फिटे अंधाराचे जाळे, बावनकुळे तुमच्यामुळे १ : पत्रकार हेमंत जोशी


एखादयला कमी लेखणे, एखाद्याकडे संशयाने बघणे, एखाद्याची पीठपीछे 
थट्टा करणे, एखाद्याची अक्कल काढणे, एखाद्याला हीन लेखणे, एखाद्या 
विषयी सतत वाईट बोलणे हा आम्हा मराठीचा किंबहुना भारतीयांचा 
स्वभाव कितीही शिकलो तरी जात जात नाही, हा दुर्गुण काहीकेल्या 
तुमच्या आमच्या शरीरातून निघता निघत नाही. श्रीमान देवेंद्र फडणवीस 
मुख्यमंत्री झाले, त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात नागपूरच्याच चंद्रशेखर 
बावनकुळे यांना ऊर्जामंत्री केले तेव्हा हे नागपूरकर आम्हाला काय 
नाचवतील किंवा हे कसले आणि कसे राज्य हाकणार अशी त्यांची 
सुरुवातीला टिंगल टवाळी करण्यात आली पण पुढे हळूहळू वर्षा दोन 
वर्षात जेव्हा नागपूरकर किंवा विदर्भवासी सुसंस्कारातून त्याच्या स्पष्ट 
स्वभावातून आणि कष्टातून कोणती किमया घडवू शकतो, कसे झटके 
भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जातीपातीच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या, 
अमापसमाप पैसे मिळविणाऱ्या नेत्यांना दलालांना प्रशासनाला अधिकाऱ्यांना 
या फडणवीस मुनगंटीवार किंवा बावनकुळे यांच्यासारख्या मंडळींनी जेव्हा 
दाखवून दिले, वठणीवर आणले तेव्हा त्या साऱ्या नीच लुच्चा हलकट राज्यबुडव्या 
लोकांच्या लक्षात आले, वर्हाडी ठेचा किंवा झटका कसा आणि किती तिखट व 
जहाल असतो ते….
मी तर असे म्हणेन कि बावनकुळे यांना केवळ ऑन मेरिट नंतरच्या मंत्रिमंडळ 
वाढीत त्यांचे वीज खात्यातील काम बघून मुख्यमंत्र्यांनी केवळ बक्षीस, इनाम 
म्हणून उत्पादन शुल्क खाते बहाल केले, खडसे यांच्या काळात काहीसे बदनाम 
झालेल्या या खात्याला वठणीवर आणण्यासाठी श्रीमान बावनकुळे यांनी मुद्दाम 
आपणहून मुख्यमंत्र्यांकडून सरळमार्गी व्ही राधा यांना आयुक्त पदावर उत्पादन 
शुल्क खात्यात मागवून घेतले. अन्यथा अमुक एखादा प्रशासकीय अधिकारी 
कडक शिस्तीचा असला, खात्यात शिस्त कारभार आणणारा असला कि त्याला 
आपल्या खात्यातून घालविण्यासाठी मंत्रिमंडळ सदस्य, एखादा मंत्री आकाशपाताळ 
एक करतात अशा धाडसी अधिकाऱ्याची, प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी 
प्रसंगी मुख्यमंत्र्यांना धमक्या देऊन मोकळे कसे होतात हे उदाहरण अलीकडे आपण 
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबतीत बघितले आहे, तेथेही 
ढोपरापासून सलाम त्या फडणवीस यांनाच, मंदा म्हात्रे यांच्यासारख्या त्यांच्याच 
खात्याच्या आमदार असोत कि एकत्र आलेले सारे वादग्रस्त नगरसेवक असोत, स्वच्छ 
विचारांच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी उघड पाठिंबा तुकाराम यांना दिला, पैसे खाणाऱ्यांना 
जोरका झटका दिला. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतीत नेमके 
तेच घडले, ते सरळमार्गी बुद्धिमान धाडसी व्ही राधा यांना अधिकार देऊन मोकळे झाले 
वरून म्हणाले मला या खात्यात शिस्त आणून देण्याची आता जबाबदारी तुमची….
अत्यंत महत्वाचे सांगतो, जे तुमच्या कानावर आजपर्यंत आलेले नाही, श्रीमान एकनाथ 
खडसे यांचे मंत्रिपद जाण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे या राज्याचे उत्पादन 
शुल्क खाते, या खात्याची जबाबदारी जेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे होती, येथे 
उल्लेख टाळतो पण या खात्यातील अमुक एक वादग्रस्त फाईल क्लिअर करण्याच्या 
हव्यासापोटी श्रीमान खडसे आपले मंत्रिपद गमावून बसले आहेत, विशेष म्हणजे त्यांना 
अडचणीत आणणारा दुसरा तिसरा कोणीही नव्हता, त्यांचा पिए इंदिसे होता, ज्याला 
खडसे यांनी तो एक उत्पादन शुल्क खात्यातील मोस्ट करप्ट आणि अतिशय वादग्रस्त 
अधिकारी असूनही मुद्दाम आपल्या खात्यात मागवून घेतला होता, चालायचेच, अमुक 
एखाद्या स्त्रीलंपट पुरुषाला डोक्यावर पदर घेऊन सरळमार्गी विचारांनी कुटुंब सांभाळणारी 
बायको कंटाळवाणी होते पण आळोखे पिळोखे देत त्याच्यासमोर स्तनांचे प्रदर्शन 
करणारी वेश्या त्याला अधिक भावत असते, खडसे यांचे हे असेच काहीसे झाले. 
खडसे यांना त्यांच्या कार्यालयात शिस्तप्रिय नव्हे तर रांडेच्या सवयीचे इंदिसे किंवा 
हरदास मोक्याच्या जागी बसवायचे होते, नको तेवढे कमवायचे होते, पुढे त्यांच्यातल्या 
या अतिलोभाने त्यांचा घात केला आणि उद्या मुख्यमंत्री होऊ पाहणारा हा प्रचंड ताकदीचा 
नेता, अत्यंत सामान्य गिरीश महाजन आज जळगाव जिल्ह्यात त्यांच्यापुढे निघून गेला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *