गुरवांचा गौरव : पत्रकार हेमंत जोशी

गुरवांचा गौरव : पत्रकार हेमंत जोशी 

तुम्ही पुण्यातले असले किंवा नसलेही फारसा फरक पडणार नाही पण तुम्ही पुण्यात असतांना हे करायला पाहिजे म्हणजे लॉ कॉलेज रोड वर वाडेश्वर हॉटेलच्या समोर जे सुप्रसिद्ध नावाजलेले ‘ कॉफी नेशन ‘ नावाने कॉफी शॉप आहे तेथे निदान एकदा तरी जाऊन यायलाच हवे, मला खात्री आहे, एकदा गेलात कि वारंवार जाल, नेशनमय व्हाल. पुण्यात असतांना तुम्ही दिलीपसिंग आणि अनिता गोसल दाम्पत्याच्या वानवडी भागातल्या अटलांटीज या हॉटेलमध्ये नक्की जावे किंवा भांडारकर रोड, बाणेरच्या 

स्प्रिंग ओनियन या चायनीज हॉटेल मध्ये जायलाच हवे, असे चायनीज निदान माझ्या तरी जगभरात कुठे खाण्यात आलेले नाही, पुण्यात आहात आणि ‘ तथास्तु ‘ या चार मजली साड्यांच्या पैठण्यांच्या दुकानात गेला नाहीत तर मला खात्री आहे जर तुम्ही पुरुष असलात तर घरी परतल्यानंतर बायको तुम्हाला नक्की बदडणार आहे. अमुक एखाद्या दुर्धर रोगावर तुम्हाला आयुर्वेदिक उपचार करवून घ्यायचे असतील तर जगप्रसिद्ध डॉ. विनय बेंडाळे किंवा डॉ. शर्वरी मिसाळ या दोघांपैकी नक्की निदान एकाला तरी गाठावे. 


ब्राम्हणांच्या न्याय हक्कासाठी तळहातावर शीर घेऊन लढणार्या विश्व्जीत देशपांडे या पुण्यातल्या अवलियाकडून नक्की ब्राम्हणांचे प्रश्न समजून घ्यावेत, ब्राम्हण नसलात तरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल. महागडे पण दर्जेदार कपडे डिझाईन करवून घ्यायचे आहेत तर फॅशन डिझाइनर शलाका घैसास हे पुण्यातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व आणि घर इमारत बांधून घ्यायची असेल तर आघाडीचे आर्किटेकट श्रीमान जगदीश देशपांडे हे अगदी डोळे झाकून पुढे येणारे नाव व बांधकाम क्षेत्रात नक्की नावाजलेलेदेखील. मायक्रो फायनान्स अमुक एखाद्या ग्रुपला त्यांच्या व्यवसायासाठी हवा आहे, बुलढाणा अर्बन बँक पुण्याचे बिग बॉस शिरीष देशपांडे यांच्याकडे जावे आणि माझे नाव सांगून मोकळे व्हावे, शिरीष गोरगरीब व्यावसायिकांचे जणू मददगार आणि तारणहार, केस पांढरे असलेत तरी दिसायला रुबाबदार. काही काम नाही, टाइम पास करायचा आहे मग आमचे मित्र आशिष मोहदरकर यांना नक्की गाठावे त्यांनी तुम्हाला फक्त वाकुल्या जरी दाखवल्या तरी तुमचे हसून पॉट दुखेल…

पुण्यातले सुप्रसिद्ध चित्रकार वय वर्षे ७५ पण उत्साह २५ वर्षाच्या तरुणाला लाजवणारा, श्री रावसाहेब गुरव यांना एकदा तरी भेटावे त्यांना त्यांच्या पौडगाव मधल्या सर्वोत्तम ‘ सुम्बरान ‘ बंगल्यातच गाठावे, आयुष्याचे सार्थक झाले तुम्हाला वाटेल. तेथेच त्यांची सुम्बरान फाउंडेशन आहे, चित्रकार गुरव तेथे दररोज विविध चित्र काढण्यात रमलेले तुम्हाला दिसतील, त्यांची चित्रे आपल्या घरात हवीत, तुम्ही हे मनाशी म्हणून मोकळे व्हाल. दर्जेदार चित्रांचा साठा म्हणजे सुम्बरान बंगला आणि कलेचा जगोत्तम नमुना म्हणजेच चित्रकार रावसाहेब गुरव यांचा हा बंगला आणि बंगल्यातली विविध कलाकृती, असे म्हणता येईल. त्यांच्या लाडक्या लेकीने जणू माझ्या कुटुंबातली एक सदस्य माझी लाडकी भगिनी चित्रा मेटे या ख्यातमान उद्योजिकेने गुरव सरांना गिफ्ट केलेला हा कलाकृतीचा उत्तम नमुना, सुम्बरान बंगला. मी मोठा आहे कारण चित्रा मेटे यांच्यासारखी गाजलेली नावाजलेली व्यक्तिमत्वे माझ्या मित्रपरिवारात आहेत….


तुम्ही सहकुटुंब किंवा मित्र परिवारासह सुम्बरान फाउंडेशन फॉर आर्ट अँड कल्चर हि भारतीय कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या य ख्यातनाम संस्थेत जाऊन तुमच्या मुलांना तेथे कायम भरविण्यात येणाऱ्या कला कार्यशाळेत किंवा कलाविषयक निवासी शिबिरात अधून मधून दाखल करवून यावे. चित्रकार गुरव हे चित्रकलेत पुढली पिढी घडविण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात आणि चित्रा मेटे जे जे शक्य असेल, सढळहस्ते सर्वप्रकारचे सहकार्य करून मोकळ्या होतात. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाने केलेला कलाविषयक विकास आणि त्या समाजाची सांस्कृतिक जडण घडण याद्वारे ओळखली जाते हे चित्रकार रावसाहेब गुरव आणि उद्योजिका चित्रा मेटे यांचे ठाम मत आहे आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र आहे. पुण्यातल्या सुम्बरान बंगल्यात सुम्बरान फाउंडेशन मध्ये न जाणे म्हणजे काहीतरी राहून गेले, म्हणण्यासारखे आहे…

भ्रमणध्वनी ९८२२३९९८७३.

तूर्त एवढेच:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *