखी अधिकारी या मुलाखतीसाठी तब्बल एक कोटी रुपये घेऊन गेले होते पण एक कोटी रुपये घेऊन जाणारे हे महाशय आपल्या सोबतीने दोघं तिघांना घेऊन गेले, हे एक कोटी रुपये तीन चार ठिकाणी विभागले गेल्याने पैसे परत आणणारे हे महाशय मात्र आयकर खात्याच्या नजरेतून सटकले, वाचले. रसाळ प्रकरणातील कहर म्हणजे जेव्हा पोलीस आणि आयकर खात्याची माणसे धाड टाकण्याच्या निमित्ताने त्याच्या वांद्रे शासकीय वसाहतीतील वाय टाईप इमारतीतमधल्या सदनिकेत पोहोचले, रसाळ यांच्या बाबतीत आणखी एक धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात असा आला कि त्या सदनिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून सदर सदनिका विकास रसाळ यांच्या नावे असूनही रसाळ कुटुंबाऐवजी त्याचा मेव्हणा त्याठिकाणी वास्तव्याला आहे, रसाळ त्याच्या मालकीच्या महागड्या खाजगी सदनिकेत राहतो आणि या शासकीय सदनिकेचा असा गैरवापर करून अनेक वर्षांपासून थेट शासनाला फसवून मोकळा झाला आहे. सहकार खात्यातील याच महाभयानक टोळीतील एका चलाख अधिकाऱ्याच्या बाबतीत तेच, तो ज्या शासकीय इमारतीत मंत्रालयाच्या आसपास राहतो, त्या इमारतीमध्ये फक्त आणि फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनासरकारकडून सदनिकांचे वाटप होत असतांना त्याला या इमारतींमधली सदनिका का, कोणी, कशी काय वितरित केली आहे न उलगडलेले हे कोडे आहे. सचिव दर्जाचे प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना विचारल्यास ते नक्की सांगू शकतील त्यांच्या इमारतीत एकमेव प्रशासकीय अधिकारी नसलेला कोण व्यक्ती वास्तव्याला आहे….

शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आमचे कुठलेही काम नसते पण पत्रकारितेच्या माध्यमातून जवळचे संबंध निर्माण होतात. ६ जुलैला दिल्लीत शासकीय अधिकाऱ्यांतून जे दरवर्षी प्रशासकीय अधिकारी मुलाखती घेऊन निवडले जातात, रसाळ यांच्याशिवाय आपल्या राज्यातून जवळपास १० अधिकाऱ्यांची त्या मुलाखतीसाठी निवड झाली होती, त्यातले दोन निवडले गेले, दोघेही मुख्यमंत्री कार्यालयातले, श्रीयुत कैलास शिंदे आणि मिलिंद बोरीकर हे ते दोघे, आपण निवडल्या गेलो हे त्यांना जेव्हा कळले तेव्हा ते दोघेही आणि मी वर्षा बंगल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतो, त्यांची त्या आनंदाच्या नेमक्या क्षणी भेट झाली, त्यांना मी हेच म्हणालो, तुमच्याकडे कधी काम पडेल किंवा पडणारही नाही पण आपल्या जवळच्या ओळखीची माणसे जेव्हा उच्च स्थानी या समाजात विराजमान होतात, तो आनंद फार फार वेगळा असतो, अर्थात असे अनेक उच्च स्थानी विराजमान झालेले आमचे अगदी जवळचे, पण त्यांचा गैरफायदा घेऊन मालामाल व्हावे कधीही मनाला वाटले नाही….

त्याच दरम्यान घडलेला एक आणखी किस्सा तोही एका प्रशाकीय अधिकार्याचाच, पण हटके, डोळ्यात अश्रू आणणारा. जी श्रीकांत हे सध्या लातूरचे जिल्हाधिकारी आहेत, हेच ते सामाजिक भान आणि जाण ठेवणारे जिल्हाधिकारी जे अकोल्याला असतांना त्यांच्या कार्यालयातून निवृत्त झालेल्या शिपायाला आपल्या खुर्चीत बसवून त्याचा आदर सत्कार करून मोकळे झाले होते. रसाळ प्रकरण घडले त्याच दरम्यान म्हणजे ६ जुलैला जी श्रीकांत लातूर वरून उदगीरला चालले असतांना त्यांना सोन्याबाई नावाची जक्खड म्हातारी बसची वाट पाहताना रस्त्यात उभी दिसली, श्रीकांत यांनी तिला आपल्या गाडीत घेतले आणि प्रवासादरम्यान तिची चौकशी केली असता, ती निराधार असल्याचे, एकुलता एक मुलगा तिला वागवत नसल्याचे तिच्या बोलण्यातून आले. नंतर काय घडले ठाऊक आहे का, उदगीरला गेल्यानंतर त्यांनी सोन्याबाईला श्रावणबाळ योजनेतून तातडीने अनुदान तर मंजूर केलेच पण तहसिदारांना सांगून तिच्याकडून त्वरेने श्रावणबाळ योजनेसाठीचा आवश्यक अर्ज देखील भरून घेण्यात आला. आता तो दिवस दूर नाही, सोन्याबाई सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य घालविणार आहे. जी. श्रीकांत तुम्हाला मनापासून मनाचा मुजरा, लाख लाख सलाम.अधिकाऱ्यांनो, आता तुम्हीच ठरवा, नेमके तुम्हाला काय व्हायचे आहे ते म्हणजे जी. श्रीकांत कि बिकास रसाळ….? 

रसाळ छाप अधिकाऱ्यांनो, दुर्जन होऊन मिळविलेले धन काहीही कधीही उपयोगाचे नसते, असे धन क्षणिक आपल्या खात्यात आल्याने समाधान मिळते, पण हे धन कधीतरी निघून जाते, ना ते कधी उपभोगायला मिळते ना कधी घरच्यांना उपयोगी असते, ठरते….

तूर्त एवढेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *