संजय घरत आला परत १ : पत्रकार हेमंत जोशी

संजय घरत आला परत १ : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे एक सज्जन प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले, हे सरकार खरोखरी बावळटांचे वाटले, निदान या सरकारातील तमाम सदस्यांनी आधीच्या आघाडी सरकारात पुण्यातले भोसले किंवा मुंबईतले जाधव यांच्यासारखे नेहमीचे जे नीच हलकट देशद्रोही राज्य लुटणारे डाकुछाप दलाल आहेत त्यांच्याऐवजी नव्या दमाचे तरी दलाल घडवायला हवे होते पण तसे अजिबात घडले नाही, आजही मंत्रालय असो कि विधान भवन, तेच ठरलेले नेहमीचे नागपुरातल्या मुंडे यांच्यासारखे हरामखोर थर्डग्रेड दलाल जेथे तेथे नजरेस पडतात, अत्र तंत्र सर्वत्र नेहमीच्याच गरिबांचा गु खाणाऱ्या दलालांचे फावतांना दिसते आहे म्हणजे गणपतराव देशमुख यांच्यासारखे आदर्श आमदार अमुक एखाद्या मंत्र्यांच्या केबिनबाहेर ताटकळत बसलेले असतांना झंवर यांच्यासारखे दलाल मात्र आतल्या केबिनमध्ये म्हणजे अँटी-चेंबर मध्ये मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून हास्यकल्लोळात बुडालेले असतात, खरे आहे ते, सरकार मग ते कोणतेही असो, दलालांची पाचही बोटे तुपात असतात…

हे लिखाण तुमच्या हाती पडेपर्यंत कदाचित कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त भ्रष्ट अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यावर ओढवलेले संकट त्यांच्या बदलीवर निभावले असेल म्हणजे त्यांनी येथे लूट लूट लुटले आता तेच करायला ते दुसरीकडे फारतर गेले असतील. संजय घरत यांच्या या संकटात मदतीला मनापासून धावणारे राज्यमंत्री रवी चव्हाण व माहितीच्या अधिकारातील एक सनसनाटी नाव कौस्तुभ गोखले, घरटांच्या मदतीला अगदी उघड धावले म्हणून घरत यांचे निव्वळ बदलीवर निभावले, निलंबन झाले नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे….

माहितीच्या अधिकाराचा अतिशय सखोल अभ्यास असणारे, विशेषतः उभ्या राज्यात नगरविकास आणि महसूल खात्यात जरब दरारा धाक असणारे डोंबिवलीतले कौस्तुभ गोखले तसे फाटके व साधे व्यक्तिमत्व आहे, तुमचा त्यांच्यासमोर घरत यांच्याबाबतीत टिकाव लागणे अशक्य, मी घरत यांच्या विरोधकांना म्हणताच, तुम्हीच त्या गोखले यांचे कौतुक करावे त्यांना फाटके फारतर गरीबही म्हणावे. स्वतःला माहितीच्या अधिकारातले हुकमी म्हणणारे गोखले यांच्या उत्पन्नाचे सुरुवातीपासूनच साधन कोणते, मग ते एवढ्या प्रचंड इमारतीत राहायला कसे, त्यावर मी म्हणालो, अहो, ती त्यांच्या सासूची वडिलोपार्जित इमारत आहे मला नाही वाटत त्यांची स्वतःची अशी,किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावे ठाणे किंवा पुणे जिल्ह्यात आणि मुंबईत कित्येक कोटी रुपयांची मालमत्ता असावी, तुम्ही तसे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या, तदनंतर मी स्वतः वाटल्यास त्यांच्या विरुद्ध आखाड्यात उतरेन पण उठसुठ कौस्तुभ लढताहेत म्हणून त्यांना उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, पुराव्यांशिवाय कृपया काही बोलू नका. बघूया हि माणसे त्यांचे बोलणे खरे करणार आहेत किंवा नाहीत, कौस्तुभ गोखले आणि कुटुंबीय कित्येक कोटींचे मालक, त्यांच्या पश्चात बोलणारे त्यांचे विरोधक, पुराव्यांशिवाय काहीही बोलू नका, असे मी त्यांना ठणकावल्यानंतर वास्तवात नजीकच्या काळात काही सिद्ध करू शकतील वाटत नाही, सध्यातरी वाट पाहणे आपल्या तेवढे हातात आहे…

केवळ थर्डग्रेड संजय घरत यांच्या पाठीशी एक मित्र म्हणून कौस्तुभ गोखले उभे म्हणून तेही वाईट, म्हणणे नक्की चुकीचे. पुराव्यंशिवाय कोणावरही आरोप केले तर काय होते हे घरत यांनी दाखवून दिले आहे, गोखले यांचे आवडते वकील खन्ना यांनी स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांना घरत यांच्या बदनामीची नोटीस पाठविली असल्याचे मला कळले आहे. नेमके काय ते पुढल्या भागात मांडतो….

श्री मंदार श्रीकांत हळबे हे डोंबिवलीतल्या रामनानगर परिसरातल्या प्रभाग क्रमांक ६८ मधून निवडून आलेले अत्यंत धाडसी, बुद्धिमान नगरसेवक, तेच संजय घरत प्रकरणातले प्रमुख हिरो, न घाबरता ते सम्राट घरत यांच्याविरुद्ध लढा देताहेत, आता तर सारेच नगरसेवक मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे, घरत यांच्या अगदी उघड विरोधात एकवटले आहेत, हळबेंनी तर घरत यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमा करून त्यावर तोफ डागलेली आहे म्हणून शासनाने देखील वादग्रस्त रवी चव्हाण राज्यमंत्री असतानाही हळबे यांच्या तक्रारींची सिरियसली दाखल घेतलेली आहे. भाजपचे स्थानिक नेते, अध्यक्ष आणि आमदार नरेंद्र पवार हे देखील नेमके घरत यांच्या संदर्भात नेमके पुरावे घेऊन आले असतांना मला संबंधित सचिवांकडे मंत्रालयात भेटले, म्हणाल तर त्यांची अचानक गाठ पडली, तेही घरत विरोधी प्रवाहात दाखल झाल्याचे बघून समाधान वाटले, बघूया पुढे नेमके काय घडते ते….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *