निखिल वागळे २ : पत्रकार हेमंत जोशी

निखिल वागळे २ : पत्रकार हेमंत जोशी 

गर्व मत्सर अरेरावी दादागिरी उद्धटपणा मीच तेवढा मोठा इतरांना कायम घालून पाडून बोलण्याची वृत्ती कूपमंडूक वृत्ती हे दोष आभाळाला टेकल्या नंतर देखील ज्यांच्या शरीरात वास करीत नाहीत त्यांचे मोठेपण श्रेष्ठत्व टिकून राहते किंवा अशांच्या आयुष्यात चढउतार आले तरी त्यांचे महत्व त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही. पण अशी माणसे घरी किंवा सभोवताली फार अभावाने आढळतात, अरेरावी दादागिरी आणि इतरांना अपमानित करून स्वतःला ग्रेट समजणारे, अशांचे मोठेपण फार काळ नक्की टिकत नाही, अशा मंडळींचा केवळ वक्त चांगला असू शकतो…


डॉ. भालचंद्र उर्फ संदीप जिचकार हे आधार योजनेत कार्यरत असलेले एक शासकीय अधिकारी आहेत. त्यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो, ते अपेक्षाविरहित मनाने इतरांसाठी धावून जाणारे सेवाभावी वृत्तीचे अधिकारी आहेत. सहसा ते इतरांच्या वाट्याला जात नाहीत पण त्यांची एखाद्याने विनाकारण मुद्दाम छेड काढली तर ते समोरचा मग तो कोणीही असो, पुरून उरतात. आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे आता शासनाने सक्तीचे केले आहे त्यातून हे कार्ड मिळविताना अनेकदा काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते पण हेच ते डॉ जिचकार समोरच्या मंडळींकडून चहाच्या कंपनी देखील अपेक्षा न ठेवता भेटणाऱ्यांना अगदी मनापासून कायदा न मोडता सहकार्य करतात…


www.vikrantjoshi.com


एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. अलीकडे न्यायालयाने पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध थेट पकड वॉरंट काढलेले आहे, तशा आशयाचे पत्र न्यायाधीशांनी माहीम पोलीस स्टेशन ला धाडलेले आहे. माहीम पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर राहणारे निखिल वागळे, इतरांच्या बाबतीत नको तेवढा उत्साह दाखविणाऱ्या माहीम पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अद्याप निखिल वागळे यांना अटक न केल्याने ते न्यायालयाचा अवमान करताहेत कि काय असे आता वाटायला लागले आहे. बघूया, डॉ. जिचकार यांना न्याय मिळतो कि वागळे यांच्या दबावाला माहीम पोलीस स्टेशन बळी पडते..


आता पुढे जाऊन सांगतो कि भावनेच्या भरात किंवा सत्तेच्या मस्तीत एखादी चूक धाडसी पत्रकारांकडून नकळत होते, मला वाटते २०११ दरम्यान निखिल वागळे यांच्याकडून ते घडले असावे त्यांनी आयबीएन लोकमत मध्ये असतांना डॉ. जिचकार यांच्यावर म्हणजे त्यावेळेचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री अनिल देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या जिचकारांवर पाच लाख रुपये लाच मागितल्याचे आरोप थेट आयबीएन लोकमत वाहिनीवरून केले होते ज्यामुळे डॉ. जिचकारांची मोठी बदनामी झाली आणि त्यांनी निखिल वागळे यांच्यावर अब्रू नुकसानच दावा न ठोकता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर हे प्रकरण आजतागायत न्यायप्रविष्ठ असले तरी एकही तारखेवर जाण्याची तसदी दुसऱ्यांना कायम ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या निखिल वागळे यांनी घेतली नाही त्यातून हे घडले म्हणजे माननीय न्यायाधीशांनी आता वागळे यांच्या विरोधात थेट अटक वॉरंट काढलेले आहे…


मी सहजासहजी आईची शपथ घेत नाही, येथे आईची शपथ घेऊन सांगतो मला जेव्हा निखिल यांचा उद्दामपणा त्यातून निघालेले अटक वॉरंट यासंदर्भात कागद पत्रे हाती पडलीत मी लगेच डॉ. जिचकार यांना फोन लावून विनंती केली कि त्यांनी हा वागळे यांच्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी गुन्हा मागे घ्यावा पण त्यांनी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. महत्वाचे म्हणजे आजतागायत एकदाही कधी त्या वागळे यांचे थोबाड मी बघितलेले नाही पण इतर बहुसंख्य भामट्या दिग्गज पत्रकारांच्या तुलनेत नक्की वागळे वेगळे आहेत, पैशांपेक्षा त्यांनी नेहमी देशाचे या राज्याचे भले साधण्यासाठी महत्व दिलेले आहे, अनेकांशी वैर घेतले आहे, अनेक प्रकरणांना वाचा फोडली आहे, निखिल वागळेंचे आयुष्य असेच मस्तीत जगण्या असावे असे मला कायम वाटत आलेले आहे म्हणून डॉ संदीप जिचकार यांना फोन केला, बघूया पुढे काय घडते ते…


आता अत्यंत महत्वाचे असे कि उद्या जर माझ्यावर अशाप्रकारे संकट आले तर निखिल वागळे धावून येतील, असे वाटत नाही पण आपण आपले कर्तव्य केले पाहिजे असे वाटले म्हणून फोन करण्याचा आगाऊपणा केला. वास्तविक माझ्या जवळच्या मित्राचा २०११ मध्ये झालेला तो जाहीर अपमान होता, या अपमानाने व्यथित होऊन त्याचवेळी डॉ. जिचकार यांनी तदनंतर मंत्री आस्थापनेवर काम न करण्याचे ठरविले आणि ते तेव्हापासूनच थेट केंद्र सरकारच्या सेवेत निघून गेले. एकीकडे शासकीय अधिकारी असलेल्या या मित्राची झालेली बदनामी तरीही मनापासून वाटते निखिल वागळे हे त्यांच्या श्वासाच्या अखेरपर्यंत ताठ मानेने जगायला हवेत अर्थात हे असले प्रकार वागळे यांच्याबाबतीत नवीन नाहीत, प्रसंगी अतिशय जवळच्या मित्रांची केलेल्या फसवणुकीतून देखील त्यांना काही वेळा असेच माहीम पोलीस स्टेशन मध्ये जावे लागलेले आहे…


मोठी माणसे अशी का वागतात म्हणजे सामान्य जनतेला असामान्य वाटणारे हे महाभाग वैयक्तिक आयुष्यात मात्र फार वेगळे असतात, त्यांना जवळून बघितले कि कळते लक्षात येते त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात केवढी खालची पातळी गाठलेली असते…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *