आघाडी नव्हे बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी

आघाडी नव्हे बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी 

मला असे स्वप्नातही वाटले नव्हते कि दीक्षितांची माधुरी डॉ. नेने यांच्याशी लग्न करून मोकळी होईल, आईशपथ वाटले होते ती फक्त आणि फक्त हेमंत जोशी यांच्याच गळ्यात वरमाला घालून मी श्रीराम जोशांची सून जगाला सांगत सुटेल. चालायचेच, काही माणसांना सवय असते चुकीचे निर्णय घेण्याची. मला हेही कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते कि जे तीन शब्द हेटाळणीचे टिंगल करण्याचे खिजविण्याचे, टवाळकी करण्याचे आहेत त्या, ब्राम्हण संघ आणि विदर्भ या तीन शब्दांभोवताली देखील वलय निर्माण होईल, कारण संघ आणि जनसंघ केवळ बामणांचे असे सतत कायम वर्षानुवर्षे चिडविले डिवचले जाई, जनसंघाचे उमेदवार अमुक एखाद्या आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीत दुपारी अनामत रक्कम जप्त झाली शब्द त्यांच्या कानावर पडले की संध्याकाळी तेच उमेदवार जणूकाही घडलेच नाही या अविर्भावात दक्ष आरम करायला संघस्थानावर उपस्थित राहायचे…

आमच्या जळगाव जामोद या गावात माझ्या वडिलांचे अजाबराव देशमुख नावाचे लंगोटीयार मित्र होते, जवळपास आयुष्याच्या अखेरपर्यंत ते अक्षरश: अंगावर कर्ज घेऊन येणारी प्रत्येक विधानसभा लढवायचे पराभूत व्हायचे नि पुढल्याक्षणी कोणतेही दुःख संकट चेहऱ्यावर न भासविता संघाच्या पक्षाच्या पुढल्या कामांसाठी तयार व्हायचे नवराष्ट्रनिर्माण याचा ध्यास घेतलेले विशेषतः आम्ही विदर्भातले ब्राम्हण किंवा सारेच संघावाले अवाढव्य काँग्रेस समोर न घाबरता तुटपुंज्या ताकदीनिशी लढत राहिलो आणि तो दिवस लाखोंच्या जनसमुदायासमोर उगवला, जेव्हा विदर्भातल्या एका संघाला वाहून घेतलेल्या घराण्यातला तरुण देवेंद्र फडणवीस लोकांच्या साक्षीने दिमाखात म्हणाला, मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईशवराच्या साक्षीने शपथ घेतो कि….


संघाला जनसंघाला किंवा ब्राम्हणांना गांधी वधानंतर जवळपास ६५-७० वर्षानंतर चांगले दिवस आलेत जेव्हा पहिल्यांदा त्यांना देशात राज्यात सत्तेत स्थान मिळाले अन्यथा दरवेळी प्रत्येकवेळी पवारांसारख्या बेरकी नेत्यांनी जातीयवादीची गांधीवधाची बाबासाहेब पुरंदरेंसारख्या ऋषितुल्य विषयांवर मुद्दाम ठिणगी टाकून आग लावून द्यायची नि महाराष्ट्र लचके तोडण्या ताब्यात घायचे हेच वर्षानुवर्षे चालले होते पण समोर हिम्मत न हारता विविध रूपात संघ भाजपावाले आंदोलने करून त्यांना उघडे पाडते झाले नि तो दिवस एकदाचा उगवला जेव्हा देश राज्य पोखरणाऱ्यांचे असली रूप उघडे पडले नि देशाने राज्याने रामराज्याचा दिशेने वाटचाल सुरु केली. मित्रहो, समोर खतरनाक जातीयवादी मीडिया, महाखतर्नाक नेते व अधिकारी पण त्यातील एकही हरामखोराला भीक न घालता मी एकटा लेखणीतून त्यांच्यावर जेव्हा तुटून पडत होतो तेव्हा माझ्या घरी प्रत्येकवेळी काळजाचा ठोका कायम चुकायचा पण मी मात्र सारे हसत हसत हे सहन करून आजपर्यंत पुढे पुढे आलो, सरपे कफन बंधनेवाले कभी मौतसे डरते नाही…


कालचा जनसंघ म्हणजे आजचा भाजपा केवळ पराभूत होण्यासाठी आणि विदर्भ मराठवाडा सहनशील सात्विक नेत्यांना वापरून घेण्यासाठीचा प्रदेश याचपद्धतीने सवतीच्या भूमिकेत आपल्यातले वावरले पण एक दिवस उकिरड्याचाही येतो हे सिद्ध झाले नि मूठभर बदमाश नेते गु सांडलेल्या गटारात पडले. बरे झाले. शिवसेना आणि भाजपवाल्यांनी माझ्या घरी फुकटात दुधाचा रतीब लावला आहे म्हणून मी त्यांची विधानसभा निवडणुकीनिमित्ते तारीफ स्तुती करत सुटलेलो आहे असे समजायचे अजिबात कारण नाही, त्यांच्यातले जे चुकतील चुकलेले, हि विधानसभा निवडणूक आटोपली, मी त्यांचीही लक्तरे वेशीवर टांगून मोकळा होईल पण हि ती त्यांची लफडी कुलंगडी काढण्याची वेळ नाही, येथे पुन्हा एकवार साऱ्या सुजाण जागरूक मतदारांनी न विसरता मतदानाला बाहेर पडायचे आहे नि पुन्हा एकवार युतीला म्हणजे सेनेला भाजपाला निवडून विधानसभेत दिमाखात पाठवायचे आहे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *