लेखा जोखा २०१४ ते २०१९ : पत्रकार हेमंत जोशी

लेखा जोखा २०१४ ते २०१९ : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्याला प्राप्त झालेले मोठेपण मान्य करावे नि पुढे जावे. डॉ. नेने यांना माधुरी मिळाली का, त्यावर चडफडत बसण्यापेक्षा नेनेंना माधुरी मिळाली ठीक आहे, पुढे आपल्याला करीना कतरीना कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत किंवा मिळाली तिजवर समाधान मानावे नि पुढल्या कामाला लागावे. गोपीनाथ मुंडे अचानक जग सोडून गेले त्यामुळे मंत्री नव्हे तर देवेंद्र फडणवीर थेट मुख्यमंत्री झाले आणि येथेच त्यांचे काही सिनियर्स डिस्टरब झाले अस्वस्थ झाले त्यात विनोद तावडेही होते पण अलीकडे त्यांनी फडणवीसांचे अफाट कर्तृत्व आणि दमदार नेतृत्व पाहून त्यांच्याशी जुळवून घेतले, लोकसभा निवडणुकी दरम्यान या दोघातले सुधारलेले संबंध, त्यांचे एकमेकांना बिलगणे, संबंध सुधारलेत, भाजपा वर्तुळात ते लक्षात आले…


आपल्या, अलीकडे काहीशा वादग्रस्त राजकीय वाटचालीला सांभाळून घेणारा किंवा काही गंभीर चुकांवर पांघरूण घालून वरून केवळ आशिष शेलारांना प्राधान्य देऊन केवळ त्यांना राजकीय संधी न देणारा प्रभावी नेता विनोद तावडे यांची ती मोठी गरज होती त्याला फडणवीस हा एकमेव उतारा योग्य असल्याने चाणाक्ष विनोद तावडे यांनी बरे झाले फडणवीसांचे आधी नेतृत्व मान्य केले तदनंतर मैत्रीचा चुम्मा देऊन घेऊन तावडे मोकळे झाले, नाहीतर त्यांचे सत्तेच्या राजकारणात काही खरे नव्हते, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता इत्यादींच्या रांगेत तेही जाऊन बसले असते. प्रभावी समवयस्क आणि सिनियर्स यांना फडणवीसांना अचानक चालून आलेले मुख्यमंत्रीपद पटकन पचनी पडले नाही शिवाय मुख्यमंत्री होण्याआधीचे देवेंद्र हे पूर्णतः भिन्न होते, त्यामुळे त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी सुरवातीला अगदीच लाइटली घेतले, त्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते…


www.vikrantjoshi.com


गावातल्या एखाद्या सर्वसामान्य तरुणाला मस्त बायको नशिबाने मिळते ते बघून जो तो त्याला मिळालेली आपल्याला कशी खेचून आणता येईल, प्रयत्नात असतो, तिला इम्प्रेस करण्याचे मग अनेकांचे प्रयत्न सुरु असतात पण एखाद्याची बायको म्हणजे काय गावजेवण असते कि कोणीही यावे नि पाटावर बसून दुसऱ्याच्या ताटातले अलगद जेऊन घ्यावे. कोणाचेही सुग्रास अन्नाने वाढलेले ताट आपल्याकडे खेचून घेणे तेवढे सोपे नसते. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद हा असाच दुसऱ्याला मिळालेल्या देखण्या बायकोसारखा प्रकार होता त्यामुळे आता हे ताट आपल्याकडे कसे खेचून घेता येईल, निदान फडणवीस यांच्याकडून कसे खेचून घेता येईल, अनेकांनी या पाच वर्षात जोमाने जोराने ताकदीने कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने प्रयत्न व डावपेच खेळणे सुरु केले ज्यात शरद पवार सर्वाधिक आघाडीवर होते…


मुख्यमंत्री झाल्यानंतर जर राजकीयदृष्ट्या मानसिकदृष्ट्या फडणवीसांचे खच्चीकरण आणि अनेकविध मार्गांनी बदनाम करण्याचा त्यांना त्रास देण्याचा मोठा प्रयत्न भाजपमध्ये एकनाथ खडसे आणि पक्षाबाहेर केवळ शरद पवार यांनी अनेकांना खुबीने हाताशी धरून किंवा अनेकांना फितवून आटोकाट केला पण साऱ्या विरोधकांचे केलेले प्रयत्न मातीमोल ठरले याउलट देवेंद्र या सर्वांच्या कित्येक पटीने पुढे निघून गेले. शरद पवार तर बाहेरचे होते पण आजही दररोज एकनाथ खडसे यांचे फडणवीसांना खिजविणे चिडविणे बदनाम करणे मानसिक त्रास देणे जे सुरु आहे, ते त्यांनी वास्तविक यापूर्वीच थांबवायला हवे होते, न थांबविल्याने मानसिक स्वास्थ्य आणि राजकीय नुकसान फडणवीसांचे नव्हे तर खडसे यांचेच मोठ्या प्रमाणात झाले. मामला केवळ ‘तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसे, हा असाच होता. फडणवीस म्हणजे किस झाड कि पत्ती, हा जो समज मंत्री असतांना खडसे यांनी करवून घेतला त्यातून बेधुंद कारभार आणि फडणवीसांना अगदी मंत्रिमंडळ साप्ताहिक बैठकीतही अद्वातद्वा बोलणे, नुकसान फक्त खडसे यांचे झाले…


वास्तविक उभ्या राज्यात कम्पेअर टू फडणवीस, खडसे नेते म्हणून भाजपा व युतीमध्ये अधिक प्रभावी होते, त्यांचे फडणवीसांपेक्षा नक्की अधिक वजन होते पण ते यश तो प्रभाव त्यांना टिकविता आला नाही, मंत्री म्हणून बेधुंद वागणे वरून मी नाही त्यातली काडी लावा आतली,पद्धतीने मी कसा चांगला हे साफ खोटे रेटून सांगणे, खडसे यांचे नाव खराब होत गेले याउलट फडणवीसांचे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत राजकीय सामाजिक वजन वाढत गेले. असे अजिबात घडले नसते, झाले नसते जर खडसे यांनी सारेच दमाने घेतले असते. आता तर त्यांचा हुकमी जळगाव जिल्हा देखील त्यांच्या फारशा प्रभावाखाली राहिलेला नाही ती जागा बऱ्यापैकी गिरीश महाजन यांनी घेतली आहे, ज्या गिरीश महाजन यांना खडसे यांनी आधी जिल्ह्यात मोठे केले तेच महाजन त्यांच्यापेक्षा पुढे निघून जाणे, त्यासारखे दुर्दैव नाही. खडसे योग्य सल्ला देणार्यांचे ऐकायलाच तयार नव्हते, ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते, त्यांचे त्यातून मोठे राजकीय नुकसान झाले वरून ते बदनाम देखील झाले. लोकांचा नेता म्हणून माहित असणाऱ्या माझ्यासारख्या त्यांच्या मित्रांना त्याचे मनापासून मनातून वाईट वाटते…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *