आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी 

बिग बॉस या सुरु असलेल्या कलर वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री मैथिली जावकरवर अन्याय झाला तिच्यावरअन्याय केल्या गेला असे वारंवार जाणवते. जेवढे १५ दिवस ती बिग बॉस मध्ये सहभागी झाली तिच्यावर कॅमेरा एवढा कमी फोकस केल्या गेला कि ती या कार्यक्रमात सहभागी आहे किंवा नाही त्यादरम्यान दर्शकांना जाणवायला लागले होते, हा तिच्यावर सारासार अन्याय झाला वाटायला लागले आहे याठिकाणी समजा वैशाली माडे वर अन्याय झाला असता तर मनसेची कार्यकर्ती म्हणून लगेच राजगडावरून कलर ला धमकावले गेले असते किंवा त्या बिचुकलेवर अन्याय झाला असता तर थेट साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांनी कलर वाहिनीच्या संबंधित प्रमुखांना भोसडले असते, आमच्या माणसांवर अन्याय होतोय…

तसे मात्र भाजपाकडून मैथिली जावकरच्या बाबतीत घडले नाही म्हणजे भाजपामधल्या अत्यंत प्रभावी विनोद तावडे किंवा आशिष शेलार यांनी कलर वाहिनीला साधा जाब देखील बिचारलेला नाही कि एकमेव मैथिली जावकर वर, आमच्या या प्रामाणिक कार्यकर्तीवर तुम्ही अन्याय का केलाय, तिला वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही द्यायलाच हवी, हे असे विविध वाहिन्यांवर राजकीय दबाव आणून सऱ्हास अनेक स्पर्धकांना पुढे केले जाते, पुढे नेले जाते जाते. आज तुम्हाला मी येथे मुद्दाम सांगू इच्छितो आहे जसे एखादया शाळेत लाडक्या विद्यार्थ्याला वेगळ्या फॅसिलिटीज असतात माझी माहिती अशी कि वाहिन्यांवरील स्पर्धांमध्ये रिऍलिटी शोज मध्ये असे अनेकदा, वारंवार घडत असते त्यामुळे सर्वसामान्य लागा नसलेल्यांवर त्यातून हमखास अन्याय होतो, केल्या जातो…

उद्या समजा मला हे समजले कि बिग बॉस मध्ये भाग घेणारे जे स्पर्धक, आम्हाला दररोज दिल्या जाणारे तुमचे मानधन नको फक्त आमचे तेवढे अस्तित्व कायम ठेवा, असे जर त्यातल्या काही स्पर्धकांनी स्वतःची फुकाची जगभर जाहिरात करवून घेण्या साठी सांगितले आणि कलर ने ते ऐकले तर मला त्यात अजिबात यापुढे आश्चर्य वाटणार नाही किंवा कदाचित असे घडलेले देखील असेल, घडत असेल. विशेष म्हणजे जेवढे महेश मांजरेकर मी जवळून ओळखतो त्या मांजरेकर यांचे वैशिष्ट्य असे कि ते त्यांच्या मित्रपरिवाराला कायम संधी देण्यात आघाडीवर असतात. त्यांचा बंद पडलेला मिफ्ता अवॉर्ड शो मी जवळून अनुभवला असल्याने, मांजरेकर नेमके कसे तेथे मी थेट जवळून बघितलेले आहेत, येथेही ते दिसले आहेच, तो कोण बाप्पा किंवा केळकर किंवा हीना पांचाळ इत्यादींकडे बघून आणि त्यांचे खास असलेले जर उद्या मोठ्या खुबीने शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात आले तरी देखील त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. महेश मांजरेकर यांचा हा मनमानी खाजगी शो असे बिग बॉस चे वर्णन करणे येथे अधिक सोयीस्कर वाटते…

मीडिया च्या विरुद्ध मीडिया सहसा जात नाही, व्हेस्टेड इंटरेस्ट मार खाल्ले तरच ते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे जातात ज्याप्रकारे गेल्या अनेक वर्षात दैनिक लोकमत त्या देशोन्नती, सकाळ, नागपूर पत्रिका इत्यादींशी पंगा घेऊन मोकळे झाले आहे त्यावरून सांगतो. पण येथे आमच्याबाबतीत असे अजिबात नसतांना आम्ही असे केवळ मूठभर त्या भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आहोत कि कोणत्याही प्रभावी असलेल्या मीडिया क्षेत्राची अजिबात पर्वा न करता ते जेथे जेथे चुकलेत, चुकतात, त्यांना तेथे तेथे ठोकून काढतो. कारण भानगडी करणाऱ्या मीडिया क्षेत्रातील मंडळींना वठणीवर आणण्याचे काम फक्त मीडिया करू शकते, इतरांनी तसा प्रयत्न जरी केला तरी त्यांना सारे एकत्र येऊन उध्वस्त करतील, आयुष्यातून उठवतील. यांच्याशी पंगा घ्यायचा म्हणजे सर पे कफन बांधके लिखना पडता है…

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *