कोण कसे : भाग ५: पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : भाग ५: पत्रकार हेमंत जोशी  

आम्ही २४ तास माहितीच्या मागे राबणारे पत्रकार आहोत, मी आणि विक्रांत म्हणजे पोलिसांचा जणू फोन नंबर १००, पोलिसांच्या या १०० नंबरवर कशी २४ तास माहिती येण्याचे काम सुरु असते तेच आमच्याहीबाबतीत, यांची पत्रकारिता तोडपाण्याची नाही आणि यांना माहिती पुरविली, यांचा जीव घेतला तरी हे माहिती पुरविणाऱ्यांची नावे उघड करणार नाहीत हे वाचकांनी ओळखले असल्याने आमचा १०० नंबर झाला आहे, सतत २४ तास ज्याला जसे जेव्हा जमेल तेव्हा ते कधी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून माहिती देत असतात त्यामुळे जेव्हा मला मराठ्यांचे मोर्चे सुरु असतांना भाजपाच्या एका पॉवरफुल नेत्याने सांगितले कि शक्यतो भय्यू महाराजांवर टीका करणे टाळले तर बरे होईल कारण ज्या भय्यू महाराजांमुळेच हे मोर्चे सुरु झाले आहेत ते मोर्चे यापुढे आटोक्यात आणण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे, भय्यू महाराजांच्या गोटातून कदाचित हि लोणकढी थाप मारल्यागेली असल्याने, हे ऐकून मी अवाक झालो, म्हणालो, असे अजिबात नाही, भय्यू महाराजांची कोणतीही आदर्शवत छबी मराठा मोर्चे काढण्यात पुढाकार घेणाऱ्यांवर नाही, आणि तुमच्या ते पुढल्या चार दोन दिवसात अगदी सहज लक्षात येईल, हा प्रकार जेव्हा मी त्यातल्या काही नेत्यांच्या कानावर घातला, घडले असे पुढल्या काही दिवसात, मोर्चेकरांनी विविध लेखांमधून, विविध माध्यमातून महाराजांची आयमाय घेतली, महाराजांच्या गोटातून पसरविलेल्या या बातम्यांचे पितळ उघडे पडले, महाराजांची लोकप्रियता मराठा समाजाच्या बाबतीत किती आणि कशी कमकुवत, बरे झाले भाजपा नेत्यांना ते कळले….

तेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याही बाबतीत, मी म्हणजे शेतकऱ्यांचा या राज्यातला अतिशय प्रभावी नेता, राज्यातले शेतकरी माझ्यामागे आहेत, हि ती वातावरण निर्मिती करून भलेही सदाभाऊ यांनी पदरात कृषीराज्यमंत्रीपद पदरात पडून घेतले असेल पण एखादा या राज्यातला शेतकऱ्यांचा किरकोळ गट सोडला तर फारसे मोठे नेतृत्व त्यांना लाभलेले नाही अन्यथा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यानंतर या राज्यातल्या जनतेने, शेतकऱ्यांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले असते, जागोजाग विजयी मेळावे त्यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या गेले असते, पण असे अजिबात घडलेले नाही याउलट ज्या इस्लामपुरात सदाभाऊ लहानाचे मोठे झाले त्या इस्लामपुरातून जेव्हा खोत यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा कर्जमाफी विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, जेमतेम शेतकरीही त्या रॅलीसाठी जमा झाले नाही, फ्लॉप शो असेच त्या रॅलीचे वर्णन वृत्तपत्रातून गाजले, वास्तविक सदाभाऊ यांची भाषणे मुलुख मैदान गाजविणारी, पण २५ जून रोजी काढण्यात आलेल्या या रॅलीत ना मोटारसायकली होत्या ना शेतकरी, अवघ्या काही मिनिटात भाषणे आवरते घेऊन सदाभाऊंच्या खुशमस्कऱ्यांना काढता पाय तेथून घ्यावा लागला. सदाभाऊंच्या बाबतीत फारतर असे वर्णन करता येईल कि सदाभाऊ म्हणजे ताटातले लोणचे, फारतर चवीपुरते बरे वाटते, लोणचे म्हणजे मुख्य जेवण नव्हे…

वास्तविक खोतांनी हि कर्जमाफी घडवून आणली म्हणून मुंबई ते सांगली विजयी रॅली काढण्याचे खोतांच्या मनात होते पण जेथे घरच्या अंगणात शेतकरी आले नाहीत, तेथे घराबाहेर हो शेतकरी कसे जमतील, आमचे शेतकरी गरीब असतील पण खुळे नक्कीच नाहीत त्यामुळेच तर आजही सत्ताकेंद्रे खेड्यांकडे असतात, असे फारसे घडत नाही कि केवळ शहरांशी नाळ जुळलेले मंत्री किंवा मुख्यमंत्री या राज्यातून आजतागायत निवडल्या गेले, शेतकरी कमी बोलतात पण त्यांना सबकुछ दिखता है, कर्जमाफीची हे क्रेडिट फारतर मुख्यमंत्र्याला, सदाभाऊंना अजिबात नाही, त्यामुळे त्यांच्या गावातली रॅली, विजयी मेळावा देखील फ्लॉप ठरला, त्या मेळाव्याला जेमतेम दीडशे तेही कार्यकर्ते, शेतकरी नव्हेत, उपस्थित होते….

जाऊ द्या हे खोटे जग आमच्या लिखाणातून वाचून बघून तुमचे डोके काम करत नसेल म्हणून एक अतिशय अश्लील जोक सांगतो आणि हे लिखाण आटोपते घेतो, जोक असा,

 गोट्या एका घराच्या खाली उभा राहून मुतत असतो. 

वरून एक बाई ओरडते, भिंत आहे दिसत नाही..? 

गोट्या थोडा मागे सरकतो आणि विचारतो, 

आता तरी…..? 

सदाभाऊ खोत यांच्या विषयी पुढल्या अंकातही…

तूर्त एवढेच..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *