चौधरी चाचा ४२० : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

चौधरी चाचा ४२० : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

श्रीमान विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेले लिखाण मी फेसबुकवर टाकले, दुसरे दिवशी त्यांचा फोन आला, छान वाटले, त्यांचा फोन आला त्यावेळी मी नेमका मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर स्वतः ड्राइव्ह करत होतो, वरून धो धो पाऊस, फोनवर बोलणे शक्य नव्हते, तरीही चार दोन वाक्ये एकमेकांशी आम्ही बोललो, त्यांना माझ्या लिखाणातले काही मुद्दे खटकल्याचे त्यांनी सांगितले, मी त्यांना म्हणालो, अहो, लेखणी माझी आहे, तुम्ही मला नेमके काय मुद्दे मांडू सांगा, पुन्हा त्यावर लिहिता येईल, पुण्यातली कामे आटोपलीत कि फोन करतो, मी म्हणालो, आम्ही फोन खाली ठेवला. मला दुसरे दिवशी सकाळी वेळ मिळाला, आधी त्यांना मेसेज केला, आपण आता केव्हाही फोन करा, मी मोकळा आहे, त्यांचा फोन आला नाही मग मीच त्यांना फोन लावला, त्यांनी तो घेतला नाही, त्यावर आता चार पाच दिवस उलटले आहेत, यापुढे मला थांबणे शक्य नाही, वाचकांना सांगितलेले असल्याने चौधरी यांचा अपूर्ण राहिलेला लेख आता येथे पूर्ण करणे आवश्यक वाटते…


जे मला वाटते ते मी सांगतो, मी मोठा माणूस अजिबात नाही पण एका सामान्य माणसाला जे वाटते ते येथे सांगतो. समाजसेवकांनी, नेत्यांनी, राजकारण्यांनी सार्वजनिक जीवनात वावरतांना खूप पारदर्शक असावे असे वाटते पण आपल्याकडे हे घडत नाही, हि मोठी माणसे एकमेकांशी सतत डावपेच खेळतात त्यातून विनाकारण डोकेदुखी वाढवून घेतात. सततच्या थर्ड ग्रेड हिंदी मराठी सिरियल्स पेक्षा कितीतरी अधिक पटींनी हि मोठी माणसे सततचे डावपेच खेळून आपले स्वतःचे आणि आपल्यासंगे आपल्या कुटुंबाचे मन:स्वास्थ्य, आरोग्य, घरातले वातावरण बिघडवून मोकळे होतात, ज्याची अजिबात गरज नसते हे मी राजकीय पत्रकारितेतल्या प्रदीर्घ अनुभवावरून सांगतो, सांगत आलो आहे. या साऱ्यांना हे असे का करावे लागते कारण त्यांना आपले खरे हिडीस विकृत भ्रष्ट रूप, स्वरूप लोकांसमोर उघड करायचे नसते, पण ते तसे होत नाही, झाकलेलेकोंबडे आरवल्याशिवाय राहत नाही, त्यापेक्षा आपण जे जसे आहोत ते तसे हुबेहूब समाजा समोर आणून वाटचाल सुरु ठेवावी, त्रास होत नाही अन्यथा एक दिवस या अशा साऱ्यांचा बाबा रामरहीम होतो, नेमके कॅरेक्टर उघड होते…


देव गायकवाड प्रकरणावरून आमदार जितेंद्र आव्हाड चिडले, संतापले, चौधरी यांनी त्यांनाच टार्गेट केले आहे असे आव्हाड यांना वाटल्याने मग आव्हाड यांनीही चौधरी यांची चड्डी सोडली, चौधरी नेमके कसे, ते सांगून मोकळे झाले किंवा विश्वंभर चौधरी नेमके कसे, आव्हाड यांनी थेट आक्रमक, चड्डिसोड शब्द वापरून चौधरी यांची अडचण करून टाकली असावी कारण आव्हाड यांच्या टीकेने खूपसे अस्वस्थ झालेले चौधरी त्यावर खुलासा देऊन मोकळे झाले पण वेळ निघून गेली होती, चौधरी वरून वेगळे कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांचे प्रत्यक्ष स्वरूप नेमके कसे, तोपर्यंत जितेंद्र आव्हाड मांडून मोकळे झाले होते, थोडक्यात ज्यांची शोध पत्रकारिता आहे, त्यांना आव्हाड नेमका क्ल्यू देऊन मोकळे झाले आहेत, मोकळे झाले होते, म्हणून कदाचित विश्वंभर चौधरी अधिक अस्वस्थ झाले असावेत…


आव्हाड आणि चौधरी तसे दोघेही आक्रमक आहेत, त्यातला एक बेरका राजकारणी तर दुसरा एकदम तयारीचा समाजसेवक, थोडक्यात दोघेही एकमेकांना उरून पुरणारे, त्यामुळे आव्हाडांच्या आरोपांना उत्तर देतांना चौधरी यांनी देखील आक्रमकपणा दाखविणे आवश्यक होते पण ते घडले नाही, स्पष्टीकरणातली भाषा अतिशय नरमाईची होती, ते वाचल्यानंतर मनाला खटकले, शंकेची पाल मनात चुकचुकली, एखाद्या अति संशयी बायकोसारखे का कोण जाणे पण चौधरी यांच्याकडे बघावेसे वाटले, हे असे घडायला नको, वाघ जर मटणाऐवजी उकडपेंडी खायला मागू लागला किंवा सलमान खान सारखा पुरुष जर तरुणींना सोडून विटाळ गेलेल्या एखाद्या बाईला चुम्मा मागू लागला तर कसे व्हायचे..


आव्हाड यांनी चौधरी यांच्यावर केलेले आरोप त्यावर चौधरी यांचा खुलासा, हे सारे माझ्या पाक्षिकाचा पुढल्या अंकात नक्की वाचा, मला नेमके काय सांगायचे आहे, तुम्हाला त्यातून नक्की कळेल. सहजच एक गम्मत सांगतो, एखाद्या बाईला चार पाच मुले असतात, मुलांना खायला देतांना त्यातल्या एखाद्याला कमी मिळाले कि तो असे काही भोकांड पसरतो कि पुढे त्याच्या मनासारखे तर होतेच पण हे असे मूल कुटुंबात आपोआप सेन्टर ऑफ अट्रॅक्शन होते, माझे नेमके हे असेच त्या भोकांड पसरणाऱ्या लहान मुलासारखे होत आले आहे, मी नेमके सत्य लिहितो, जे खरे आहे तेच लिहितो, त्यामुळे पत्रकारितेची वाटचाल करतांना मला यदु जोशी होता आले नाही, बड्या लोकांना मनापासून लिखाणातून झोम्बलो एखाद्या मिर्चीसारखा, त्यामुळे तथाकथित मंडळींनी शेजारी जागा देतांना मनात कायम भीती बाळगली, मग मी काय केले, माझा स्वतःचा जगभर दर्जेदार वाचक वर्ग निर्माण केला, आणि हे तथाकथित आपोआप तोंडावर पडले, या सार्या वाटचालीत अर्थात अनेक नामवंत मंडळींनी अगदी उघड जे कौतुक केले किंवा प्रेमाने पाठीवर दरवेळी कौतकाची जी थाप मारली या अशा मंडळींचे ऋण फिटणे अशक्य, त्यांच्यावर एक दिवस नक्की पुस्तक लिहून मोकळा होईल, थोडेसे विषयांतर झाले खरे पण ते आवश्यक वाटले…


येथे स्वतःविषयी यासाठी सांगितले कि आमच्या क्षेत्रात दरदिवशी माझ्यासारखे अनेक धडपडतांना बघतो पण पुढे त्यांना नैराश्य आले आणि ते संपले हे ही बघत आलो आहे, अशा मंडळींनी अजिबात निराश न होता मन आणि तन शांत ठेवून वाटचाल करावी, नाव कमवावे, खूप मोठे व्हावे, म्हणून मनातले तेवढे सांगितले. स्वस्तुती करणारा तो एक मूर्ख असतो, हो याठिकाणी मी मूर्ख आहे, मी मूर्खपणा केला आहे…

मागल्या वर्षीच्या शिक्षक दिनी मी माझ्या शाळेतल्या आवडत्या पंडितराव पुराणिक सरांना अगदी फोनवर अगदी भावुक होऊन म्हणालो, सर, आज मी जे काही आहे ते तुम्हा शिक्षकांमुळेच आहे…खडूस सर म्हणतात कसे, आम्हाला दोष देऊ नकोस, आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले होते, सारीच मुले चांगली निघतील, असे होत नाही…!! 

मित्रांनो, तूर्त एवढेच…

पत्रकार हेमंत जोशी 

LikeShow more reactions

Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *