फेसबुक फ्रेंड्स : पत्रकार हेमंत जोशी


फेसबुक फ्रेंड्स : पत्रकार हेमंत जोशी 

वास्तविक जगभरातले, आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेथले, ज्या क्षेत्रात आपले काम आहे छंद आहे तेथले ज्यांच्याकडे आपले काम पडू शकते त्या प्रांतातले मित्र जोडण्याचे माध्यम म्हणजे फेसबुक पण या फेसबुकचा जेव्हा विकृत मनाने आपण वापर करायला जातो त्यातून घडते असे कि फेसबुक फ्रेंड्स आपल्यावर विश्वास ठेवत नाही, फेसबुक ची विश्व्साहार्ता त्यातून संपणार कि काय वाटत राहते. फेसबुक चा आपल्या स्वतःसाठी सकारात्मक उपयोग करवून घ्या, आनंद मिळेल आणि तुमचे कामही होईल. जसे दिवाळीत मला घरगुती फराळ मोठ्या प्रमाणावर विकत घेऊन काहींना गिफ्ट करायचा होता, फेसबुकवरून मी आवाहन केले, माझे काम झाले. अनेकांना डॉक्टर माहित नसतात, अनोळखी शहरांची माहिती नसते, अनेक कामे असतात त्यासाठी फेसबुक हे प्रभावी माध्यम ठरते. तुम्ही जोडलेले मित्र नेमके उपयोगी ठरतात. हे द्यायचे सोडून आणि फसवाफसवी करण्यासाठी या माध्यमांचा खुबीने उपयोग करून घेणे त्यातून घडते असे कि ज्यांना निखळ मैत्रीचा आनंद घ्यायचा असतो त्यांना मुकावे लागते…

अनेकांना अत्यंत घाणेरडी सवय म्हणजे आपले कौतुक दुसऱ्याच्या वॉलवर टाकणे. माझ्या एका प्रतिष्ठित मित्राला दरदिवशी दुसऱ्याच्या वॉलवर आपले कौतुक टाकण्याची सवय होती सवय आहे, शेवटी न राहवून मला त्यासी सांगावे लागले, यापुढे असे घडले तर मला तुमचे नाव फ्रेंडलिस्ट मधून डिलीट करावे लागेल. दुसऱ्याच्या वॉल वर आपले मजकूर फोटो टाकणे म्हणजे दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या बायकोचा मुका घेण्यासारखे किंवा मित्राचे लक्ष नसतांना त्याच्या पाठी त्याच्या घरात घुसून त्याच्या बायकोला डोळा मारणे, मनात कोणतीही विकृती स्वार्थ फसवाफसवी न ठेवता फेसबुक फ्रेंड्स जोडा, बघा त्यातून फायदेही होतील अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्या लायकीपेक्षा कितीतरी मोठी माणसे मित्र म्हणून तुम्हाला जवळ घेतील. माझ्या एका मित्राने आदल्या दिवशी स्वतःचा फोटो टाकला पुढल्या आठ दिवसात त्याला पंचवीस लाईक्स आलेत नंतर त्याने तरुण आणि देखण्या बायकोबरोबर फोटो टाकला त्याला तीन दिवसात सातशे लाईक्स आले नंतर त्याने स्वतःचा आणि सोबतीने बायकोचा व तरुण मुलीचा फोटो टाकला त्याला एकाच दिवसात आठशे लाईक्स आलेत आणि कमेंट्स तर अशा आल्या कि जणू तो कमेंट्स करणाऱ्यांच्या घरी नियमित ये जा करतो….

अलीकडे माझा आयपॅड हँग झाला तज्ज्ञांना विचारले असता त्याने सांगितले तुमच्या फेसबुक फ्रेंडने शेकडो कविता तुम्हाला मेसेज वर पाठविलेल्या आहेत, मी त्या कविता मग लगेच डिलीट केल्या आणि फेसबुकफ्रेंडला तेच सांगितले कि यापुढे मेसेज वर कविता पाठवशील तर मैत्रीला मुकशील. अर्थहीन अशा  पाणचट कविता, कशासाठी म्हणून दुसऱ्यांवर लादायच्या. ज्यांचे लिखाण कविता उत्कृष्ट असतात त्यांना फ्रेंड्स मनातून दाद देत राहतात पण हेही मात्र तेवढेच खरे कि एखादी देखणी कवयित्री असेल आणि तिच्या कविता अर्थहीन किंवा दर्जेदार नसल्या तरी आमच्यातले विकृत त्यांना डोक्यावर घेऊन मोकळे होतात. अहो, कितीतरी छान कामे तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून उरकता येतील. माझ्या एका मित्राच्या मुलीचे स्थळ मी फेसबुकवर मेसेज मधून काहींना सुचविले आश्चर्य म्हणजे पुढल्या दोन महिन्यात तिचे लग्न ठरले. दरदिवशी माझ्या लिखाणाला जसे अनेक देखण्या तरुण मुली स्त्रिया लाईक करतात याचा अर्थ त्या मला लाईक करतात अजिबात नाही. मी म्हणजे शाहरुख खान नव्हे कि बायकांनी माझ्या प्रेमात पडावे. थोडक्यात अमुक एखाद्या तरुणीने स्त्रीने तुम्हाला लाईक शेरा मारणे म्हणजे ती तुमच्या प्रेमात पडली असे नसते….

फेसबुक फ्रेंड्स ला माझी विनंती आहे त्यांनी आपापल्या फेसबुक फ्रेंड्स शी जवळीक साधतांना मोठी सावधगिरी बाळगावी. माझ्या एका ओळखीच्या कुटुंबाची तरुण मुलगी फेसबुकच्या माध्यमातून एका मुलाच्या पडली आणि एक दिवस ती त्याच्याबरोबर पळून गेली, अलीकडे ती पाकिस्थानात सापडली. कुटुंबाने तिला कसेबसे भारतात आणले तेव्हा तिला मूल  झाले होते आणि तिचा अनेकांना वासना भागविण्यासाठी उपयोग करून घेतला होता. अमेरिकेतील भारतीयांच्या बाबतीत तर हे पाकिस्थानी टपून असतात, लग्न करतात मूल पैदा करतात आणि एक दिवस पाकिस्थानात पळून जातात, सावध असावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *