ठाकरी डंख छाटले पंख : पत्रकार हेमंत जोशी

ठाकरी डंख छाटले पंख : पत्रकार हेमंत जोशी

एक दोन तीन पाच दहा कितीही वर्षांपूर्वीचे माझे लिखाण आपण पुन्हा एकवार वाचून काढा त्यातले संदर्भ खोटे व चुकीचे निघाले असे दिसून येणार नाही कारण प्रत्येक शब्द पुराव्यांनिशी सुपार्या न घेता खराखुरा मला लिहायचा असतो, एखादे वाक्य चुकीचे माझ्याकडून लिहिल्या जाऊ शकते पण लिहिलेला अख्खा लेख चुकीचा खोटारडा सुपारीबाज असे ना कधी घडले ना कधी घडेल. बघा, याआधीच मी एकदा नव्हे तर चक्क दोनदा लिहून ठेवले आहे कि उद्धव ठाकरे यांना कोणीही अगदी देवेंद्र फडणवीस व शरद पवार अशा राज्याच्या टॉपमोस्ट नेत्यांनीही अंडरएस्टीमेट करू नये त्यांना अजिबात कमी लेखू नये कारण उद्धव यांना मी जेवढा अचूक ओळखतो मला नाही वाटत त्यांना त्यापद्धतीने कोणी विशेषतः बाहेरचे म्हणजे त्यांचे कुटुंब सदस्य सोडून कोणी एवढे आतबाहेर अचूक ओळखत असेल हे असे जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्माण करण्यात आले होते किंवा त्यांच्या पक्षातले पण हेच सांगत सुटायचे कि फडणवीसांना काय कळते आपण नाचवू तसे ते नाचतील अगदी नागीन डान्स पण करून दाखवतील केवळ मी एकमेव असा होतो कि अगदी जाहीर तेही लेखी सांगून मोकळा होत असे कि फडणवीसांना अजिबात कमी लेखू नका त्यांनाही मी अगदी त्यांच्या लहान वयापासून ओळखतो पण सुरुवातीच्या वर्षभरात अनेकांनी अगदी त्यांच्या नागपुरातल्या सुद्धा काही अति शहाण्या पत्रकार मित्रांनी अंडर एस्टीमेट केले पुढे मात्र मी जे लिहीत होतो हुबेहूब तेच घडले फडणवीस 

थेट शरद पवार उद्धव ठाकरे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन विलासराव देशमुख इत्यादी येथल्या आजवरच्या तद्दन टॉप मोस्ट जिवंत दिवंगत नेत्यांच्या रांगेत येऊन बसले आणि हे माझ्यानंतर जेव्हा फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या त्यावेळी लक्षात आले त्यांनी त्यानंतर आजतागायत फडणवीसांना एवढा मानसिक त्रास दिला जेवढा त्रास त्यांनी इतर सार्या विरोधकांना एकत्रित दिलेला नसेल तरीही पवारांच्या अगदी नाकावर टिचून फडणवीस ताठ मानेने जीवाची पर्वा चिंता काळजी न करता आजही लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वांच्या म्हणजे शरद पवारांच्याही खूप पुढे आहेत कारण त्यांना जे काय करायचे असते ते सारे फक्त आणि फक्त जनतेसाठी लोकांच्या भल्यासाठीच करायचे असते. तुम्हाला म्हणून सांगतो जेव्हा केव्हा जीवाची पर्वा न करता या अतिशय कठीण दिवसात गावोगाव देवेन्द्रजी फिरतात असे कितीतरी कुटुंब सदस्य जे प्रसंगी विरोधी विचारांचे असून देखील फडणवीसांच्या  या सेवा व कार्यावर अक्षरश: अश्रूंना वाट मोकळी करून देताहेत….


www.vikrantjoshi.com

अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हा सर्वांना अगदी जाहीर सांगतो उद्धव ठाकरे यांना देखील अनेक मूर्ख नेत्यांनो आणि भानगडी करणाऱ्या काही नालायक मंत्र्यांनो राज्यमंत्र्यांनो अधिकाऱ्यांनो त्यांना अंडरएस्टिमेट करू नका उद्धव यांना काय कळते, समजू नका त्यांना बावळट समजून आपले वर्तन त्यांच्यासमोर आणि त्यांच्या माघारी अतिहुशारीचे ठेऊ नका कारण जेव्हा केव्हा उद्धव यांची सटकते समोरचा कितीही ताकदवान असेल ते त्याला चारी मुंड्या चीत व चिट करून मोकळे होतात आपण केव्हा व कसे उल्लू बनलो मग संपलेल्या भल्याभल्या नेत्यांचाही लक्षात येत नाही. ज्यांना ज्यांना उद्धव यांनी आपल्यापासून दूर केले ते आज कुठे आहेत बारकाईने त्यावर अभ्यास करा इतिहास आठवा तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. माणूस आहे तसा किरकोळ नाजूक प्रकृतीचा वडील आणि आजोबांसारखा पण पराक्रमाच्या बाबतीत त्यांच्याच हुबेहूब पावलावर पाऊल ठेऊन,या महिन्याभरात उद्धव यांनी काय हो केले तुमच्या ते लक्षात तरी आले का? अहो, त्यांनी त्यांच्या मूळ घातक डेंजरस स्वभावाला वाट मोकळी करून दिली आणि क्षणार्धात त्यांनी शरद पवार अजित पवार अनिल देशमुख इत्यादी अनेकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आर्थिक व्यवहारातून केलेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्या त्यांनी एका फटक्यात आधी रद्द केल्या नंतर मनासारख्या त्याच बदल्या केवळ तीन दिवसात पुन्हा केल्या त्यानंतर हे असे अजिबात चालणार नाही हा थेट निरोप अजित पवारांना देऊन राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या  त्या पाचही नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत परत आणले तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे अलीकडे शिवसेनेचे मंत्री राज्यमंत्री व आमदार उद्धव यांना भेटून म्हणाले कि काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री राज्यमंत्री आमच्या कामांकडे साफ दुर्लक्ष करून मोकळे होतात. आज त्या मंत्र्यांना जरा विचारा कि त्यांची हे असे करण्याची यापुढे हिम्मत असेल का आहे का, मी सांगतो ते म्हणतील हेच सांगतील, आता आमच्यात ती हिम्मत उरलेली नाही. अर्थात हा गंभीर विषय येथेच संपत नाही असे कितीतरी गुपिते नजीकच्या काळात मी तुम्हाला सांगून मोकळा होईल. तूर्त एवढेच लक्षात घ्यावे ज्यांना उद्धव किरकोळ बोका वाटले प्रत्यक्षात ते वाघोबा आहेत म्हणजे ते सिमला मिरची नव्हेत तर ढुंगणाला आग आग आणणारी घाटावरची तिखट मिरची आहेत. आणि तसेही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे कॉम्बिनेशन शंभर टक्के टिकणारे नाही आता प्रश्न एवढाच शिल्लक आहे कि भाजपाची युती नेमकी राष्ट्रवादीशी होणार आहे कि सेनेशी, त्यावर देखील नेमके नक्की लिहून मी मोकळा होईल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *