दोन पुस्तके २ : पत्रकार हेमंत जोशी

दोन पुस्तके २ : पत्रकार हेमंत जोशी 

जी पुस्तके वाचणारी माणसे आपल्या संग्रहातले एखादे संग्राह्य, मौल्यवान पुस्तक तुम्हाला आवडले म्हणून तेथल्या तेथे तुम्हाला गिफ्ट करतात, ती मोठ्या मनाची माणसे आहेत असे मी मानतो, अर्थात एवढे मोठे मन माझ्याकडे नक्कीच नाही, वाट्टेल तेवढा वेळ माझ्या कार्यालयात बसा, आवडलेले पुस्तक वाचा आणि निघा, माझे मित्रांना सांगणे असते, आज दे वाचल्यानंतर उद्या लगेच आणून देतो, हेही मी करणे टाळतो, प्रसंगी मी माझी चड्डी एखाद्याला काढून देईन पण पुस्तके देणार नाही. हा विषय येथे यासाठी कि हल्ली हल्ली अगदी सहजच मी विनोद तावडेंच्या सेवासदन या प्रशस्त सरकारी बंगल्यात गेलो होतो. त्यांना बाहेर यायला वेळ होता म्हणून त्यांच्या सेल्फवरली पुस्तके चालत बसलो. अलीकडे काही दिवसांपासून जो विषय डोक्यात घोळतोय, नेमके त्या विषयांवरले म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या विषयाचे श्रीमान रमेशभाई मेहता यांनी लिहिलेले एक दुर्मिळ पुस्तक त्यात सापडले, वाचतांना मनापासून ते आवडले, तेवढ्यात तावडे बाहेर भेटायला आले, हे पुस्तक छान आहे, मी म्हणालो, ते म्हणाले, घरी घेऊन जा, मग काय, क्षणाचाही विलंब न लावता राज्याच्या शिक्षण मंत्र्याची त्यावर सही घेऊन मी ते ताब्यात घेतले, नेमक्या त्याच पुस्तकाचा आधार घेत माझे पुढले लिखाण…


साधारणतः १९८० नंतर जी विचित्र लाट आपल्या राज्यात वाऱ्यासारखी पसरली, त्या लाटेमुळे आम्ही सारेच आमचे पूर्वापार संस्कार विसरलो आणि घराचे घरपण हरवून बसलो. १९८० नंतर ज्याला त्याला येनकेनप्रकारेण श्रीमंत व्हावे वाटायला लागले आणि सारे संपले. केवळ मुठभर लोकांकडेच पैसे का, हा सवाल ज्याला त्याला भेडसावू लागला त्यातून ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस, पद्धतीने सारे श्रीमंतीच्या मागे लागले, पैसे आले पण व्याधी आणि व्यसनांना सोबतीने घेऊन आले. मराठी माणूस सुखवस्तू झाला पण कौटुंबिक शांती आणि संस्कार गमावून बसला. काहीही आणि कसेही करून संध्याकाळी घरी येतांना पैशांची भरगच्च बॅग घेऊनच परतायचे हे मराठी माणसाने ठरविले त्यामुळे नेते, सरकारी अधिकारी, कर्मचारी, दलाल, व्यापारी, कंत्राटदार, विविध प्रोफेशनल्स,जमिनीचे दलाल, बांधकाम व्यावसायिक, विविध उद्योगातले, शिक्षण सम्राट, इत्यादी इत्यादी म्हणजे काळी कामे व कमाई करणारे सारे, खऱ्याचे खोटे करून पैसे घेऊन घरी जेव्हा यायला लागले तेव्हाच त्यांच्या घरातले वातावरण गढूळ झाले, मुली आणि मुले बिघडले, ज्यांच्यासाठी कमावले देवाने त्यांनाच नालायक करून सोडले. मोठ्या विश्वासाने सांगतो, जे भ्रष्ट लुच्चे लफंगे नाहीत, मराठीतल्या उत्तम संस्कारांना चिटकून आहेत, त्यांच्या घरातले वातावरण मोठे आनंदी असते, प्रसन्न असते, एखादे संकट त्यांच्यावर ओढवले तरी ते त्यातून बाहेर पडतात कारण अदृश्य परमेश्वरी रुपी शक्ती त्यांना नक्कीच मदत करीत असते….


दुसऱ्यांची नक्कल करणे मराठी माणसाचा स्वभाव आहे. माझ्या शेजारी गुजराथी कुटुंब राहते. त्यांच्याकडे जसे ढोकळे करतात, ते एकदा आपल्याकडेही करा कि, मी चुकून घरी सांगितले, घरातल्यांनी माझे ऐकले, ढोकळे केले, मी ते कसेबसे खाल्लेही पण पुढले दोन दिवस माझे दात दुखत होते आणि गुदद्वारातून दिवाळीतल्या फटाक्यांसारखे वेगवेगळे आवाज निघत होते, येत होते, कानावर आणि नाकावर पडत होते. एकदम मान्य आहे कि आपण सारे मराठी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या दारिद्र्याला कंटाळलो होतो, गावातले शेटजी, जमीनदार आणि पुढारी तेवढे श्रीमंत दिसायचे बाकी सारे आर्थिक दृष्ट्या यथातथा असायचे, या महिन्यात तू साडी घे पुढल्या महिन्यात मी शर्ट शिवतो, किंवा मी घरी येतांना मस्तपैकी सहा केळी घेऊन येतो, त्यातल्या चार केळ्यांचे शिखरण कर, दोन केळी उदयाला आपल्या उपवासाला होतील, या भिक्कार पद्धतीने आयुष्य रेटतांना नक्की आपण सारे कंटाळलो होतो, १९८० नंतर जग आपल्या जवळ झपाट्याने आले, पैसे वाममार्गाने कसे कमवायचे, मार्ग आपण आत्मसात केले. देश लुटणे, सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणे, योजना फारतर कागदावर, बसता उठता त्यातले पैसे काढणे, लुटालूट, फसवणूक आपल्या अंगवळणी पडले, प्रमुख पुरुष सतत बाहेर, पैसे मिळविण्याच्या नादात, म्हणजे घरात वेळ देणारे वडील पैसे ओरबाडण्यासाठी रस्त्यावर उतरले, पैसे आणि व्यसने, कटकटी आणि व्याधी मग एकाचवेळी घरी येऊ लागल्या, त्यातूनच आजचे दृश्य ज्या त्या काळे पैसे मिळविणाराच्या घरी दिसू लागले म्हणजे घरी पैसे बक्कळ आहेत पण संस्कार संपले, पुढल्या पिढीतले तरुण झपाट्याने व्यसनी, उर्मट, चंगळवादी, भोगसम्राट, बरबाद होऊ लागले. आज मोठे विचित्र वातावरण घरोघरी आहे, ज्या त्या पैसेवाल्यांच्या घरी फारतर एखादे दुसरे मूल आणि तेही पार विचित्र किंवा वाह्यात निघालेले, व्यसनाधीनतेत बापाच्या दहा पावले पुढे, वरून जर त्या मुलांची मैत्री आपल्या राज्यात जो समाज मोठ्या प्रमाणावर ड्रग्स व्यवसायात आहे, त्या जातीतल्या तरुणांशी झालेली तर संपलेच सारे, ह्या समाजातले तरुण त्यांच्या हाती आपल्या मुली सापडल्या कि त्यांचे ज्या पद्धतीने लैंगिक शोषण करतात, ते ऐकून अंगाचा थरकाप उडतो, असे मित्रांनो, काळ्या पैशातून श्रीमंत झालेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातले वातावरण आहे…


असे वाटले होते कि आपली मुले संध्याकाळी नको ते उद्योग करतात म्हणून मायबापांनी नव्याने निर्माण झालेल्या नरेंद्र किंवा भय्यू छाप संतांच्या पायाशी घरातले तरुण तरुणी पाठविताना संकोच मानला नाही पण हे असले बुवा तर जणूकाही आपण लोकांना लुटायला आणि बेवकूफ बनवायला जन्माला आलो आहोत, थाटात वावरायला लागले, त्यातून हि वाईट परिस्थिती बहुतेक मराठी कुटुंबात निर्माण झाली आहे, पुढली व्यसनी आणि ऍरोगंट पिढी हि आपली आता मोठी समस्या आहे….


बघा, गाव तेथे गुंड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार होणार प्रत्येक स्वयंसेवक हा आदर्श आहे, मनोहर पर्रीकर, देवेंद्र फडणवीस आहे, मी म्हणणार नाही, तेथेही काही प्रमोद महाजन आहेत, येऊ द्या म्हणणारे आहेत पण हे प्रमाण फार फार अत्यल्प आहे, संघ विचारांशी चिटकून राहणारा शक्यतो आयुष्यात बेताल होत नाही, असे नक्की आहे म्हणून मी जेव्हा केव्हा परदेशातल्या मराठी कुटुंबातून वावरतो, असे लक्षात येते कि ते सारे मराठी काही विचार पटोत अथवा न पटोत, पोटच्या मुलांना हमखास संघ शाखेत किंवा कार्यक्रमांना पाठविताना दिसतात, परिणाम असा झालेला आहे कि इतर भारतीयांच्या तुलनेत संघात जाणारे कमी प्रमाणावर बिघडलेले आहेत किंवा अजिबात बिघडलेले नाहीत असेही आहे, आपण हा प्रयोग आपली राजकीय परंपरा विसरून करून बघायला हरकत नाही असे मला अलीकडे वाटू लागले आहे. शपथ घेऊन सांगतो, मी संघाचा प्रचारक आणि प्रसारक अजिबात अजिबात नाही पण पुढली पिढी वाचविण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने घडविण्यासाठी हा प्रयोग करणे चांगले ठरू शकते, असे मला वाटले, म्हणून येथे सांगितले. विचार तर प्रत्येक राजकीय पक्षाचे किंवा त्याजशी संबंधित संघटनेचे असतात पण या अशा राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे विचार बाजूला पडले, गोणपाटात बांधून ठेवल्या गेले म्हणून तेथे गेलेल्यांचे वाट्टोळे झाले. महात्मा गांधी नव्हे रॉबर्ट वढेरा निर्माण झाले…

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *