पवार ईडी आणि सिम्पथी : पत्रकार हेमंत जोशी

पवार ईडी आणि सिम्पथी : पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा केव्हा माझी चूक असते माझे चुकलेले असते तेव्हा मी समोरचा सामान्य गरीब घाबरट गांडू आंडूपांडु असला तरी त्याची माफी मागून मोकळा होतो किंवा पार गर्भगळीत झालेला असतो पण चूक नसेल तर समोर हत्तीचे बळ असलेला जरी उभा ठाकला तरी तसूभरही घाबरून जात नाही. त्या ईडीच्या चौकशीवरून मी हे तुम्हाला सांगतोय. कर नाही त्याला डर कशाला, कवडीचीही काळी कमाईकरून ठेवलेली नसेल तर ईडी असो कि बिडी किंवा तुमच्या आयुष्यात आलेली एखादी वेडी, घाबरून जाण्याचे काहीही कारण नसते. उद्या तुम्ही अमुक एखाद्या तरुणीला पोटुशी ठेवल्यानंतर जर घाबरणारे असाल तर मग अशी बेकायदेशीर कामें करायची तरी कशाला? या राज्यातले असे अनेक नेते अधिकारी मला अति जवळून ठाऊक आहेत कि त्यांनी अतिशय उथळ पद्धतीने व्यवहार करून ठेवलेले आहेत, मोदी हे कोणालाही न सोडणारे असल्याने आज ना उद्या त्या साऱ्यांना ईडी ला सामोरे नक्की जावे लागणार आहे… 


अमुक एखाद्या ठिकाणी भीती वाटणार नसेल तर त्या प्रसंगाचे भांडवल तरी का करायचे. समजा तुम्हाला हागवणीचा त्रास होत असेल तर त्याचे तुम्ही भांडवल करता का, मोठ्याने साऱ्यांना ओरडून सांगता का कि मला हागवणीचा त्रास होतो आहे, अजिबात नाही. गुपचूप डॉक्टरकडे जाऊन औषधे घेऊन मोकळे होता तद्वत सध्या चाललेल्या ईडी चौकशांचे, शरद पवार का आणि कशाला एवढे भांडवल करताहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर सिम्पथी तीही मतदारांकडून मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. पेरले तेच उगवते आहे. कालपर्यंत कटोरा हाती घेऊन दारोदार फिरणारे पवारांचे बहुतेक सवंगडी, अचानक अति नवश्रीमंत झाले असल्याने ईडीला त्यावर कुतूहल असणे गरजेचे होते, आवश्यक वाटले. माझ्याकडे जी माहिती आहे ती भयावह आहे, पवारांच्या प्रत्येक नवश्रीमंत झालेल्या सहकाऱ्यांना ईडीकडे नेमके सांगावेच लागणार आहे कि त्यांनी एवढी मालमत्ता संपत्ती कशी आणि कोठून जमा केलेली आहे. हो, अगदी सुप्रिया सुळे यांनाही नेमके उत्तर द्यावेच लागणार आहे. आजपर्यंत कोणत्याही परिणामांची चिंता काळजी फिकीर न करता जमा केलेल्या अफाट संपत्तीचे स्रोत सर्वांना सांगणे आवश्यक झाले आहे…


www.vikrantjoshi.com


सर्वसामान्य मतदारांना तर हिंदी सिनेमात जसे घडते आणि बघतांना आनंद होतो तो तसा आनंद व्हायला हवा कि कालपर्यंत आपल्या गावातले पवारांचे किंवा काँग्रेसचे अमुक एखादे नेते साध्या सायकल किंवा मोटारसायकलवर फिरायचे आणि अचानक पैसे आल्याने ते माजले पण मोदींच्या या राज्यात त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागणे, यापेक्षा अधिक आनंद काय असू शकतो. ज्यांनी हे राज्य लुटले आज त्यांच्यामागे चौकशी फेरे लागले म्हणून त्यांना सिम्पथी आणि मतदान करून मोकळे व्हायचे म्हणजे हे राज्य लुटण्यासाठी पुन्हा त्यांच्या हाती सोपवायची, थोडक्यात ज्याने आपल्या आई बहिणींवर अत्याचार केले त्याच्याकडे रात्रीच्यावेळी पुन्हा आयाबहिणींना आपण पाठविण्यासारखी हि घोडचूक आहे. चोरांच्या हाती किल्ल्या देण्याचा तो प्रकार ठरावा. मतदारांनो, तुमचे हे असे वागणे असेल तर ते तद्दन चूक आहे असे मी ठामपणे येथे तुम्हाला सांगतो आहे. नेता किंवा अधिकारी मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा असो विचारांचा असो ज्याने म्हणून हे राज्य ओरबाडून खाल्ले त्याला अजिबात माफी नसावी, कोणतीही दयामाया त्यांना न दाखवण्याची आपली मानसिकता असावी, ज्यांनी ज्यांनी लुटले त्यांना योग्य धडा मिळायलाच हवा, शिक्षा झालीच पाहिजे…

माझ्या मित्राचे त्याच्या बायकोसंगे यासाठी भांडण होते कि ती म्हणायची तू लेडीजबार मध्ये जाऊ नको तर तो सांगायचा कि तेथे जाऊन तो पैसे उधळत नाही त्याचे मित्र त्याचा तेथे होणाऱ्या खाण्यापिण्याचा खर्च करतात. चूक मित्राची होती, ताडाच्या झाडाखाली बसलेल्याने म्हणायचे कि मी दारू पित नाही तसे त्याचे सांगणे होते. पवार कींवा अन्य ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे त्यांना माझे नेमके हेच सांगणे आहे कि या या राज्यात हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, पृथ्वीराज चव्हाण, आर आर पाटलांच्या आमदार पत्नी किंवा मुले असे कितीतरी असतांना, ईडीने नेमके तुम्हाला घेरलेले आहे कारण ईडीला नक्की हे ठाऊक आहे कि असे सारे ताडाच्या झाडाखाली केवळ बसलेले नसून त्यांनी मद्य देखील प्राशन केलेले आहे. एक साऱ्यांनी यापुढे ध्यानात ठेवावे कि तिकडे देशात नरेंद्र आणि इकडे राज्यात देवेंद्र या दोघांना ज्या मतदारांनी सत्तेत आणून बसविलेले आहे, पुनःपुन्हा आणून बसवणार आहेत, या नरेंद्र किंवा देवेंद्र यांच्या यापुढे नजरेतून वाईट माणसे सुटणे अशक्य असे काम आहे, जवाब देणे गरजेचे ठरणार आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *