तावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी

तावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी 

फार कमी पत्रकारांना नेत्यांना नेमके पुढले राजकीय आराखडे तंतोतंत कळतात. बहुतेकांचे राजकीय अंदाज चुकतात. माझे व्यक्तीविषयीचे अंदाज चुकतात म्हणजे असे वाटले होते कि बोलतांना ठाकरे कुटुंबियांचे लाडके शिवसेनेचे नेते मोठा मित्र परिवार लाभलेले मिलिंद नार्वेकर हातचे राखून बोलणारे असावेत पण जेव्हा केव्हा अधून मधून बोलणे होते लक्षात येते हा माणूस हातचे न राखता बोलून माहिती सांगून मोकळा होतो, उलट अशावेळी आमच्यासारख्या ऐकणाऱ्यांची ती जबाबदारी असते कि मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलेले फक्त मनात साठवायचे असते कारण त्यांनी सांगितलेली ऑफ द रेकॉर्ड माहिती जशीच्या तशी लिहून काढली तर ते कदाचित 

त्यांना त्रासाचे ठरू शकते, एखाद्याला अडचणीत आणणे योग्य नव्हे…

शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते तेव्हापासून मी त्यांना जवळून बघतांना किंवा त्यांच्याशी बोलतांना असे लक्षात आले कि तावडे यांना आगामी, भविष्यातले, उद्याचे राजकीय वातावरण कसे असेल, नेमके काय होईल, अमुक एखाद्याचे राजकीय भवितव्य काय असेल हे तंतोतंत कळते, कळायचे, यापुढे आपल्याला राजकीय भवितव्य नाही हेही कळले असावेत म्हणून ते असे बेताल बेशिस्त वागू बोलू लागले असावेत, आहेत. अलीकडे मी भाजपाच्या एका मुंबईतल्या नेत्याला म्हणालो कि फार पूर्वी तावडे जेव्हा केव्हा भेटायचे, मी त्यांना हमखास सांगत असे कि आशिष शेलार यांच्या रूपाने तुम्ही एक नवा राजकीय स्पर्धक उभा करताहात त्यावर ते फक्त हसायचे आणि वेगळा विषय काढायचे. हा नेता मला म्हणाला कि असे अजिबात नाही कि तावडे यांनी आशिष शेलार यांना राजकारणात मोठे केले आहे, आशिष हे स्वयंभू, ते स्वतःच कष्टातून मोठे झाले आहेत, तावडे त्यांचे नेते होते हा केवळ एक योगायोग म्हणजे तावडेंनी त्यांना जवळ घेतले नसते तरीही शेलार नक्की भाजपातले सर्वार्थाने ‘ पवार ‘ झालेच असते. गमतीने पुढे ते हेही म्हणाले कि नेतृत्व असो कि पैसे शेलार दोन्ही ठिकाणी स्वबळावर मोठे झाले…


अलीकडे अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तेही नेमके पत्रकारिता पदवी शिक्षणक्रमाच्या कार्यक्रमात तावडे यांच्याबाबतीत जी धक्कादायक घटना घडली ती तुम्हाला माहित आहे, इतरांना अचंबित करणारी असली तरी तावडे यांना स्वतःला त्यात काही वावगे वाटले असावे, मला वाटत नाही कारण तावडे यांना राजकारणातले तंतोतंत कळते, आपले राजकीय भवितव्य भविष्य यापुढे नक्की अंधःकारमय आहे हेही त्यांना कळलेले असावे त्यामुळे ते शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून हे असे वारंवार असंस्कृत आणि असभय वागत असावेत…केवळ न रुचणारा प्रश्न तावडेंना विचारल्या गेल्याने ते क्षणार्धात अक्षरश: सर्वांदेखत त्या विद्यार्थ्यांवर आणि या संवादाचे भ्रमणध्वनीवरून चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घसरले, त्यांच्या अटकेचे थेट आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल पोलिसांनी हिसकावून घेतला पुढे त्या विद्यार्थ्याला थेट पोलीस वाहनात डांबून नेले जणू तो विद्यार्थी मोठा गुन्हेगार होता, घाणेरडा प्रकार असा कि अमरावतीच्या पोलिसांनी अजिबात चार न करता मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. विशेष म्हणजे हे घडल्यानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी देखील मग रौद्र रूप धारण केले बघून पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला सोडले पण जप्त केलेला मोबाईल मात्र परत केला नाही वास्तविक असे अजिबात, काहीही विशेष असे घडले नव्हते कि पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांचा मोबाईल जप्त करावा, विशेष म्हणजे असे हलकट आदेश तेही थेट थेट राज्याच्या तेही बिद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी द्यावेत, शेम शेम. युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड हे ते दोन विद्यार्थी  होते…


संपूर्ण देशातून तावडे यांच्या विरोधात वातावरण तापलेले असतांना जर हे सरकार किंवा दस्तुरखुद्द विनोद तावडे, जणू काही घडलेच नाही, या अविर्भावात वावरत असतील तर एकेकाळी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे कालचे हेच ते विद्यार्थ्यांचे नेते सत्तेत आल्यानंतर असे उद्धट हलकट बेशरम वागणार बोलणार असतील तर विरोधकांना तोंडात एकेकाळी शेण कोंबणारे हे नेते आज मात्र स्वतः विष्ठा चाखत असल्याचे दिसते आहे जे अत्यंत लाजिरवाणे किळसवाणे आहे..

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *