लैंगिक विकृती व समस्या : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक विकृती व समस्या : पत्रकार हेमंत जोशी 

भारतीयांना सिनेमा सेक्स आणि राजकारणावर अगदी मनापासून ऐकायला बघायला वाचायला बोलायला आवडते. सेक्स सिनेमा आणि राजकारण हे विषय निघाले रे निघाले कि तो बालक असो वा पालक स्त्री असो अथवा पुरुष, सर्वांचे कान टवकारतात आणि डोळे वटारतात. तिन्ही विषय सर्वांना सदासर्वकाळ मनापासून चघळायला आवडतात. याठिकाणी मला तुमच्या अति आवडत्या विषयावर म्हणजे लैंगिक समस्या चाळे आवड विकृती इत्यादींवर काही सांगायचे आहे. मराठवाड्यातल्या नांदेड सारख्या दुर्गम भागातून “उद्याचा मराठवाडा” नावाने पत्रकार राम शेवंडीकर दरवर्षी संग्राह्य असा अप्रतिम दिवाळी अंक काढतात. यावेळचा मराठवाडा हा काम जीवनाला लैंगिक समस्यांना वाहून घेतलेला आहे त्यातले काही संदर्भ आणि माझे या विषयावर असलेले तोकडे ज्ञान हि सरमिसळ करून तुम्हाला वेगळे काहीतरी येथे सांगायचे आहे. लैंगिक  समस्या नाही किंवा लैंगिक विकृती नाही असे आपल्याकडे घडत नाही, प्रत्येकाला एकतर सेक्स विषयी आकर्षण आहे किंवा विकृती आहे किंवा अज्ञान आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष सतत लैंगिक गोंधळात सापडलेले असतात भलेही काही मान्य करतील किंवा काही कदाचित मान्यही करणार नाहीत…

लैंगिक समस्येवर येथे माझे होणारे लिखाण फार तोकडे पडणारे आहे पण व्यापक माहितीसाठी जर शक्य झाले तर उद्याचा मराठवाडा हा दिवाळी अंक मिळवा आणि अख्खा वाचून पाठ करा, त्यानंतर मला नाही वाटत लैंगिक ज्ञानावर तुमचा हात पकडणारे कोणी सापडेल, त्यानंतर तुम्ही जमले तर लैंगिक विकृती आणि समस्या या विषयावर गावोगावी प्रवचन करा आणि स्त्री तसेच पुरुषांना ज्ञान देऊन पाजून मोकळे व्हा, राजन भोसले व्हा, तद्न्य म्हणून त्यावर काम करा. मी तुमचा जाहीर सत्कार घडवून आणेल. सर्वात आधी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला हे समजावून सांगा कि दोघांनाही जर लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी एकत्र येण्यापूर्वी आपण आत बाहेर म्हणजे कपडे आणि शरीरातील प्रत्येक अवयवांसहित अतिशय क्लीन स्वच्छ आहोत किंवा नाही हे आधी बघितले पाहिजे तद्नंतरच एकमेकांशेजारी पहुडले पाहिजे, स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी एक जरी अस्वच्छ असेल त्यांच्या कपड्यांना किंवा शरीराला घाणेरडा वास येत असेल तर त्या दोघांमध्ये एकजण कायमस्वरूपी शारीरिक अत्याचार सहन करतात असे नक्की समजावे….

अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्याचा मराठवाडा हा संपूर्ण अंक लैंगिक समस्या विषयाला वाहून घेतला असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण पान जाहिरात देऊन एकप्रकारे या आवडत्या विषयास जणू उचलून धरले आहे असे वाटते. राम शेवंडीकर यांना आणखीही अशा काही नेत्यांकडून किंवा मंत्र्यांकडून नक्की जाहिराती मिळाल्या असत्या जशी त्यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून देखील जाहिरात मिळालेली आहे. लैंगिक विकृतीवर मास्टरी असलेल्या पुढाऱ्यांना वास्तविक राम शेवंडीकर यांनी गाठले असते तर जाहिराती देउन त्या पुढाऱ्यांनी उद्याचामराठवाडा या दिवाळी अंकाला डोक्यावर घेतले असते. दोन पुरुषांमधले शारीरिक संबंध, दोन स्त्रियांमधले शारीरिक संबंध आणि असे स्त्री पुरुष कि ज्यांना दोन्हीकडे शारीरिक संबंध ठेवायला आवडतात, लैंगिक विकृती वाढीस लागल्यानंतर स्त्री पुरुष असे पारंपारिक संबंध सोडून काही नको त्या विकृतीकडे वळतात आणि आयुष्याचे वाटोळे करून घेतात, सखोल ज्ञान शास्रोक्त पद्धतीने घेणे मिळविणे हा वास्तविक त्यावर उत्तम उपाय पण त्याकडे फारसे भारतात लक्ष दिले जात नाही, त्यातूनच घरोघरी मोठ्या प्रमाणावर लैंगिक विकृती फोफावलेली दिसते. असे घडता काम नये, नेमके ज्ञान तरुण होणाऱ्या पिढीला मिळायलाच पाहिजे जणू त्यांचा तो अधिकार आहे…

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *