मुस्लिमांचे लांगुलचालन २ : पत्रकार हेमंत जोशी

मुस्लिमांचे लांगुलचालन २ : पत्रकार हेमंत जोशी 

चांगल्या देशप्रेमी सुसंस्कृत मुस्लिमांबद्दल मनात अजिबात राग नाही. आज जगात सर्वत्र अमेरिकेसारखे वातावरण आहे म्हणजे बहुतांश देशांमधून सर्व जातिधर्मांच्या लोकांनी ठाण मांडले आहे त्यात वावगे असे काही नाही तेव्हा मुसलमानांनी या देशातून चालते व्हावे असे म्हणण्यापेक्षा पाकधार्जिण्या मुसलमानांनी चालते व्हावे म्हणणे अधिक योग्य ठरते. मला मुंबईबाहेरचे फारसे माहित नाही पण जवळपास अख्या मुंबईची अवस्था काही टग्या मुस्लिमांनी दयनीय करून ठेवली आहे, त्यांच्यासमोर मराठी किंवा हिंदू माणूस विशेष म्हणजे मुंबईचे पोलीस देखील हतबल ठरलेले आहेत, या काही टग्या मुस्लिमांचे विशेषतः आडदांड रागीट राकट टग्या मुस्लिमांचे रस्त्यावरून विशेषतः मोटारबाइकवरून वावरणे किंवा मुस्लिम वस्त्यांमधून गाडी चालविणे अक्षरश: जीव मुठीत धरून सारे सोसावे लागते, पोलीस बाजूला उभे असतात पण पाठ करून घेतात. आणि या अशा टग्या म्हणजे आपल्या देशावर प्रेम नसलेल्या मुस्लिमांची जेव्हा हलकट सुमार केतकर बाजू घेतात, बाजू मांडतात तेव्हा वाईट वाटते…


लोकसभा निवडणुकीदरम्यान गृह खात्याचे मंत्री म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगणे योग्य ठरणार नाही पण एकदा का मतदान आटोपले कि त्यांना हात जोडून सांगणार आहे, रस्त्यावरून चालतांना फिरतांना देखील जीव मुठीत धरून ज्या टग्या मुसलमानांमुळे जीवन आम्हा नकोसे होते त्यांचा बंदोबस्त करा, पोलिसांना देखील हेच सांगणार आहे कि अशा टग्या मुसलमानांसमोर कृपया मान उंच करून सामोरे जा त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही आणि जे या मुंबईवर मनापासून प्रेम करणारे सुशिक्षित मुस्लिम आहेत त्यांना तर माझे आव्हान आहे त्यांनी या अशा टग्या मुस्लिम तरुणांचे मतपरिवर्तन करून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचे कृपया प्रयत्न करावेत. काही टग्यांमुळे अख्खी मुस्लिम कोम बदनाम होणार याची काळजी घ्यावी. मी केतकर नाही, कृपया माझ्या लिखाणाचे वेगळे अर्थ काढू नयेत, मी कडवा हिंदू आहे पण इतरांवर देखील प्रेम करणे मी माझे कर्तव्य समजतो…


थोडेसे विषयांतर करतो. माझे एक सिक्रेट सांगतो. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि माझे लिखाण या राज्यातल्या काही मान्यवरांनी वाचावे म्हणून मी त्यांना वेगळ्या पद्धतीच्या पे रोल वर ठेवलेले आहे. म्हणजे पत्रकार यदु जोशी यांनी माझे अमुक एक लिखाण वाचावे असे मला वाटले कि मी माझ्या एका नातेवाईकाला फोन करून सांगतो कि या लेखात मी यदुवर टीका केलेली आहे. पुढल्या क्षणी माझे काम झालेले असते. पत्रकार उदय तानपाठक यांनी वाचावे असे वाटले तर सुरुवात एखाद्या पदार्थाची रेसिपी विचारून करतो म्हणजे आळूचे फदफदे कसे करायचे किंवा कांदा चिरताना डोळ्यात पाणी न येण्यासाठी काय करतो वगैरे वगैरे. डॉ. राजेश सर्वद्न्य यांनी वाचावे असे वाटले तर त्यांच्या लग्नाचा विषय काढतो मग ते लगेच विषयांतर करून माझ्या लिखाणावर येतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्य्यकाने म्हणजे अभिमन्यू पवारांनी वाचावे असे वाटले तर त्यांना खोटे खोटे म्हणतो, अलीकडे तुमचे व्यक्तिमत्व उठावदार झाले आहे आणि कौस्तुभ धवसे यांना, तुम्ही कित्ती बारीक झालात, फक्त म्हणण्याचा अवकाश माझे लिखाण मग ते मुखोद्गत सांगतात…


भाजपाने पत्रकारांची, विरोधकांची, वाहिन्यांची बोलती तेथल्या तेथे बंद करण्यासाठी अलिकडल्या काही वर्षात दोन अतिशय अभ्यासू, मेहनती, जिद्दी, सुशिक्षित, तंतोतंत जवाब देणार्या नेत्यांना प्रकाशझोतात आणले आहे, माधव भंडारी आणि विश्वास पाठक हि ती दोन नावे पैकी याठिकाणी मी पथकांवर येथे काही लिहिणार नाही कारण ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर आधी एखाद्या नवविवाहितेसारखा छान मुरका घेतात नंतर अगदी लाजून धन्यवाद म्हणतात. अलीकडे माधवजींना विचारले निदान काही कामे अशी सांगा जी आघाडी पेक्षा तुम्ही अधिक सरस पद्धतीने पार पाडलेली आहेत. क्षणार्धात ते म्हणाले, आधीची आघाडी सरकारची १५ वर्षे त्यापेक्षा आमची केवळ ४ वर्षे साऱ्याच शासकीय निर्णयात नक्की वाखाणण्याजोगी आहेत. उदाहरणे खूप देता येतील. या राज्यातल्या बहुसंख्य स्त्रिया माना खाली घालून रस्त्याच्या कडेला कशाबशा प्रातर्विधी उरकायचा, आता हे राज्य हगणदारीमुक्त झाले आहे किंवा अत्यंत महत्वाचे म्हणजे आघाडीच्या काळात स्वतः त्या त्यावेळेचे मुख्यमंत्री संपूर्ण पाच वर्षात गरिबांना गरजूंना फारतर चार पाच वर्षात ३०-४० कोटी रुपये वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत उपचारासाठी वाटायचे, केवळ या चार वर्षात फडणवीसांनी ४५० कोटींच्या वर रकमेची आर्थिक मदत गरजूंना करून जणू एक विक्रम या देशात नोंदविलेला आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात असलेले योगदान चार दोन ओळीत येथे सांगणेही शक्य नाही….

अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *