बुवा आणि बाबा : पत्रकार हेमंत जोशी

बुवा आणि बाबा : पत्रकार हेमंत जोशी 

मागेही एकदा मी लिहिले आहे कि मला कधीही ज्या बाबा बुवा महाराजांवर मी टीका करतो त्यांची भीती कधीही  वाटत नाही कारण त्यांच्यात कुठलेही देवत्व सत्व अजिबात नाही. ज्या बुवा बाबांवर टीका करतो ते सारे भामटे लबाड लुबाडणारे आहेत पण खूप भीती वाटते त्यांच्या फॉलोअर्स म्हणजे भक्तांची. याआधीच्या लेखातून मी भय्यू अनिरुद्ध किंवा नरेंद्र या बुवांवर नेमकी टीका केल्यानंतर देखील तेच झाले हे असे भामटे  बिघडवू शकत नाहीत पण त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते दुखावतात त्यांची होणारी टीका मात्र मला सहन करावी लागते. कोणताही बुवा कधीही मोठा नसतो मोठे असतात त्यांचे फॉलोअर्स. कारण त्यांना या भामट्यांमध्ये देव दिसत असतो आणि एखाद्याच्या देवाला शिवी हासडणे जगभरात सहन न केल्या जाणारे पण ते सहन करावे लागते या भामट्यांच्या भक्तांना वस्तुस्थिती समजावून सांगायची असते म्हणून…

त्या अनिरुद्ध बापूने स्वतःला तर देव म्हणवून घेतलेच पण पुढे जाऊन नरेंद्र आणि अनिरुद्ध यांनी आपल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये देखील कसा परमेश्वराचा वास आहे ठेवा आहे त्यांच्या भक्तांवर हॅमर करून पुढल्या पिढीचीही सोय करून ठेवलेली आहे. इतर महाराजांवर धाडी पडल्या तशा यांच्यावर एक दिवस पडल्या कि भक्तांना कळेल ते किती लबाड बुवांच्या मागे लागलेले होते. या देशात अंधःश्रद्धेविरुद्ध वातावरण तयार होते आहे आणि विविध महाराजांचे बिंग फुटते आहे लक्षात येताच तुमच्या हे लक्षात आलेच असेल कि या राज्यातल्या साऱ्या भामट्या बुवांनी अवडंबर माजविणे बंद करून छुप्या पद्धतीने आपली बुवाबाजी सुरु ठेवलेली आहे. पुन्हा एकवार सांगतो कि थेट परमेश्वर आणि सामान्य माणसात विचारांचा दुवा साधण्यासाठी बुवा बाबांची या समाजाला नक्की गरज आहे, मनशांती साठी तशी आवश्यकता आहे पण तो बुवा तो महाराज निस्वार्थी असावा, दिवंगत भय्यू महाराजनसारखा लबाड भामटा लुटारू नसावा. बुवांनी सर्वसामान्य लोकांना नेमकी ती अदृश्य शक्ती रुपी देवाची महती समजावून सांगावी थोडक्यात या महाराजांनी एखादया कीर्तनकार किंवा प्रवचनकाराचे कर्तव्य पार पाडावे पण ते राहते बाजूला आणि हे भामटे स्वतःला व आपल्या कुटुंब सदस्यांना थेट देव असल्याचे भक्तांना भासवून त्यांना चक्क फसवितात व लुबाडतात…

मागेही एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि माझ्या दोन मुलांपैकी एकाने महाराज व्हावे आणि आम्हाला खूप खूप श्रीमंत करावे, मला वाटायचे.  महाराज होण्यासाठी फारसे काही करावे लागत नाही, सर्वप्रथम अनिरुद्धबापू किंवा भय्यू महाराजांसारखे व्यसनी व्हावे लागते नंतर अध्यात्मावर उपलब्ध असलेली पुस्तके वाचून त्यात दिलेले विचार आधी चोरायचे नंतर लोकांना प्रवचनातून सांगण्याची कला अवगत करावी नन्तर काही महिने कलकत्याला जाऊन जादूचे प्रयोग शिकावे लागतात म्हणजे ढुंगणातून काखेतून प्रसाद पेढा कुंकू धागे दोरे गंडे इत्यादी काढून भक्तांना खाऊ घालण्याची देण्याची कला अवगत करावी लागते, वाचकहो, एकदा का तुम्ही बुवा बाबा महाराज म्हणून नावारूपाला आलात कि नंतर आयुष्यभर तुमची, तुमच्या कुटुंबाची कित्ती कित्ती मजा असते विशेष म्हणजे मस्त मस्त बायका तुमच्या अंगा खांद्याभोवती कायम घुटमळत असतात, सारी रेलचेल असते, दागदागिने सोनेनाणे, पैसे तर खोकेच्या खोके मिळविता येतात पण माझ्या मुलांना ते पटले नसावे अन्यथा त्या दोघातल्या एकाला मी नक्की नरेंद्र भय्यू अनिरुद्ध म्हणून नावारूपाला आणले असते. असे नाही कि कोणीही आजतागायत उत्तम काम यात केले नाही, अनेक आहेत आणि होते जसे कलावती देवी, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, प्रल्हाद महाराज, किंवा गाडगे महाराज, तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज असे अनेक, पण त्यांचे कार्य समाजाला सतत

घडविण्याचे होते, लुबाडण्याचे नव्हते, भक्तांनो सावध राहून महाराज निवडावे, अन्यथा फसवणूक होते…

तूर्त एवढेच  : हेमंत जोशी. 

Comments 1

  1. Unknown says:

    I want to become a good baba, cant we come together and start a venture ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *