मुख्यमंत्री जेथे आरोग्य तेथे : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्री जेथे आरोग्य तेथे : पत्रकार हेमंत जोशी 

असे सतत पाहायला मिळते कि पैसे नसल्याने उपचार करणे अनेकांना शक्य नसते, तडफडून मरतात कारण पैसे नसतात, पण फडणवीस याआधी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अत्यंत महत्वाचे काही काम केले असेल दोन अस्सल हिरे त्यांनी आधी शोधून काढले नंतर त्यांना सांगितले कि यापुढे जो कोणी उपचार करवून घेण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक मदत मागेल, त्याला तिथल्या तिथे सहकार्य करून मोकळे व्हा पैकी एक होते ओमप्रकाश शेट्ये ज्यांच्यावर मुख्यमंत्री सहाय्यता मदत विभागाची जबाबदारी टाकण्यात आली जी त्यांनी सतत पाच वर्षे चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि दुसरे होते मंत्री गिरीश महाजन. महाजन यांनी भरविलेली आरोग्य शिबिरे भूषणावह. मला आठवते एक दिवस चाळिशीतल्या बाई माझ्याकडे आल्या, म्हणाल्या, त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या किडन्या काम करीत नाहीत खर्च मोठा आहे मी सिंगल पॅरेण्ट आहे, माझे फारसे उत्पन्न नाही. नाही म्हणायला एका पोलीस अधिकाऱ्याकडे मी ओळखीतून गेले होते पण आधी त्यांना माझे शरीर हवे होते जे मला देणे शक्य नव्हते…

मी त्याना म्हणालो, काळजी करू नका, कागदपत्रे घेऊन माझ्याकडे या, मी बघतो काय करायचे ते. त्या माझ्या नरिमन पॉईंट परिसरातल्या कार्यालयात आल्या मी ओमप्रकाश शेट्ये यांना फोन केला त्यांनी त्यां बाईंना लगेच बोलावून घेतले, त्यांचा अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे त्यांच्या कडून मागवून घेतली, पुढे केवळ १०-१२ दिवसात त्या बाईंचा मला फोन आला कि मुलाचे उपचार ठरल्याप्रमाणे झाले आहेत त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे आणि आम्हाला हवी ती रक्कम शेट्ये यांच्या कार्यालयाकडून धनादेशास्वरुपात मिळाली आहे. त्या हे साश्रू नयनांनी सांगत होत्या, मी मनातल्या मनात मुख्यमंत्र्यांचे आणि फोनवरून शेट्ये यांचे आभार मानले. मित्रहो, संपूर्ण पाच वर्षे सर्वाधिक साऱ्या जाती जमातीच्या  लोकांची गर्दी जर त्या मंत्रालयात मला बघायला मिळाली असेल तर ती मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी कक्षात जेथे फडणवीसांनी सढळ हस्ते विविध पेशंट्सला शासकीय आर्थिक मदत केली, कित्येक आशीर्वाद त्यांना मिळाले. यापुढे देखील ज्यांना गंभीर आजारांवर पैशांअभावी उपचार करवून घेणे अशक्य आहे, अन्यत्र सहकार्य मिळेनासे झाले आहे, त्यांनी थेट फडणवीसांचे कार्यालय गाठावे आणि निश्चिन्त व्हावे…

खऱ्या अर्थाने फडणवीस हे गरिबांचे मुख्यमंत्री आहेत असे मला नाव न छापण्याच्या अटीवर एक मुस्लिम पत्रकार म्हणाला होता. आजपर्यंत मी ज्या ज्या मुस्लिम बांधवांना त्यांच्या दुर्धर रोगावर उपचार करवून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सहाय्यता निधीतून मदत मागितली, त्यांनी एकदाही तोंड वाकडे केले नाही वरून ते म्हणायचे, तुम्ही हे चांगले काम करताहात. आमच्या मुस्लिम मोहल्ल्यातून या सहाय्यता निधीची यासाठी सारे तोंडभरून तारीफ करतात कारण अनेकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत. जात पात धर्म असे काहीही न बघता फडणवीस अनेकाना सहकार्य करून मोकळे होतात, जीवनदान मिळणे यासारखे दुसरे महत्वाचे काम आयुष्यात दुसरे काय असू शकते जे फडणवीसांना मनापासून करायला आवडते, हे सांगतांना त्याचे डोळे कृत्दनतेने भरून आले, मलाही ऐकून भरून आले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *