मुक्काम पोस्ट नागपूर ३ : पत्रकार हेमंत जोशी

मुक्काम पोस्ट नागपूर ३ : पत्रकार हेमंत जोशी 

आधी थोडेसे हटके तुमच्यासाठी मग राज्यातल्या राजकारणाकडे, 

वर्गात सर्व प्रश्नांची उत्तरे खड्या स्पष्ट आवाजात देणारा पण वार्षिक परीक्षेत सतत नापास होणारा विद्यार्थी म्हणजे राज ठाकरे  वर्गात लघवी केल्यामुळे शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, अजित पवार…

शाळा सोडतो आहे अशी सतत धमकी देणारा पण शाळेला नियमित चिटकून बसणारा विद्यार्थी म्हणजे उद्धव ठाकरे, 

वर्गात सतत बसण्याची जागा बदलवून घेणारा विद्यार्थी अर्थात नारायण राणे, 

गुरुजींनी काही विचारण्या आधीच पटकन हात वर करून चुकीची उत्तरे देणारा विद्यार्थी म्हणजे संजय राऊत आणि 

वर्गातला विनोदी विद्यार्थी म्हणजे रामदास आठवले…

गुरुजींनी कितीही गदागदा हलवून विचारले तरी कोणत्याही प्रश्नाला उत्तरे न देणारा पण गुरुजींचे लक्ष नसतांना बाजूच्याला हळूच चिमटे काढणारा विद्यार्थी म्हणजे सुभाष देसाई आणि 

शाळेतले शायनिंग मारत फिरणारे, कट्टयावर बसून उगाचच चकाट्या पिटणारे विद्यार्थी म्हणजे प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक..

शाळेच्या अध्यक्षांचा म्हणजे अभ्यासात ढ असूनही वशिल्याने वरच्या वर्गात प्रसंगी परीक्षा न देताही वर चढणारा विद्यार्थी म्हणजे राहुल गांधी,

आणि वर्गात स्वतःच्याच बहिणीची छेड काढणारा विद्यार्थी म्हणजे धनंजय मुंडे, 

अभ्यासात कायम कच्चा असणारा पण श्रीमंत बापाचा नवे नवे विचित्र कपडे घालून येणारा विद्यार्थी म्हणजे रामदास कदम…

मुलींमध्ये हुशार तेवढी मीच असे भासवणारी पण फारसे काही येत नसतांनांहि वेळ मारून नेणारी, स्वतःला सैराट ची हिरोईन समजणारी विद्यार्थिनी म्हणजे सुप्रिया सुळे आणि 

शिळ वाजवून गाणे गुणगुणणाऱ्या टाईमपास विद्यार्थिनी म्हणजे यशोमती ठाकूर, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे,

आणि कधी कधी त्यांच्या संगे येऊन बसणारी माधुरी मिसाळही. 

मी म्हणजे साधा भोळा शिधा साधा असे भासवून हळूच गुपचूप लाईन मारणारा विद्यार्थी म्हणजे चंद्रकांत पाटील आणि 

स्वतःला डिट्टो रफी समजणारा विद्यार्थी म्हणजे सुजित मिणचेकर, 

लहानपणीच वर्गातल्या मुलींच्या प्रेमात पडणारा त्यांना बोरे चिंचा देऊन पटवणारा श्रीमंत घरातला विद्यार्थी म्हणजे उदय सामंत आणिवर्गात लावालाव्या लावून दूर उभे राहून गम्मत बघणारा विद्यार्थी म्हणजे मिलिंद नार्वेकर,

तसेच वर्गात मास्तरांकडून सतत शिक्षा दिली जात असणारा विद्यार्थी म्हणजे छगन भुजबळ…

वर्गात काळी टोपी घालून येणारा, कोणत्याही प्रश्नाचे साधे उत्तर देखील भाषणाच्या आवेशात देणारा विद्यार्थी देवेंद्र फडणवीस आणि घरी देवेंद्रचे नाव सांगून खाऊसाठी पैसे मागणारा पण देवेंद्रला कळूही न देता शाळेबाहेरच्या बुढीके बाल वर एकटाच 

ताव मारणारा विद्यार्थी म्हणजे परिणय फुके 

आणि देवेंद्र तसेच नितीन या वर्गमित्रांची हुबेहूब नक्कल करून इतरांची वाहवा मिळविणारा विद्यार्थी म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. 

वर्गातल्या मुलांचे कंपास पेन पेन्सिल वह्या पुस्तके चोरून ते आपल्या नातेवाईकांना वाटणारा विद्यार्थी म्हणजे अशोक चव्हाण, वर्गातल्या सर्वांचा आदर करणारे विद्यार्थी म्हणजे उल्हास पवार आणि गिरीश गांधी आणि शाळेचा आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार 

पटकाविणारा विद्यार्थी म्हणजे गणपतराव देशमुख…

राज ठाकरेला कशाला मॉनिटर केले म्हणून कायम मास्तरांच्या पाठी भूण भूण लावणारा विद्यार्थी अबू आझमी 

आणि गुरुजींचे लक्ष नसतांना डबा खाणारा तो नितीन गडकरी. 

झाकपाक कपडे घालून येणारा, शाळेला दांड्या मारूनही मराठी शिकवणाऱ्या देखण्या देशपांडे बाईंचा लाडका विद्यार्थी म्हणजे भाई जगताप 

आणि लहानपणीच चष्मा लागलेला, वर्गातल्या लेले सरांच्या मुलीवर गुपचूप लाईन मारणारा विद्यार्थी उदय निरगुडकर 

आणि डब्यात चमचमीत पदार्थ आणून मुद्दाम इतरांसमोर एकटाच फस्त करणारा इतरांचे हसणे संपले तरी आपले हसू न आवरू 

शकणारा विद्यार्थी म्हणजे जयराज साळगावकर… 

वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी पण मॅडमच्या दबावाखाली चेहऱ्यावरची माशीही हलू न देणारा विद्यार्थी म्हणजे मनमोहन सिंग आणि डब्यात दररोज पुरणाच्या पोळ्या घेऊन येणारा विद्यार्थी गिरीश बापट, 

शाळा बंक करून जवळच लागलेल्या फडात बसून शिट्या वाजविणारे विद्यार्थी म्हणजे दिलीप सोपल, बबन लोणीकर  

आणि रामकृष्ण बोर्डीकर, 

कायम सुंदर सुंदर मुलींच्या घोळक्यात तो सुशीलकुमार शिंदे, 

सरतेशेवटी वर्गातल्या विद्यार्थ्यांमध्ये भांडणे लावून, स्वतः मात्र गालातल्या गालात हसत बसणारा, कसे कडाकडा भांडताहेत, गम्मत बघणारा विद्यार्थी म्हणजे फक्त आणि फक्त शरद पवार…

वाचकांनो, आपणही सुचवावे.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *