सूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी


सूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी 

विधान सभा निवडणुकी आधी महिनाभर मी जे मिशन राबविले ते यशस्वी झाले एव्हाना तुमच्या ते लक्षात आले असेल म्हणजे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होताहेत  हे जवळपास नक्की झाले आहे, औपचारिकता तेवढी बाकी आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे मी लिहिले त्यातले काहीही एकही चुकीचे नव्हते पण जे युतीचे चुकीचे होते जे त्यांच्या हातून चुकीचे घडले ते मात्र लिहायचे टाळले हेही नक्की आहे पण यापुढे पाच वर्षे युतीचे देखील जे चुकीचे तेही नक्की लिहिणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे मागच्यावेळी नेमके कोणाचे चुकले म्हणजे फडणवीसांचे दुर्लक्ष झाले कि चंद्रकांत पाटलांना खाते सांभाळता आले नाही कि शिवसेनेने पैसे खाल्ले नेमके सांगणे कठीण आहे पण अभ्यास करून नक्की सांगणार आहे कि मुंबईतल्या, राज्यातल्या सर्वच्या सर्व रस्त्यांची नेमकी दुर्दशा कोणी केली, यापुढे असे घडता कामा नये, भलेही एखाद्या ठिकाणचा विकास कमी झाला तरी चालेल पण रस्त्यांची युतीच्या काळात होणारी होणारी दुर्दशा लाजिरवाणी आहे. अर्थात अशा कितीतरी युतीच्या ज्या चुका आहेत त्यावर मी निश्चित लिहिणार आहे, सोडणार नाही…

आपण आज एक करूया आरशात स्वतःकडे बघून एक प्रश्न मनाला विचारूया कि आजवर ज्या चुका जी पापे आपल्या हातून घडलेली आहेत त्याची परतफेड परमेश्वराने येथेच आपल्या कडून करवून घेतलेली आहे किंवा नाही, उत्तर नक्की हो असेच येणार आहे. येथेच सारे फेडून वर जायचे आहे. मनुष्य स्वभाव आहे चुका हातून होतात पण केलेली चूक जर पुन्हा पुन्हा होणार असेल तर माफी नसते, चुकांची परतफेड देखील करायला तयार राहावे लागते. शरद पवार यांनी अख्खी हयात सुडाचे बदला घेण्याच्या राजकारणात घालविली, आयुष्याच्या संध्याकाळी काय घडते आहे घडले आहे कि या बलाढ्य सामर्थ्यवान ताकदवान श्रीमंत नेत्यालाही मग देवाने सोडले नाही, पार पडलेल्या निवडणुकीत मतांच्या लाचारीत त्यांची धडपड, येथेच सारे फेडून वर जायचे असते, दाखवून देत होती, दाखवून देत राहील. पण तहहयात जे शरदरावांनी केले म्हणजे याला संपवा त्याला संपवा हे जे त्यांनी सतत केले ते मात्र यापुढे फडणवीसांनी किंवा अन्य विरोधकांनी करु नये, सुडाचे राजकारण काही काळ असुरी आनंद मिळवून देते पण सदासर्वकाळ चांगलेपण जे असते तेच टिकते…

ज्यांनी ज्यांनी म्हणून पवारांना विरोध केला मग तो घरातला अजित पवार असेल किंवा जिवलग मित्र गोविंदराव आदिक असेल किंवा अडचणीत धावून आलेला गुरुनाथ कुलकर्णी असेल किंवा सतत पडत्या काळात साथ देणारा छगन भुजबळ असेल पण आपल्यापेक्षा थोडाजरी वरचढ झाला आहे होती आहे हे पवारांच्या लक्षात आले रे आले कि नसतांनाही त्या त्या माणसाची साडेसाती सुरु होऊन शरद पवार नावाचा शनी त्यांच्या मागे लागत असे, राजकारणातले किंवा अन्य प्रत्येक क्षेत्रातले सारे पवारांच्या या वृत्तीला, त्यांच्या माणसांच्या दरोडेखोर प्रवृत्तीला मनापासून सारे कंटाळले होते, जे सामान्य होते त्यांना त्यातले फारसे माहित नसायचे, आमच्यासारखे जे अगदी जवळून बघायचे पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांची लुटपाट व सुडाचे राजकारण अंगावर शहारे आणायचे. त्या सज्जन पृथ्वीराज चव्हाण यांना बोलते करा, ऐकून किस्से तुमची मती काम करेनाशी होईल, इतके सारे प्रकार गंभीर आहेत. पण फडणवीसांनी मात्र पवार होऊ नये, कोणीही पवार आणि त्यांच्या बदमाश साथीदारांसारखे अजिबात वागू नये म्हणजे सुडाने पेटून उठू नये आणि खा खा खाऊ नये, अन्यथा उद्या तुमचाही शरद पवार नक्की होईल, येथेच फेडून वर जावे लागेल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *